MIUI - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Jun 2020 12:00:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi च्या या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळेल MIUI 12 चा अपडेट, तुमचा फोन आहे का या यादीत https://www.91mobiles.com/marathi/miui-12-update-for-these-smartphones-is-confirmed-by-xiaomi-know-smartphone-name/ https://www.91mobiles.com/marathi/miui-12-update-for-these-smartphones-is-confirmed-by-xiaomi-know-smartphone-name/#respond Mon, 27 Apr 2020 11:56:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7497 Xiaomi नुसार MIUI 12 चा स्टेबल वर्जन जून 2020 च्या शेवटी रोल आउट केला जाईल.

The post Xiaomi च्या या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळेल MIUI 12 चा अपडेट, तुमचा फोन आहे का या यादीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आज आपल्या घरच्या मार्केट मध्ये नवीन फोन Mi 10 Youth Edition सादर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने ऍडव्हान्स फीचर्स असलेला नवीन यूजर इंटरफेस MIUI 12 पण लॉन्च केला आहे. शाओमीच्या नवीन मीयूआई मध्ये फोन्स मध्ये गोपनीयता आणि ऍनिमेशन सारख्या शानदार फीचर्स सह वेगवान आणि स्मूद प्रोसेसिंग मिळेल.

एमआईयूआई 12 मध्ये यूजर इंटरफेस खूप बदलण्यात आला आहे आणि डार्क मोड सह फिटनेस फीचर सारखे अनेक मोड्स देण्यात आले आहेत. सध्या हा बीटा परीक्षणासाठी खुला आहे. यूजर्स अपडेट करण्यासाठी ऍप स्टोर वर जाऊ शकतात, अश्याप्रकारे यातील फीचर्स अनुभवता येतील.

MIUI 12 ची रिलीज डेट आणि उपलब्धता

Xiaomi नुसार MIUI 12 चा स्टेबल वर्जन जून 2020 च्या शेवटी रोल आउट केला जाईल. सध्या याची बीटा टेस्टिंग चीन मध्ये खुली झाली आहे. MIUI 12 अपडेट मिळवणाऱ्या डिवाइस मध्ये शाओमी आणि रेडमी दोन्हीच्या हँडसेटचा समावेश आहे. नवीन मीआईयूआई 12 चा अपडेट काही जुन्या डिवाइसना पण मिळेल जे महत्वाचे आहे. चाल जाणून घेऊया कोणत्या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट.

Redmi च्या या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट

सर्वात आधी आपण बोलूया शाओमीच्या सब ब्रँड Redmi च्या फोन्स बद्दल. रेडमी ब्रँडच्या Redmi K30 Pro, Redmi K30 5G, Redmi K30 4G, Redmi K20 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 7 Pro, Redmi Note 7 आणि Redmi Note 5 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या काळात या लिस्ट मध्ये आणखीन फोन्सचा समावेश होईल.

Xiaomi च्या या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट

शाओमीचे फोन्स पाहता Mi CC9 Pro, Mi CC9, Mi CC9 Meitu Custom Edition, Mi 10 Pro, Mi 10, Mi 10 Youth Edition, Mi 9 Pro 5G, Mi 9, Mi 9 SE, Mi 8 Screen Fingerprint Edition, Mi 8 Youth Edition, Mi 8 Explorer Edition, Mi 8 SE, Mi 8, Mi 6, Mi 6X, Mi Mix 3, Mi Mix 2s, Mi Mix 2, Mi Note 3 आणि Mi Max 3 ला नवीन MIUI 12 चा अपडेट दिला जाईल.

सर्वात आधी या फोन्सना मिळेल अपडेट

Xiaomi Mi 10

Xiaomi Mi 10 Youth Edition

Xiaomi Mi 9 Pro

Redmi K30 Pro

Redmi K30

Redmi K20 Pro

Redmi K20

Note: लक्षात असू द्या कि यादी चीन मधील फोन्सना लक्षात ठेऊन कंपनीने प्रसिद्ध केली आहे. ग्लोबली स्मार्टफोन्ससाठी वेगळी यादी येईल. नवीन मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट होण्यास सुरवात होईल.

The post Xiaomi च्या या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळेल MIUI 12 चा अपडेट, तुमचा फोन आहे का या यादीत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/miui-12-update-for-these-smartphones-is-confirmed-by-xiaomi-know-smartphone-name/feed/ 0
शाओमी करत आहे अजून एका फ्लॅगशिप फोनची तयारी, 6जीबी रॅम सह असेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 638 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-valentino-listed-on-geekbench-with-6gb-ram-qualcomm-sdm638-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-valentino-listed-on-geekbench-with-6gb-ram-qualcomm-sdm638-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 14:11:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=328 गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये शाओमी चा स्मार्टफोन वेलेंटिनो (Valentino) कोडनेम सह लिस्ट करण्यात आला आहे.

The post शाओमी करत आहे अजून एका फ्लॅगशिप फोनची तयारी, 6जीबी रॅम सह असेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 638 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी या 10 तारखेला आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करत कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी एस2 लॉन्च करण्यास तयार आहे. हा फोन एका शॉपिंग साइट वर लिस्ट पण करण्यात आला आहे जिथे फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तर दुसरीकडे शाओमी च्या अजून एका स्मार्टफोन ची पण माहिती समोर येत आहे. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर शाओमी चा एक नवीन स्मार्टफोन दिसला आहे ज्यावरून समोर येत आहे की कंपनी आपल्या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वर काम करत आहे.

गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये शाओमी चा स्मार्टफोन वेलेंटिनो (Valentino) कोडनेम सह लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन बाजारात कोणत्या नावाने लॉन्च केला जाईल याबद्दल अजूनतरी काही सांगता येत नाही पण या लिस्टिंग वरून इतके समजत आहे की शाओमी चा हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 638 चिपसेट वर चालेल. गीकबेंच वर he स्पष्ट झाले आहे की शाओमी चा हा आगामी स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 638 चिपसेट वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 1.44गीगाहर्ट्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर असेल.

शाओमी च्या या बेनाम स्मार्टफोन मध्ये एंडरॉयड 8.1 ओरियो सह 6जीबी रॅम असेल. या लिस्टिंग मध्ये फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स स्पष्ट झाले नाहीत पण अंदाज लावला जात आहे की हा स्मार्टफोन शाओमी फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या रुपात बाजारात घेऊन येईल. गीकबेंच स्कोर बद्दल बोलायचे तर या बेंचमार्किंग साइट ने शाओमी स्मार्टफोनला सिंगल-कोर मध्ये 1,485 स्कोर दिला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोन ने 5,440 स्कोर ​मिळवला आहे.

शाओमी ने या वर्षीच्या सुरवातीला रेडमी नोट 5 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट असलेला पहिला स्मार्टफोन होता. रेडमी नोट 5 च्या लॉन्च नंतर असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, असूस झेनफोन 5 आणि मीजू ई3 सारखे स्मार्टफोन या चिपसेट सह मार्केट मध्ये आले होते.

The post शाओमी करत आहे अजून एका फ्लॅगशिप फोनची तयारी, 6जीबी रॅम सह असेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 638 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-valentino-listed-on-geekbench-with-6gb-ram-qualcomm-sdm638-in-marathi/feed/ 0