LG Mobile - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Apr 2021 12:03:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/ https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/#respond Mon, 05 Apr 2021 12:03:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10501 काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता.

The post LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी मोबाईल (LG Mobile) आता इतिहास जमा होणार. अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि एलजी आपला मोबाईल फोन वेंचर जगभरात बंद करणार आहे. आता कंपनीने यावर शिक्कामोर्तब केला आहे. LG ने सोमवारी घोषणा केली कि कंपनी आपला मोबाईल बिजनस यूनिट बंद करत आहे. याबाबत कंपनीचे विधान समोर आले आहे कि मोबाईल फोन बिजनस यूनिट बंद केल्यावर कंपनी इलेक्ट्रिक वीकल कंपोनेंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिवाइसेज आणि बिजनस-टू-बिजनस सलूशन सारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करेल.

चीनी फोन्सने तोडली कंबर?

भारतासह जगभरात सध्या चिनी मोबाईल फोन कंपन्यांचा जोर आहे. एकीकडे बोलले जात आहे कि चायनीज फोन्समुळे कंपनी अनेक वर्षे तोट्यात जात आहे. एलजीचे प्रोडक्ट खूप नवीन टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये लॉन्च होत आहेत. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्यांच्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी होते पण एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

31 जुलैपर्यंत बंद होईल बिजनस

एलजीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि कंपनी आपला मोबाईल फोन बिजनस 31 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद करेल. कंपनीने सांगितले कि या तारखेनंतर पण काही निवडक मॉडेल्सचा स्टॉक उपलब्ध राहू शकतो.

कधीपर्यंत मिळतील LG चे फोन?

एलजीने सांगितले कि आपला स्टॉक संपवण्यासाठी आता फोन्स बाजारात उपलब्ध करवून देत आहे. कंपनी एका निश्चित कालावधीसाठी ग्राहकांना सर्विस सपोर्ट आणि सॉफ्टवेयर अपडेट पण जारी करेल. रिपोर्ट्सनुसार, एलजीने आधीच काही कर्मचाऱ्यांना फोन डिविजनवरून बिजनेस यूनिटमध्ये शिफ्ट करायला सुरुवात केली आहे.

एलजी मोबाईलला होत आहे नुकसान

काउंटरपॉइन्ट रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार, एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 मिलियन यूनिट्स शिप केले आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेयर एकूण 2 टक्के होता. पण स्वस्त चायनीज मोबाईल कंपन्या प्राइस वॉर समोर ते व्यावसायिकरित्या यशस्वी होऊ शकले नाहीत. याआधी यावर्षी एलजीने म्हटले होते कि कंपनी आपल्या स्मार्टफोन बिजनसचे चिंतन करेल. कंपनीने अनेक ऑप्शन जसे कि स्मार्टफोन यूनिटची विक्री करण्याबाबत पण विचार केला होता.

एलजी जी8एक्स थिंक व्हिडीओ

The post LG Mobile चे दुकान बंद, आता लॉन्च होणार नाहीत एलजीचे फोन! जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-smartphone-business-shuts-down-company-annouces/feed/ 0