MI LED TV 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 01 May 2018 07:08:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी फॅन्सना झटका! रेडमी नोट 5 प्रो झाला 1,000 रुपये महाग , मी एलईडी टीवी 4 (55) ची किंमत पण 5,000 रुपयांनी वाढली https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-5-pro-and-mi-led-tv-4-prices-increased-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-5-pro-and-mi-led-tv-4-prices-increased-in-marathi/#respond Mon, 30 Apr 2018 12:27:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=172 आयातीवर द्यावा लागणारा कर भरून काढण्यासाठी शाओमी ने आपल्या या दोन प्रोडक्ट्स ची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

The post शाओमी फॅन्सना झटका! रेडमी नोट 5 प्रो झाला 1,000 रुपये महाग , मी एलईडी टीवी 4 (55) ची किंमत पण 5,000 रुपयांनी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने वॅलेंटाईन च्या दिवशी आपल्या फॅन्सना भेट म्हणून भारतात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होते. या दोन्ही फोन्स सोबत कंपनी ने त्यावेळी आपल्या स्मार्टटीवी ची सुरवात करत मी एलईडी टीवी 4 (55) पण भारतात आणली होती. शाओमी च्या स्मार्ट टीवी सोबत रेडमी नोट 5 प्रो ने पण लॉन्च होताच सेल चे नवीन रेकॉर्ड बनवने सुरू केले होते. पण आता शाओमी कडून अशी बातमी येत आहे की ज्यामुळे शाओमी फॅन्सना झटका बसेल. कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) च्या किंमती वाढवल्या आहेत.

शाओमी ने भारतात रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) चे भाव वाढवले आहेत. शाओमी ने रेडमी नोट 5 प्रो च्या किंमतीत 1,000 रूपयांची तसेच मी एलईडी टीवी 4 (55) च्या किंमतीत 5,000 रूपयांची वाढ केली आहे. शाओमी इंडिया च्या या निर्णयानंतर 1 मे पासून 13,999 रुपयांचा रेडमी नोट 5 प्रो आता 14,999 रुपयांमध्ये मिळेल. तर 39,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी एलईडी टीवी 4 (55) आता 44,999 रुपयांमध्ये विकला जाईल.

विशेष म्हणजे 1,000 रूपयांची वाढ रेडमी नोट 5 प्रो च्या 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वाले वेरिएंट मध्ये करण्यात आली आहे. शाओमी इंडिया चे हेड मनु कुमार जैन नुसार शाओमी रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) च्या किंमतीत झालेली वाढ वाढलेल्या इंपोर्ट ड्यूटी मुळे आहे.

मनु जैन चे म्हणणे आहे की शाओमी रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) ची मागणी देशात जास्त आहे आणि सर्व ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणजे रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) ग्राहकांना उपलब्ध करण्यासाठी कंपनी पीसीबीए सारखे काही पार्ट्स दुसर्‍या देशातून विकत घेत आहे आणि बाहेरील देशातील हे पार्ट्स आयात करण्यासाठी कंपनी ला अतिरिक्त कर द्यावा लागत आहे.


आयातीवर द्यावा लागणारा कर भरून काढण्यासाठी शाओमी ने आपल्या या दोन प्रोडक्ट्स ची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) दोन्ही शाओमी चे असे डिवाईस आहेत जे देशात सर्वात जास्त विकले जात आहेत.

या दोन्ही प्रोडक्ट्स च्या किंमती वाढल्या नंतर हे स्पष्ट झाले आहे की रेडमी नोट 5 प्रो आणि मी एलईडी टीवी 4 (55) चे प्रमाण वाढेल आणि लोकांना हा स्मार्टफोन आणि ही स्मार्टटीवी मिळू शकतील. तर दुसरीकडे मेक इन इंडिया बोलून लोकांपर्यंत हे डिवाईस पोहोचवणे आणि हिट होताच बाहेरून पार्ट्स घेऊन येऊन किंमत वाढवून विकणे शाओमी फॅन्सना किती आवडेल, हे तर वेळ आल्यावर कळेल. यावर तुमचे काय मत आहे ते नक्की कळवा

The post शाओमी फॅन्सना झटका! रेडमी नोट 5 प्रो झाला 1,000 रुपये महाग , मी एलईडी टीवी 4 (55) ची किंमत पण 5,000 रुपयांनी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-5-pro-and-mi-led-tv-4-prices-increased-in-marathi/feed/ 0