Mediatek G70 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Dec 2019 13:57:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: मीडियाटेक Helio G70 चिपसेट सह लॉन्च होईल Xiaomi Redmi 9 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-to-launch-on-mediatek-helio-g70-soc-with-4-gb-ram-and-64-gb-memory/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-to-launch-on-mediatek-helio-g70-soc-with-4-gb-ram-and-64-gb-memory/#respond Wed, 18 Dec 2019 13:57:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6083 मीडियाटेक आणि शाओमीची हि जोडी लोकांना आवडली आणि कंपनी आता हि अजून पुढे जाणार आहे.

The post Exclusive: मीडियाटेक Helio G70 चिपसेट सह लॉन्च होईल Xiaomi Redmi 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी नोव्हेंबर मध्ये Xiaomi ने Redmi Note 8 Pro मॉडेल सादर केला होता. हा फोन आपल्या 64 MP कॅमेऱ्याव्यतिरिक्त प्रोसेसरमुळे पण खूप चर्चेत होता. कारण कंपनीने अनेक वर्षानंतर भारतात आपल्या Redmi Note सीरीज मध्ये Mediatek चिपसेटचा वापर केला होता. Xiaomi Redmi Note 8 Pro मीडियाटेक Helio G90T चिपसेट वर सादर करण्यात आला होता. जेव्हा फोन लॉन्च झाला तेव्हा पण याने कमी रेंज मध्ये आपल्या दामदार गेमिंग परफॉर्मेंस आणि स्मूद मल्टी टास्किंगमुळे लोकांना आकर्षित केले. मीडियाटेक आणि शाओमीची हि जोडी लोकांना आवडली आणि कंपनी आता हि अजून पुढे जाणार आहे. 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार कंपनी वर्ष 2020 च्या सुरवातीला Redmi 9 मॉडेल सादर करणार आहे आणि हा फोन मीडियाटेक Helio G70 चिपसेट वर आधारित असेल.

शाओमी रेडमी 9 चे स्पेसिफिकेशन

आम्ही सांगू शकत नाही कि रेडमी 9, मीडियाटे जी70 वर लॉन्च होणारा पहिला फोन असेल किंवा नाही पण या फोन बद्दल शाओमी आणि मीडियाटेकची भागेदारी झाली आहे. शाओमी रेडमी 9 चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये तुम्हाला 6.6 इंच एचडी+ पिक्सल रेजल्यूशन असलेली स्क्रीन मिळेल. हा फोन वॉटर ड्रॉप नॉच सह लॉन्च केला जाईल.

राहिला प्रश्न मेमरीचा तर आता पर्यंत जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हा फोन मध्ये तुम्हाला एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट पण मिळेल. इतर स्पेसिफिकेशन बद्दल अजून जास्त माहिती नाही मिळाली.

मीडियाटेक हेलियो जी70 प्रोसेसर

मीडियाटेकने वर्ष 2019 मध्ये आपल्या हेलियो जी सीरीज चिपसेटची सुरवात केली आहे. या सीरीज अंतर्गत पहिला प्रोसेसर जी90टी सादर करण्यात आला होता जो आता पर्यंत फक्त रेडमी नोट 8 प्रो मध्ये उपलब्ध आहे. हा खासकरून गेमिंग साठी डिजाइन केला गेला आहे. आता कंपनीने कमी रेंजच्या फोन साठी हेलिया जी70 चिपसेटची तयारी केली आहे. आता पर्यंत या प्रोसेसर बद्दल जास्त माहिती नाही मिळेल पण बातमीनुसार हेलिया जी सीरीज मध्ये आणि पण प्रोसेसर येणार आहे ज्यांचा खुलासा कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत करणार आहे.

न्यूज साभार: केशव खेडा

The post Exclusive: मीडियाटेक Helio G70 चिपसेट सह लॉन्च होईल Xiaomi Redmi 9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9-to-launch-on-mediatek-helio-g70-soc-with-4-gb-ram-and-64-gb-memory/feed/ 0