LG W10 Alpha - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Feb 2020 14:59:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/#respond Wed, 19 Feb 2020 14:59:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6642 पावर बॅकअपसाठी LG W10 Alpha 3,450एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी चा हा नवीन फोन ब्लॅक कलर मध्ये फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी LG ने गेल्यावर्षी भारतात नवीन स्ट्रॅटेजी सह ‘LG W’ सीरीज सादर केली होती. या सीरीजची सुरवंट करत कंपनीने भारतात एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात LG W10, LG W30 आणि LG W30 Pro चा समावेश होता. एलजी ने हे स्मार्टफोन्स लो बजेट मध्ये आणले होते, जे मोबाईल यूजर्सना आवडले होते. आता आपल्या फॅन्सना भेट देत एलजी ने या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस जोडला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन LG W10 Alpha भारतात लॉन्च केला आहे जो फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LG W10 Alpha

एलजी डब्ल्यू10 अल्फा चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.41 इंचाच्या एचडी+ रेनड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडी रुंद बॉडी देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. LG W10 Alpha चा स्क्रीन-टू-बॉडी 86.83 टक्के आहे.

LG W10 Alpha एंडरॉयड पाई आधारित फोन आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह स्प्रेडट्रम एससी9863 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी डब्ल्यू10 अल्फा सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल आकारात आहे.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच LG W10 Alpha सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG W10 Alpha डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी LG W10 Alpha 3,450एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी चा हा नवीन फोन ब्लॅक कलर मध्ये फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

विशेष म्हणजे कालच LG ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने LG K61, LG K51S आणि LG K41S स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. हे तीनही स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले सह क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो MIL-STD-810G सर्टिफाइड आहे. हे डिवाईस वेगवेगळ्या बाजारांत वेगवेगळ्या चिपसेट सह येतील. LG चे हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे अजून समजले नाही पण एवढे नक्की आहे कि कंपनी आपले हे तिन्ही स्मार्टफोन्स मीड बजेट मध्ये आणेल.

The post 3 जीबी रॅम आणि 3,450एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला एलजी चा स्वस्त स्मार्टफोन LG W10 Alpha first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-alpha-launched-full-specifications-price-9999-sale/feed/ 0