Marathi OTT News - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Jan 2023 09:50:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम https://www.91mobiles.com/marathi/planet-marathi-new-show-patala-tar-ghya/ https://www.91mobiles.com/marathi/planet-marathi-new-show-patala-tar-ghya/#respond Tue, 24 Jan 2023 09:49:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17188 प्लॅनेट मराठी ओटीटी या जगातील पहिल्या आणि एकमेव मराठी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं आपल्या नव्या शोची घोषणा केली आहे. हा एक चॅट शो असेल ज्याच्या माध्यमातून तुमच्या आवडीच्या मराठी कलाकारांना थोडं आणखी जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. या नव्या चॅट शोचे नाव ‘पटलं तर घ्या with Jayanti’ असं आहे, ज्याचा पहिला भाग उद्या म्हणजे 25 जानेवारी […]

The post Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • पटलं तर घ्या with Jayanti या नव्या मराठी चॅट शोची घोषणा करण्यात आली आहे
  • हा शो प्लॅनेट मराठी ओटीटीवर मोफत पाहता येईल
  • नवा मराठी चॅट शो 25 जानेवारी 2023 रोजी सुरु होईल

प्लॅनेट मराठी ओटीटी या जगातील पहिल्या आणि एकमेव मराठी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं आपल्या नव्या शोची घोषणा केली आहे. हा एक चॅट शो असेल ज्याच्या माध्यमातून तुमच्या आवडीच्या मराठी कलाकारांना थोडं आणखी जवळून जाणून घेण्याची संधी मिळेल. या नव्या चॅट शोचे नाव ‘पटलं तर घ्या with Jayanti’ असं आहे, ज्याचा पहिला भाग उद्या म्हणजे 25 जानेवारी 2023 ला रिलीज केला जाईल.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजच्या आयुष्याबद्दल प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे असते. काहींना त्यांच्या यासाचे रहस्य जाणून घ्यायचे असते. तर काहींना त्यांच्या आयुष्यातील धमाल, किस्से, आठवणी इत्यादींमध्ये रस असतो. इंटरनेटवर वाचलं तरी सेलिब्रेटींच्या अनेक गोष्टी सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. कलाकारांच्या अशाच गोष्टी, किस्से, रहस्यांची पोलखोल प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या चॅट शोमधून होणार असल्याचं दिसतं आहे.

प्लॅनेट मराठीनं आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या नव्या शोची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अनेक मराठी कलाकारांनी ‘पटलं तर घ्या’ या हॅशटॅगचा वापर आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये करून हा शो टीज केला होता. यात सोनाली कुलकर्णी आणि सायली संजीव यांचा देखील समावेश आहे.

या आगामी शोमध्ये मराठी सेलिब्रेटींसोबत फक्त गप्पा आणि किस्स्यांची मैफिल जमणार नाही तर मजेशीर खेळ देखील पाहायला मिळतील. विशेष म्हणजे प्रेक्षकांना ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा शो प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर मोफत स्ट्रीम करता येईल. म्हणजे हा शो पाहण्यासाठी तुम्हाला प्लॅनेट मराठीचं सब्सस्क्रिप्शन घ्यावं लागणार नाही.

या शोचा हा पहिला सिझन असून या सिझनमध्ये एकूण 8 एपिसोड्स आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ चा पहिला एपिसोड येत्या 25 जानेवारीला प्लॅनेट मराठीवर उपलब्ध होईल. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी या शोचा नवा एपिसोड रिलीज केला जाईल. पहिल्या एपिसोडमध्ये अभिजीत पानसे आणि तेजस्विनी पंडित आपल्या भेटीस येणार आहेत. तर पुढील एपिसोड्समध्ये अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, ओम राऊत, प्राजक्ता माळी हे कलाकार झळकतील.

तसेच प्लॅनेट मराठीनं रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये मराठी इंस्टाग्राम सिलिब्रेटी करण सोनावणे (focusedIndian) आणि निल (just_neel_things) देखील दिसले आहेत. त्याचबरोबर अक्षय कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे, उर्मिला कोठारे, क्रांती रेडकर, ऋतुजा बागवे, संदीप पाठक आणि पुष्कर श्रोत्री यांच्याशी मारलेल्या गप्पा देखील या शो मध्ये पाहायला मिळतील.

The post Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/planet-marathi-new-show-patala-tar-ghya/feed/ 0