Micromax Bharat 4 Diwali Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 30 Oct 2018 08:03:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मायक्रोमॅक्स ने लॉन्च केले दोन स्वस्त एंडरॉयड गो फोन, भारत 5 इनफिनिटी एडिशन आणि भारत 4 दिवाळी एडिशन https://www.91mobiles.com/marathi/micromax-bharat-5-infinity-bharat-4-diwali-edition-android-go-launch-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-bharat-5-infinity-bharat-4-diwali-edition-android-go-launch-price-specifications-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 08:03:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2681 गूगल ऍप्स चे हे गो वर्जन इंटरनेट कमी वापरतात तसेच फोनची प्रोसेसिंग पण फास्ट करतात. एंडरॉयड गो कमी रॅम वर पण लॅग फ्री प्रोसेसिंग देतो.

The post मायक्रोमॅक्स ने लॉन्च केले दोन स्वस्त एंडरॉयड गो फोन, भारत 5 इनफिनिटी एडिशन आणि भारत 4 दिवाळी एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मायक्रोमॅक्स ने गेल्या आठवड्यातच एंडरॉयड गो स्मार्टफोन सेग्मेंट वाढवत स्पार्क गो स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो 3,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आता एंडरॉयड गो बेस्ड स्मार्टफोनचा नवीन लॉट आणत मायक्रोमॅक्स ने अजून दोन नवीन फोन भारतात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही मायक्रोमॅक्स भारत सीरीज मध्ये आले आहेत जे भारत 5 इनफिनिटी एडिशन आणि भारत 4 दिवाळी एडिशन नावाने बाजारात सेल साठी उपलब्ध होतील.

मायक्रोमॅक्स चे दोन्ही स्मार्टफोन एंडरॉयड ओरियोच्या गो एडिशन वर चालतात. एंडरॉयड गो असल्यामुळे भारत 5 इनफिनिटी एडिशन आणि भारत 4 दिवाळी एडिशन मध्ये जीमेल गो, गूगल मॅप्स गो, फाइल्स गो, गूगल क्रोम, यूट्यब गो, गूगल असीस्टेंट गो, प्ले स्टोर व जीबोर्ड असे टूल्स प्रीलोडेड मिळतील. गूगल ऍप्स चे हे गो वर्जन इंटरनेट कमी वापरतात तसेच फोनची प्रोसेसिंग पण फास्ट करतात. एंडरॉयड गो कमी रॅम वर पण लॅग फ्री प्रोसेसिंग देतो.

मायक्रोमॅक्स भारत 5 इनफिनिटी एडिशन नावाप्रमाणे 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल ​लेस इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. कपंनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 32जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक व फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आले आहे तर रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. भारत 5 इनफिनिटी एडिशन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करण्यात आला आहे.

भारत 4 दिवाळी एडिशन पाहता हा फोन 5-इंचाच्या स्क्रीन सह बाजारात आला आहे. या फोन मध्ये पण 32जीबी एक्सपेंडेबल स्टोरेज सह 1जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे. बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 2-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारत 4 दिवाळी एडिशन डुअल सिम फोन आहे पण यात एक सिम वरच 4जी वापरता येते तर भारत 5 इनफिनिटी एडिशन दोन्ही सिम वर 4जी सपोर्ट करतो.

मायक्रोमॅक्स भारत 5 इनफिनिटी एडिशन 5,899 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे तर मायक्रोमॅक्स भारत 4 दिवाळी एडिशन 4,249 रुपयांमध्ये आगामी 3 नोव्हेंबर पासून आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर विकत घेता येईल.

The post मायक्रोमॅक्स ने लॉन्च केले दोन स्वस्त एंडरॉयड गो फोन, भारत 5 इनफिनिटी एडिशन आणि भारत 4 दिवाळी एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-bharat-5-infinity-bharat-4-diwali-edition-android-go-launch-price-specifications-in-marathi/feed/ 0