MicromaxRealme - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Jul 2020 10:32:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Micromax घेऊन येत आहे तीन नवीन Made In India फोन जे कमी किंमतीत होतील लॉन्च, देऊ शकतील का Xiaomi ला टक्कर ? https://www.91mobiles.com/marathi/micromax-to-launch-new-made-in-india-smartphones-in-september-with-mediatek-helio-p35-p25-low-budget/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-to-launch-new-made-in-india-smartphones-in-september-with-mediatek-helio-p35-p25-low-budget/#respond Tue, 28 Jul 2020 10:32:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7704 रिपोर्टनुसार Micromax आपले तिन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेकच्या चिपसेट सह बाजारात आणेल.

The post Micromax घेऊन येत आहे तीन नवीन Made In India फोन जे कमी किंमतीत होतील लॉन्च, देऊ शकतील का Xiaomi ला टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात निर्माण झालेल्या अँटी चायनाच्या विचाराने नॉन चीनी कंपन्यांसोबतच इंडियन ब्रँड्स मध्ये पण नवचैतन्य संचारले आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारावर राज्य करत असलेल्या Xiaomi, Realme, Oppo आणि Vivo सारख्या चीनी कंपन्यांचे मोबाईल फोन्स भारतीय जनता नाकारत आहे आणि त्याऐवजी लोकांना असे ब्रँड्स हवे आहेत जी चीनचे नाहीत. Samsung कंपनीला याचा फायदा होत आहे तर दुसरीकडे Lava आणि Micromax सारख्या भारतीय कंपन्या पण आता पुन्हा मोबाईल बाजारात सक्रिय होऊ लागल्या आहेत.

Micromax संबंधित बातमी समोर येत आहे कि कंपनी भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन्स घेऊन येत आहे आणि हे नवीन फोन्स सप्टेंबर पर्यंत बाजारात येतील. रिपोर्टनुसार हे तिन्ही फोन पुढल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट मधेच लॉन्च होणार होते पण कोरोना वायरसमुळे निर्मिती कमी झाली आहे आणि यामुळे ऑगस्ट ऐवजी हे स्मार्टफोन्स सप्टेंबर मध्ये लॉन्च होतील.

किंमत होईल 7,000 पासून सुरु

माइक्रोमॅक्स संबंधित हि माहिती द मोबाईल इंडियनच्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार सप्टेंबर मध्ये Micromax चे दोन किंवा तीन नवीन फोन भारतात लॉन्च होतील. हे तिन्ही स्मार्टफोन बजेट सेग्मेंट मध्ये येतील. या तिन्ही डिवाईसेज मधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपयांपर्यंत असू शकते तर सर्वात महाग फोनची किंमत जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंत असेल.

रिपोर्टनुसार Micromax आपले तिन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेकच्या चिपसेट सह बाजारात आणेल. या मोबाईल फोन्सच्या नावांबाबत आतातरी काही सांगता येणार नाही पण रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्सच्या दोन स्मार्टफोन्स मध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट असू शकतो. अलीकडेच Realme C11 या चिपसेट वर लॉन्च झाला होता. तर दुसरीकडे Micromax च्या एका फोन मध्ये मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट मिळू शकतो.

टॉप 5 स्मार्टफोन ब्रँड्स पैकी चार चायनीज

साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी-मार्च मध्ये भारतातील टॉप-5 स्मार्टफोन ब्रँड्स पैकी चार ब्रँड चीनचे आहेत. मह्रत्वाचे म्हणजे या टॉप ब्रँड्सच्या यादीत भारतीय कंपन्या जवळपास पण दिसत नाहीत. देशातील टॉप 5 स्मार्टफोन ब्रँड्स बद्दल बोलायचे झाले तर भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड Xiaomi आहे. या यादीत दुसरे नाव Vivo चे आहे. Samsung या यादीत तिसऱ्या नंबर वर येते जी एक कोरियन कंपनी आहे. त्यानंतर टॉप 5 मध्ये चौथ्या नंबर वर Realme आणि पाचव्या नंबर वर OPPO आहे.

The post Micromax घेऊन येत आहे तीन नवीन Made In India फोन जे कमी किंमतीत होतील लॉन्च, देऊ शकतील का Xiaomi ला टक्कर ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-to-launch-new-made-in-india-smartphones-in-september-with-mediatek-helio-p35-p25-low-budget/feed/ 0