Meizu 16 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Aug 2018 14:00:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 14:00:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1638 मीजू ने चीन मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्लस स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे आगामी काळात जगभरातील बाजारांत पण येतील.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत होते की कंपनी दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन मीजू 16 व मीजू 16 प्लस वर काम करत आहे आणि लवकरच हे अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केले जातील. त्यानुसार आज मीजू ने हे दोन्ही दमदार स्मार्टफोन अंतर्राष्ट्रीय बाजारात सादर केले आहेत. मीजू ने चीन मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्लस स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे आगामी काळात जगभरातील बाजारांत पण येतील.

मीजू 16 आणि मीजू 16 प्लस ची एक मोठी खासियत ही आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मीजू कंपनी चे पहिले असे स्मार्टफोन आहेत ज्यात अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आले आहेत तसेच फोनच्या फुलव्यू डिस्प्ले खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाहेरून दिसत नाही पण फोनच्या स्क्रीन वर टच करतचा फोन अनलॉक करतो.

मीजू च्या नवीन स्मार्टफोंस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मीजू 16 मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे तर मीजू 16 प्लस 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मॉडेल फ्लेम 7 ओएस आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आले आहेत त्याचबरोबर हे 2.8गीगाहर्ट्ज क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतात. ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये हेक्सागॉन 685 डीएसपी एआई इंजिन आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मीजू ने आपले नवीन स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सह सादर केले आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 380 प्राइमरी सेंसर तसेच 20-मेगापिक्सलचा आईएमएक्स350 सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मीजू 16 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तर मीजू 16 प्लस 3,640एमएएच बॅटरी ला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतात.

​कंपनी ने मीजू 16 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम/ 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/ 128जीबी मेमरी वर लॉन्च केला आहे. या तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 2,698 युआन (जवळपास 27,000 रुपये), 2,998 युआन (जवळपास 30,000 रुपये) आणि 3,298 युआन (जवळपास 33,000 रुपये) आहे.

तसेच मीजू 16 प्लस 6जीबी रॅम/ 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम/ 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/ 256जीबी मेमरी वर लॉन्च करण्यात आला आहे. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 3,198 युआन (तकरीबन 32,000 रुपये), 3,498 युआन (जवळपास 35,000 रुपये) आणि 3,998 युआन (जवळपास 40,000 रुपये) आहे.

The post 8जीबी रॅम सह लॉन्च झाला मीजू 16 प्लस, स्पेसिफिकेशन्स इतके दमदार की जे सर्वांना मागे टाकतील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-plus-official-in-china-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 12:20:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1077 मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल.

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8, मी 8 एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन लॉन्च केला होता. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनी ने फ्लॅगशिप डिवाईस च्या रुपात सादर केले होते. तसेच आता टेक कंपनी मीजू ने शाओमी ला टक्कर देण्याची तयारी केली आहे. मीजू कडून बातमी आली आहे की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन मीजू एक्स8 लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस शाओमी मी8 एसई ला टक्कर देईल. ही माहिती कोणत्याही लीक ने नाही तर स्वतः कंपनी फाउंडर ने दिली आहे.

मीजू चे फाउंडर जॅक वाँग ने कंपनी च्या आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 बद्दल बोलले आहे की हा स्मार्टफोन शाओमी मी 8 एसई पेक्षा चांगला आणि फास्ट असेल. मीडिया रिपोर्ट नुसार वाँग ने सांगितले आहे की मीजू एक्स8 क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाईल आणि हा फोन शाओमी मी 8 एसई च्या तुलनेत उत्तम असेल. जॅक नुसार मीजू एक्स8 मध्ये 2.2गीगाहर्ट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असेल आणि ऐड्रेनो 616 याला ग्राफिक्स ची क्षमता देईल.

मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल. वाॅग नुसार कंपनी मीजू एक्स8 ची किंमत 2,000 युआन पेक्षा जास्त वर जाऊ देणार नाही. ही चीनी किंमत भारतीय करंसी नुसार 21,000 रुपयांचा आसपास येते.

मीजू एक्स8 मध्ये शाओमी मी 8 एसई पेक्षा मोठा डिस्प्ले दिला जाणार असल्याचे पण कंपनी फाउंडर ने सांगितले आहे. अशा आहे की हा फोन आगामी काही आठवड्यांमध्ये अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर येईल. तसेच कंपनी फाउंडर च्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की मीजू आपला आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 सरळ शाओमी टक्कर म्हणून लॉन्च करेल.

शाओमी मी 8 एसई ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/feed/ 0
मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 12:29:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=905 या लीक नुसार मीजू 16 चा 64जीबी वेरिएंट 2,999 युआन आणि 128जीबी वेरिएंट 3,299 युआन च्या किंमतीत लॉन्च होईल.

The post मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मीजू कंपनी ने आपली एनिर्वसरी साजरी करताना मीजू 15, मीजू 15 प्लस आणि मीजू 15 लाइट स्मार्टफोन सादर केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन वेरिएंट अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च झाले आहेत. मीजू 15 सीरीज चे हे स्मार्टफोंस हिट झाल्यानंतर कंपनी चे फाउंडर हुआंग झांग ने घोषणा केली होती की कंपनी ऑगस्ट महिन्यापर्यंत आपली ही सीरीज पुढे नेत मीजू 16 स्मार्टफोन लॉन्च करेल. तसेच मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आले आहे की मीजू आपल्या या सीरीज मध्ये मीजू 16 आणि मीजू 16 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल.

आईटी होम ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की मीजू आपल्या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन मॉडल्स वर काम करत आहे जे मीजू 16 आणि मीजू 16 प्रो नावाने बाजारात येतील. रिपोर्ट नुसार हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च केले जातील ज्यांचा स्क्रीन टू बॉडी रेशियो खुप कमी असेल. या दोन्ही फोन मध्ये नॉच नसेल. मीजू 16 मध्ये 5.6-इंचाचा डिसप्ले दिला जाईल तर मीजू 16 प्रो 6.1-इंचाच्या डिस्प्ले सह येईल.

रिपोर्ट नुसार हे दोन्ही फोन लेटेस्ट एंडरॉयड सह फ्लॅम 7.5 ओएस सह येतील तसेच क्वालकॉम च्या सर्वात फास्ट आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतील. लीक नुसार दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. कंपनी ने यात 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की मीजू च्या या फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक असेल.

मीजू 16 आणि मीजू 16 प्रो मध्ये 3डी प्रेस आणि एआई टेक्निक असेल. पावर बॅकअप साठी मीजू 16 मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते तर मीजू 16 प्रो 3,600एमएएच च्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो जो वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल. मीजू 16 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो तसेच मीजू 16 प्रो कंपनी 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम सह 256जीबी च्या स्टोरेज वर लॉन्च करू शकते.

मीजू च्या या आगामी स्मार्टफोंस ची किंमत पण या रिपोर्ट मध्ये शेयर करण्यात आली आहे. या लीक नुसार मीजू 16 चा 64जीबी वेरिएंट 2,999 युआन आणि 128जीबी वेरिएंट 3,299 युआन च्या किंमतीत लॉन्च होईल. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 31,000 रुपये आणि 35,000 रुपयांच्या आसपास असेल. त्याचप्रमाणे मीजू 16 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट 3,699 युआन (जवळपास 39,000 रुपये) आणि 8जीबी रॅम वेरिएंट 3,999 युआन (जवळपास 42,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

The post मीजू 16 आणि मीजू 16 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स चा खुलासा, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी सह स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-16-meizu-16-pro-full-specification-price-feature-in-marathi/feed/ 0