LG K92 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Oct 2020 12:32:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-debuts-with-snapdragon-690-soc-64mp-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-debuts-with-snapdragon-690-soc-64mp-quad-rear-camera/#respond Fri, 30 Oct 2020 12:32:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8730 फोटोग्राफीसाठी एलजी के92 5जी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल,

The post 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी LG अनेक दिवसांपासून मोबाईल मार्केट मध्ये एकापाठोपाठ एक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या ‘K’ सीरीज मध्ये LG K62 आणि LG K52 लॉन्च केले होते. तर आता या दोन्ही फोन्स नंतर कंपनीने के-सीरीज मध्ये एक नवीन फोन LG K92 5G को सादर केला आहे. एलजी के92 5जी फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच एलजीने या फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे आणि यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी एलजी के92 5जी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो चौकोनी आकारात आहे. या मॉड्यूल मध्ये f/1.78 लेंस आणि 81 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच f/2.2 लेंस आणि 115 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 5 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर f/2.4 लेंस सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि f/2.4 लेंस सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी एलजीच्या या फोन मध्ये f/2.0 लेंस आणि 77 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : रोटेटिंग स्क्रीन आणि अनोखी डिजाइन असलेला नॉन चीनी फोन LG Wing झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

एलजी के92 5जी फोन एंड्रॉयड 10 वर चालतो, ज्यात 6.7 इंच फुल-एचडी+ होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 690 प्रोसेसर व 6 जीबी रॅम सह येतो. इंटरनल स्टोरज 128 जीबी आहे, ज्यात 2 टीबी पर्यंत माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोनची बॅटरी 4,000 एमएएचची आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये Wi-Fi 802.11 ac, एनएफसी, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये स्टीरियो स्पीकर्स, एलजी 3डी साउंड इंजन सपोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

किंमत

एलजी के92 5जी फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत $359 (लजवळपास 26,600 रुपये) आहे. तसेच हा फोन को कंपनीने टाइटन ग्रे रिफ्लेक्टिड एक्सेंट्स मध्ये सादर केला आहे. उपलब्धता पाहता हा हँडसेट AT&T, Cricket Wireless आणि US Cellular च्या माध्यमातून उपलब्ध होईल. AT&T चा सेल 6 नोव्हेंबरला सुरु होईल, तर US Cellular ची विक्री कथितरित्या 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.

The post 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-debuts-with-snapdragon-690-soc-64mp-quad-rear-camera/feed/ 0
LG K92 गूगल वर झाला लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-listed-on-google-play-console-with-snapdragon-690-soc/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-listed-on-google-play-console-with-snapdragon-690-soc/#respond Thu, 15 Oct 2020 14:40:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8542 LG K92 गूगल प्ले कंसोल वर 6 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे.

The post LG K92 गूगल वर झाला लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी टेक कंपनी LG चा एक मोबाईल फोन लीक मध्ये समोर ला होता ज्याचे नाव LG K92 5G सांगण्यात आले होते. या लीक मध्ये फोनची रेंडर ईमेज शेयर करण्यात आली होती, ज्यामुळे लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. आता एलजीचा हा फोन गूगल प्ले कंसोल वर पण स्पॉट झाला आहे जिथे फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स शेयर केले गेले आहेत. या लिस्टिंग नंतर आशा आहे कि LG K92 लवकरच टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

LG K92 गूगल प्ले कंसोल वर acexlm कोडनेम सह लिस्ट केला गेला आहे. फोनच्या नावासोबत फक्त याचे स्पेसिफिकेशन्स नाही तर फोनचा फोटो पण आला आहे. एलजी के92 ची हि लिस्टिंग एमएसपी वेबसाइटने स्पॉट केली आहे. सर्वात आधी फोटो पाहता प्ले कंसोल वर फोनचा फ्रंट पॅनल वर दाखवण्यात आला आहे ज्यात बेजल लेस पंच-होल डिस्प्ले दिसला आहे. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध देण्यात आला आहे.

एलजी के92 चे स्पेसिफिकेशन्स पाहता गूगल प्ले कंसोल वर हा फोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या फुलएचडी+ डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये फोनची स्क्रीन साईज तर शेयर करण्यात आली नाही पण एलजी के92 चा डिस्प्ले 420DPIला सपोर्ट करेल. फोटो वरून अंदाज लावला जाऊ शकतो कि एलजी आपला हा फोन मोठ्या म्हणजे 6.5 इंचाच्या डिस्प्ले वर लॉन्च करू शकतो.

LG K92 गूगल प्ले कंसोल वर 6 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर बनला आहे सोबतच प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट देण्यात आला आहे. गौरतलब आहे कि स्नॅपड्रॅगॉन 690 एक 5जी चिपसेट आहे, त्यामुळे स्पष्ट होते कि एलजी के92 स्मार्टफोन 5G कनेक्टिविटी सपोर्ट सह मार्केट मध्ये येईल. आशा आहे कि 6 जीबी रॅम व्यतिरिक्त फोनचे इतर वेरिएंट्स पण लॉन्च केले जातील.

LG Velvet

एलजीने भारतीय बाजारात आपला पावरफुल फोन LG Velvet पण लॉच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आधीपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. या आठवड्यात LG Velvet संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन भारतात 36,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. फोनची लॉन्च डेट तर समजली नाही.

The post LG K92 गूगल वर झाला लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k92-5g-listed-on-google-play-console-with-snapdragon-690-soc/feed/ 0