Micromax iOne Note - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 01 Oct 2019 11:48:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3,950mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह येईल Micromax iOne Note, Redmi 8A ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/micromax-ione-note-launch-teased-come-with-dual-rear-cameras-3950mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-ione-note-launch-teased-come-with-dual-rear-cameras-3950mah-battery/#respond Tue, 01 Oct 2019 11:48:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5446 कंपनीने गेल्यावर्षी इनफिनिटी एन11 आणि इनफिनिटी एन12 फोन आणले होते.

The post 3,950mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह येईल Micromax iOne Note, Redmi 8A ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय कंपनी Micromax लवकरच मार्केट मध्ये आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनीने अधिकृतपणे टीज केले आहे कि ते iOne Note नावाचा फोन भारतीय मार्केट मध्ये सादर करणार आहेत. या फोनच्या टीजर मध्ये कंपनीने अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. चला फोनच्या फीचर्सची माहिती घेऊ.

कंपनीने माइक्रोमॅक्स iOne Note च्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही. फोनची डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती समोर आली आहे. डिजाइन बद्दल बोलायचे तर Micromax iOne Note मध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच फ्रंटला असेल. मागे डुअल कॅमेरा सेटअप वर्टिकल पोजिशन मध्ये एलईडी फ्लॅश सह असेल. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लोसी फिनिश सह येईल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Micromax iOne Note मध्ये 6.088-इंचाचा HD+ (720×1560 पिक्सल) V नॉच डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये 1.6GHz + 1.25GHz प्रोसेसर दिला जाईल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 64GB पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी रियर कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये फ्रंटला 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. Micromax iOne Note मध्ये पावर बॅकअप साठी 3,950mAh ची बॅटरी दिली जाईल. या बॅटरी बद्दल कंपनीचा दावा आहे कि हि 18 तासांचा टॉक टाइम देईल. सध्या या फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आशा आहे कि डिवाइस बजेट कॅटगरी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे कंपनीने गेल्यावर्षी इनफिनिटी एन11 आणि इनफिनिटी एन12 फोन आणले होते. माइक्रोमॅक्स इनफिनिटी एन11 ची किंमत 8,999 रुपये आणि इनफिनिटी एन12 माइक्रोमॅक्स 9,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आले होते. माइक्रोमॅक्स इनफिनिटी एन11 आणि इनफिनिटी एन12 दोन्ही स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या नॉच डिस्प्ले वर सादर करण्यात आले होते.

यात 6.18 इंचाचा आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्ले देण्यात आला होता. इनफिनिटी एन11 आणि इनफिनिटी एन12 एंडरॉयड ओरियो सह 2गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतात. तसेच ग्राफिक्स साठी यात आईएमजी पावरवीआर जीपीयू देण्यात आला होता.

The post 3,950mAh बॅटरी आणि डुअल कॅमेऱ्यासह येईल Micromax iOne Note, Redmi 8A ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-ione-note-launch-teased-come-with-dual-rear-cameras-3950mah-battery/feed/ 0