LG K61 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Feb 2020 14:46:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 LG ने लॉन्च केले तीन नवीन फोन, तिन्ही फोन्स मध्ये आहे 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/lg-k61-k51s-k41s-announced-with-punch-hole-display-quad-camera-4000mah-battery-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k61-k51s-k41s-announced-with-punch-hole-display-quad-camera-4000mah-battery-specifications-price/#respond Tue, 18 Feb 2020 14:46:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6631 कंपनीने LG K61, LG K51S आणि LG K41S स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो MIL-STD-810G सर्टिफाइड आहे.

The post LG ने लॉन्च केले तीन नवीन फोन, तिन्ही फोन्स मध्ये आहे 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी LG ने आज अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने LG K61, LG K51S आणि LG K41S स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो MIL-STD-810G सर्टिफाइड आहे. हे डिवाईस वेगवेगळ्या बाजारांत वेगवेगळ्या चिपसेट सह येतील. LG चे हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे अजून समजले नाही पण एवढे नक्की आहे कि कंपनी आपले हे तिन्ही स्मार्टफोन्स मीड बजेट मध्ये आणेल.

LG K61

एलजी के61 बद्दल बोलाचे तर हा स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.5 इंचाच्या फुलएचडी+ फुलविजन पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 4 जीबी रॅम वर सादर केला आहे जो 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG K61 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या बॅक पॅनल वर 48एमपी प्राइमरी सेंसर सह 8 एमपी सुपर वाइड लेंस, 2 एमपी मॅक्रो लेंस आणि 5 एमपी डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.

LG K61 च्या फ्रंट पॅनल वर 16एमपी चा सेल्फी कॅमेरा आहे. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. एलजी के61 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. LG K61 टाइटेनियम, व्हाईट आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LG K51S

एलजी के51एस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.5 इंचाच्या फुलविजन एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्डने 2 टीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन पण 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफीसाठी LG K51S पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 32 एमपी प्राइमरी सेंसर + 5एमपी सुपर वाइड लेंस + 2एमपी मॅक्रो लेंस + 2एमपी डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी हा फोन 13एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG K51S च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन टाइटेनियम, पिंक आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LG K41S

एलजी के41एस पण 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ फुलविजन पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. एलजी ने हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्डने 2 टीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.

LG K41S फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 एमपी प्राइमरी सेंसर + 5एमपी सुपर वाइड लेंस + 2एमपी मॅक्रो लेंस + 2एमपी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG K41S च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन पण यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन टाइटेनियम, व्हाईट आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post LG ने लॉन्च केले तीन नवीन फोन, तिन्ही फोन्स मध्ये आहे 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k61-k51s-k41s-announced-with-punch-hole-display-quad-camera-4000mah-battery-specifications-price/feed/ 0