Mi 10S 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Mar 2021 09:29:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला पावरफुल Mi 10S 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10s-5g-launched-with-snapdragon-870-soc-108mp-quad-camera-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10s-5g-launched-with-snapdragon-870-soc-108mp-quad-camera-price-specs/#respond Wed, 10 Mar 2021 09:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10308 Xiaomi Mi 10S 5G एंडरॉयड 11 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 11 सह काम करतो.

The post Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला पावरफुल Mi 10S 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाईल फोन Mi 10S 5G सादर केला आहे. नावावरून समजले असेल की हा फोन 5जी कनेक्टिविटीसह बाजारात आला आहे ज्याने चीनी मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. शाओमी मी 10एस स्मार्टफोन 108 मेगापिक्सलच्या क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो, त्याचबरोबर फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया मी 10एस ची पावर.

Mi 10S 5G
शाओमी मी 10एस 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. मी 10एस चा डिस्प्ले एचडीआर 10+, 1120निट्स ब्राइटनेस, पी3 वाइड कलर आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारख्या फीचर्ससह येतो.

Xiaomi Mi 10S 5G एंडरॉयड 11 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 11 सह काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्वॉलकॉमचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी मी 10एस मध्ये एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.0 स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी मी 10एस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये एफ/1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा सेंसर प्रमुख आहे जो ओआईएस सारख्या फीचरसह येतो. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर आणि तेवढ्याच अपर्चरच्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 10S 5G एक डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5G सोबत 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,780एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

किंमत
Mi 10S ने तीन वेरिएंट्स मध्ये बाजारात एंट्री केली आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत RMB 3,299 (जवळपास 37,000 रुपये) आहे. तर दुसरा वेरिएंट 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: RMB 3,499 (जवळपास 39,200 रुपये) आणि RMB 3,799 (जवळपास 42,600 रुपये) आहे.

The post Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला पावरफुल Mi 10S 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10s-5g-launched-with-snapdragon-870-soc-108mp-quad-camera-price-specs/feed/ 0