M10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 30 Mar 2020 12:07:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/#respond Mon, 30 Mar 2020 12:07:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6931 Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत. Mi 10 आणि Mi 10 Pro आधी लॉन्च केले गेले होते. यातील मी 10 लाइट 5जी नवीन स्मार्टफोन आहे जो होल-पंच डिस्प्ले डिजाइन सह आला आहे.

Mi 10 Lite ची किंमत आणि उपलब्धता

मी 10 लाइट 5जी कंपनीने 349 यूरो (जवळपास 29,200 रुपये) मध्ये सादर केला आहे. तसेच शाओमीने हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन सह सादर केला आहे. हा हँडसेट यूरोपीय बाजारांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतातील याच्या उपलब्धतेबाबत अजूनतरी माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे मी 10 भारतात 31 मार्चला लॉन्च केला जाणार होता. पण कंपनीने देशातील लॉकडाउनमुळे लॉन्च स्थगित केला आहे.

Mi 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

Mi 10 Lie 5जी चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.57-इंचाचा एमोलेड ट्रू-कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वाटरड्रॉप नॉच सह येतो. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट आहे. रॅम आणि स्टोरेज क्षमतेबाबत सध्यातरी माहिती देण्यात आलेली नाही. पण कंपनीच्या मते यात एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.1 स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी Xiaomi Mi 10 Lite मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरचा समावेश आहे. तसेच कंपनीने इतर सेंसर्सची माहिती दिली नाही. पण हा स्मार्टफोन नाइट मोड 2.0, एआई डायनामिक स्कायस्केपिंग आणि व्लॉग मोड सारख्या फीचर्स सह येतो. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.

स्मार्टफोन शाओमी मी 10 लाइट 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,160 एमएएच क्षमता असेलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन क्विक चार्ज 3.5 ला पण सपोर्ट करतो. सोबतच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/feed/ 0