Mi LED TV 4C Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Jul 2019 13:02:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा नवीन डाव, कमी केल्या 3 स्मार्ट टेलीविजनच्या किंमती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-led-tv-4a-pro-43-inch-32-inch-4c-pro-price-drop-india-offline-stores/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-led-tv-4a-pro-43-inch-32-inch-4c-pro-price-drop-india-offline-stores/#respond Tue, 23 Jul 2019 13:02:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4880 कंपनीने ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण या स्मार्टटीव्हीच्या किंमती कमी केल्या आहेत.

The post Xiaomi चा नवीन डाव, कमी केल्या 3 स्मार्ट टेलीविजनच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजारात नंबर वन ठरलेली Xiaomi देशातील टेलीविजन बाजारात पण वेगाने पुढे जात आहे. कमी किंमतीत स्मार्टटीव्ही देणाऱ्या या कंपनीने Samsung, Sony व LG सारख्या ब्रँडसना चांगलीच टक्कर दिली आहे. Xiaomi चे Mi LED TV 4A PRO आणि Mi LED TV 4C PRO सारखे स्मार्टटीव्ही मॉडेल देशात लोकांना आवडले आहेत. तर आज आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने आपल्या स्मार्ट टेलीविजनच्या किंमती अजून कमी केल्या आहेत ज्या आजपासूनच नव्या किंमतींवर देशात सेलसाठी उपलब्ध होतील.

Xiaomi चे Mi LED TV 4A PRO आणि Mi LED TV 4C PRO स्मार्टटीव्ही मॉडेल भारतात ऑनलाईन शॉपिंग साइट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहेत. कंपनीने या टेलीविजनच्या किंमती ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आधीच कमी केल्या आहेत पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण या स्मार्टटीव्हीच्या किंमती कमी केल्या आहेत.

Mi LED TV 4A PRO 43-इंच मॉडेल बद्दल बोलायचे तर Xiaomi ने हि स्मार्टटीव्ही 22,999 रुपयांमध्ये लॉन्च केली होती. या टीव्हीच्या किंमतीत कपात करत Xiaomi ने या मॉडेलचे मूल्य थेट 1,000 रुपयांनी कमी केले आहे. प्राइस कट नंतर Mi LED TV 4A PRO 43-इंच मॉडेल तुमच्या जवळच्या दुकानातून आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi LED TV 4A PRO 32-इंच मॉडेलचे मूल्य पण कंपनीने कमी केले आहे. हा स्मार्टटीव्ही मॉडेल भारतात 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा टीव्ही 12,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर आता ऑफलाईन बाजारात पण टीव्हीची किंमत 500 रुपयांनी कमी करत Xiaomi ने Mi LED TV 4A PRO 32-इंच मॉडेलची किंमत 12,499 रुपये केली आहे.

Mi LED TV 4C PRO 32-इंच मॉडेल वाल्या स्मार्टटीव्ही बद्दल बोलायचे तर कंपनीने हा टेलीविजन मॉडेल 12,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. Xiaomi ने या स्मार्टटीव्हीच्या मॉडेलची किंमत पण 500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर Mi LED TV 4C PRO चा 32-इंच डिस्प्ले वाला मॉडेल 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi LED TV 4A PRO

Xiaomi Mi LED TV 4A PRO फुलएचडी एलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 60गीगाहर्ट्ज रिफ्रेश रेट सह 178-डिग्रीचा व्यूइंग एंगल देतो. Mi LED TV 4A PRO एंडरॉयड आधारित आहे जो शाओमी पॅचवॉल वर चालतो. तसेच कंपनीने Mi LED TV 4A PRO मध्ये बिल्ट इन क्रोम कॉस्ट पण दिला आहे.

Mi LED TV 4A PRO 64-बिट क्वॉड-कोर एमलॉजिग प्रोसेसर वर चालतो. हा स्मार्टटीव्ही 10 वॉटच्या 2 स्टीरियो स्पीकर्स सह येतो. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन साठी या टीव्ही मध्ये 3 एचडीएमआई, 2 यूएसबी, 1 इथरनेट आणि 1 पीडीआईएफ पोर्ट सोबत ब्लूटूथ तसेच 2.4गीगाहर्ट्ज वाईफाई सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Xiaomi या टीव्ही सोबत 7,00,000 तासांपेक्षा जास्त कंटेंट देत आहे. यूजर्स Mi LED TV 4A PRO मध्ये गूगल प्ले द्वारे आपले आवडीचे ऍप पण डाउनलोड करू शकतील.

