Meizu X8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 27 Jun 2018 12:20:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 12:20:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1077 मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल.

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने काही दिवसांपूर्वी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8, मी 8 एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन लॉन्च केला होता. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनी ने फ्लॅगशिप डिवाईस च्या रुपात सादर केले होते. तसेच आता टेक कंपनी मीजू ने शाओमी ला टक्कर देण्याची तयारी केली आहे. मीजू कडून बातमी आली आहे की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन मीजू एक्स8 लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस शाओमी मी8 एसई ला टक्कर देईल. ही माहिती कोणत्याही लीक ने नाही तर स्वतः कंपनी फाउंडर ने दिली आहे.

मीजू चे फाउंडर जॅक वाँग ने कंपनी च्या आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 बद्दल बोलले आहे की हा स्मार्टफोन शाओमी मी 8 एसई पेक्षा चांगला आणि फास्ट असेल. मीडिया रिपोर्ट नुसार वाँग ने सांगितले आहे की मीजू एक्स8 क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाईल आणि हा फोन शाओमी मी 8 एसई च्या तुलनेत उत्तम असेल. जॅक नुसार मीजू एक्स8 मध्ये 2.2गीगाहर्ट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असेल आणि ऐड्रेनो 616 याला ग्राफिक्स ची क्षमता देईल.

मीजू एक्स8 बद्दल कंपनी फाउंडर ने दावा केला आहे की हा फोन शाओमी मी 8 एसई पेक्षा अधि​क पावर फुल स्पेसिफिकेशन्स सह येईल पण तरीही या फोन ची किंमत मी 8 एसई पेक्षा कमी असेल. वाॅग नुसार कंपनी मीजू एक्स8 ची किंमत 2,000 युआन पेक्षा जास्त वर जाऊ देणार नाही. ही चीनी किंमत भारतीय करंसी नुसार 21,000 रुपयांचा आसपास येते.

मीजू एक्स8 मध्ये शाओमी मी 8 एसई पेक्षा मोठा डिस्प्ले दिला जाणार असल्याचे पण कंपनी फाउंडर ने सांगितले आहे. अशा आहे की हा फोन आगामी काही आठवड्यांमध्ये अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर येईल. तसेच कंपनी फाउंडर च्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की मीजू आपला आगामी स्मार्टफोन मीजू एक्स8 सरळ शाओमी टक्कर म्हणून लॉन्च करेल.

शाओमी मी 8 एसई ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी मी 8 एसई पेक्षा जास्त ताकदवान असेल मीजू एक्स8, कंपनी फाउंडर ने केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/meizu-x8-will-be-better-than-xiaomi-mi-8-se-said-company-founder-jack-wong-in-marathi/feed/ 0