Mi Pay - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Mar 2019 11:29:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/#respond Tue, 19 Mar 2019 11:29:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3892 शाओमी मी पे यूपीआई आधारित डिजीटल पेमेंट इंटरफेस आहे ज्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण खूप सोप्पी बनवण्यात आली आहे.

The post शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील सर्वत मोठी मोबाईल कंपनी बनली आहे. चांगल्या बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन्स आणणाऱ्या या कंपनीने थोड्याच वेळात मोठा युजरबेस बनवला आहे. स्मार्टफोनच्या क्षेत्रात अव्वल असणाण्या सोबतच शाओमी ने टेलीविजन बाजारात पण सॅमसंग व सोनी सारख्या कंपन्यांना चांगली स्पर्धा दिली आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीवी सोबत शाओमीने भारतात स्मार्ट गॅजेट पण आणले आहेत जे खूप लोकांना आवडले आहेत. तर आज भारतात एका नवीन इनिंगची सुरुवात करत शाओमी ने देशात आपली पेमेंट सर्विस सुरु केली आणि याला ‘मी पे’ असे नाव दिले आहे.

शाओमीने मी पे लॉन्च करणे फक्त शाओमी स्मार्टफोन यूजर्स आणि मी फॅन्ससाठी मोठी भेट नाही तर सोबतच डिजीटल भारताच्या मोहिमेत पण हे शाओमीचे मोठे योगदान आहे. शाओमी मी पे देशात ऑनलाइन ट्रांजेक्शन्सना प्रोत्साहन देईल त्याचबरोबर पेटीएम आणि मोबिक्विक सारख्या डिजीटल वॉलेटला मी पे कडून चांगली मिळणार आहे. शाओमी मी पे यूपीआई आधारित डिजीटल पेमेंट इंटरफेस आहे ज्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण खूप सोप्पी बनवण्यात आली आहे.

शाओमी मी पे
1. शाओमी म्हणते कि मी पे वापरताना मनी ट्रांसफर साठी जास्त स्टेप्स फोल्लो कराव्या लागणार नाहीत. या ऍप के मधून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारचे पेमेंट सहज होईल.

मी पे द्वारे यूपीआई सोबतच बँक अकाउंट नंबर आणि आईएफएससी कोड सारख्या डिटेल्स द्वारे पण पैसे पाठवले जाऊ शकतात. शाओमी ने मी पे मध्ये सेंड, रिसीव आणि स्कॅन तिन्ही फीचर्स दिले आहेत. मी पे द्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतील.

2. मी पे शाओमीने कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई मध्ये पण इंटिग्रेट केला आहे ज्यामुळे कोणत्याही शाओमी फोन वर या ऍपचा वापर खूप सोप्पा होईल. फोन मध्ये आलेल्या मेसेज द्वारे थेट दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवता येतील. मेसेज व्यतिरिक्त फोन कॉन्टेक्ट बुक आणि कॅमेऱ्याद्वारे पण शाओमी स्मार्टफोन वरून थेट पैशांची देवाणघेवाण करता येइल.

मी पे एखाद्या पेमेंट सर्विस सोबतच डिजीटल वॉलेटचे पण काम करेल. मी ऍप वर पैसे सेंड आणि रिसीव कारण्यासोबतच मोबाईल रिचार्ज आणि पेमेंट करता येईल. मी पे मधून गॅस, पाणी आणि वीज इत्यादी बिल्स पण भरता येतील. मी पे द्वारे शाओमीच्या वेबसाइट मी डॉटा कॉम वर पण शॉपिंग करता येईल.

3. शाओमी म्हणते कि मी पे एनपीसीआई द्वारा सर्टिफाइड करण्यात आला आहे ज्यामुळे हा सुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. मी पे मधून केले जाणारे सर्व ट्रांजेक्शन पूर्णपणे सुरक्षित असतील. मी पे प्लॅटफॉर्म वर कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सोबतच नेट बँकिंग द्वारे पण पैशांची देवाणघेवाण करता येईल. तसेच मी पे मधील स्मार्ट रिमाइंडरचा ऑप्शन पण याला खास बनवतो.

The post शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/feed/ 0