Mi LED TV 4C PRO

Xiaomi Mi LED TV 4C PRO प्रो (32) शाओमी ने 1368 x 768 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 32-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर केली आहे. या टीवी मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Mi LED TV 4C PRO पण एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम सोबत शाओमी च्या पॅचवॉल वर तसेच 64बिट एमलॉजिक क्वॉड-कोर चिपसेट वर चालते त्याचबरोबर ग्राफिक्स साठी यात माली-टी450 जीपीयू देण्यात आला आहे.

Mi LED TV 4C PRO पण वाईफाई व ब्लूटूथ सोबत 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत त्याचबरोबर यात डीटीएस-एचडी सराउंट साउंड सपोर्ट वाले 20वॉल्ट चे स्टीरियो स्पीकर्स पण आहेत. या टेलीविजन मध्ये गूगल प्ले स्टोर मधून ऍप्स इंस्टाल पण करता येतात त्याचबरोबर यूट्यूब व गूगल प्ले चा पण वापर करता येतो. प्रो सीरीज च्या या तिन्ही टेलीविजन मध्ये क्रोमकॉस्ट आहे तसेच यूजर्स यात नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राइम , वूट, झी5, हॉटस्टॉर, हंगामा असे 14 कटेंट प्लॅटफार्म वापरू शकतात.

The post Xiaomi चा नवीन डाव, कमी केल्या 3 स्मार्ट टेलीविजनच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-led-tv-4a-pro-43-inch-32-inch-4c-pro-price-drop-india-offline-stores/feed/ 0
शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 11:07:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2823 शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ब्रँड भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रॅण्ड बनला आहे. अनेक वर्षे भारतीय बाजारावर राज्य करणाऱ्या सॅमसंगला मागे टाकत शाओमी ने आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेलचे नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. शानदार स्पेसिफिकेशन्स कमी किंमतीती दिल्यामुळे शाओमीची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. [ना देशातील नंबर वन ब्रँड शाओमीच्या फॅन्सना कंपनी ने मोठा झटका दिला आहे. दिवाळी संपताच शाओमी इंडिया ने आपल्या स्मार्टफोन्स सोबतच इतर अनेक प्रोडक्टसच्या किंमती वाढवल्या आहते.

शाओमी इंडिया ने रेडमी सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन्स रेडमी 6 आणि रेडमी 6ए च्या किंमती वाढवल्या आहेत. या दोन हिट स्मार्टफोन्स सोबतच कंपनी ने आपल्या दोन स्मार्ट टीवी आणि मी पावर बँक च्या किंमती पण वाढवल्या आहेत. शाओमी ने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमतीती 2,000 रुपयांची वाढ केली आहे. शाओमी ने वाढवलेल्या किंमतींचा परिणाम स्मार्टफोन वेरिएंट्स, दोन स्मार्ट टीवी आणि एका पावर बँकेवर झाला आहे.

शाओमी रेडमी 6ए कंपनी ने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये देशात लॉन्च केला होता. हा फोन 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. फोनचा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तसेच 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण कंपनी ने आता फोनच्या 32जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती रुपये तसेच 16जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीती 600 रुपयांची वाढ केली आहे. ज्यामुळे रेडमी 6ए चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये मिळेल तर 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,599 रुपयांमध्ये मिळेल.

त्याचप्रमाणे शाओमी ने 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वाल्या रेडमी 6 स्मार्टफोनच्या किंमतीती पण 500 रुपयांची वाढ केली आहे. हा फोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण आता किंमत वाढल्याने हा 8,499 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागेल. विशेष म्हणजे आॅफलाईन रिटेल स्टोर वरून रेडमी 6ए चा 32जीबी वेरिएंट विकत घेताना 7,799 रुपये तर 16जीबी वे​रिएंट विकत घेताना 6,599 रुपये द्यावे लागतील. तसेच रेडमी 6 चा 3जीबी रॅम वेरिएंट आॅफलाईन रिटेल स्टोर वरून 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी ने 32इंच स्क्रीन वाल्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची किंमत पण 1,000 रुपयांनी वाढवली आहे त्यामुळे हि स्मार्टटीवी आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी एलईडी टीवी 4ए प्रो ची किंमत कंपनी ने 2,000 रुपयांनी वाढवली आहे. हा टीव्ही विकत घेण्यासाठी आता 31,999 रुपये द्यावे लागतील. तसेच शाओमी इंडिया ने 10000एमएएच बॅटरी असलेल्या मी पावरबँक 2आई ब्लॅक ची किंमत पण 100 रुपयांनी वाढवली आहे. हि पावरबँक आता 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी फॅन्सना झटका : रेडमी स्मार्टफोन्स सोबतच अनेक मी प्रोडक्ट्सच्या किंमती वाढल्या, 2,000 रुपयांपर्यंतची आहे वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-price-hike-redmi-6-redmi-6a-mi-smart-tv-increased-in-marathi/feed/ 0