MediaTek Dimensity 820 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 31 May 2020 12:14:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi 10X असेल जगातील पहिला डायमनसिटी 820 वर चालणार फोन, 26 मे ला असेल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-10x-with-mediatek-dimensity-820-5g-launching-on-26-may-redmi-note-9-pro-like-design/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-10x-with-mediatek-dimensity-820-5g-launching-on-26-may-redmi-note-9-pro-like-design/#respond Mon, 18 May 2020 12:11:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7192 चिपसेट बद्दल बोलायचे झाले तर हा चिपसेट 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेला पण सपोर्ट करतो. त्यामुळे आशा आहे कि Redmi 10X मध्ये पण असाच डिस्प्ले दिला जाईल.

The post Redmi 10X असेल जगातील पहिला डायमनसिटी 820 वर चालणार फोन, 26 मे ला असेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरवातीला बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि शाओमीच्या दुसऱ्या ब्रँड रेडमी आपल्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Redmi 10X नावाने बाजारात येईल. गेल्या काही दिवसांत या फोनचे अनेक लीक्स समोर आले आहेत, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती मिळाली आहे. पण आता लीक्स येत असताना कंपनीने अधिकृतपणे फोन लॉन्चची घोषणा केली आहे. शाओमी रेडमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 26 मे ला आपला लेटेस्ट डिवाईस Redmi 10X टेक मार्केट मध्ये लॉन्च करेल.

Redmi 10X च्या लॉन्चची माहिती रेडमीने आपल्या अधिकृत वेईबो अकाउंटच्या माध्यमातून दिली आहे. टीजर ईमेज पोस्ट करत सांगण्यात आले आहे कि या 26 मे ला कंपनी चीनी बाजारात आपला नवीन फोन रेडमी 10एक्स लॉन्च करेल. पोस्ट मध्ये लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच कंपनीने फोनचा फोटो पण शेयर केला आहे ज्यामुळे डिवाईसच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे रेडमी ने Redmi 10X मधील चिपसेटचा पण खुलासा केला आहे. हा फोन मीडियाटेकच्या 5जी चिपसेट डायमनसिटी 820 वर लॉन्च केला जाईल.

जगातील पहिला Dimensity 820 फोन

सर्वात आधी सांगू इच्छितो कि MediaTek Dimensity 820 चिपसेट वर आता पर्यंत कोणत्याही कंपनीचा कोणताही फोन लॉन्च झालेला नाही. त्यामुळे Redmi 10X जगातील पहिला फोन असेल जो या चिपसेट वर लॉन्च होईल. मीडियाटेकचा हा लेटेस्ट चिपसेट 5G इनेबल्ड आहे. म्हणजे रेडमी 10एक्स पण 5जी कनेक्टिविटी सह येईल. चिपसेट बद्दल बोलायचे झाले तर हा चिपसेट 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेला पण सपोर्ट करतो. त्यामुळे आशा आहे कि Redmi 10X मध्ये पण असाच डिस्प्ले दिला जाईल.

टीजर ईमेज मध्ये रेडमी 10एक्स फोन Redmi Note 9 Pro सारख्या रियर डिजाईन सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे जो चौकोनी आकारात पॅनलच्या मधोमध आहे. यात दोन कॅमेरा सेंसर वर, दोन खाली आणि त्याखाली फ्लॅश लाईट आहे. टीजर मध्ये फोनचा साईड पॅनल पण दिसत आहे. हा फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण आहे.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग मध्ये रेडमी 10एक्स मध्ये 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे पण समोर आले आहे. हा फोन गीकबेंच वर 6 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर सिंगल-कोर मध्ये या फोनला 360 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये रेडमी 10एक्स ला 1287 स्कोर देण्यात आला आहे.

Redmi 10X गूगल प्ले कंसोल वर 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. इथे फोनची स्क्रीन साईज सांगण्यात आलेली नाही पण असा खुलासा झाला आहे कि रेडमी 10एक्स चा डिस्प्ले 440DPI सह येईल. इथे पण फोन एंडरॉयड 10 सह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट सह दाखवण्यात आला होता. या लिस्टिंग मध्ये Redmi 10X 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला होता, त्यामुळे असे म्हणता येईल कि हा फोन 6 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. तसेच फोन मध्ये ग्राफिक्ससाठी माली जी52 जीपीयू असल्याचे सांगण्यात आले होते.

The post Redmi 10X असेल जगातील पहिला डायमनसिटी 820 वर चालणार फोन, 26 मे ला असेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-10x-with-mediatek-dimensity-820-5g-launching-on-26-may-redmi-note-9-pro-like-design/feed/ 0