Mobile News Marathi.oppo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 11:23:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/#respond Mon, 17 Jul 2023 11:23:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22426 ओेपो आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO K11 नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं फोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार ह्या ओप्पो मोबाइलचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आशा आहे की ओप्पो के11 लवकरच टेक मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीक माहिती पुढे देण्यात आली आहे. […]

The post 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 782G मिळू शकतो.
  • फोन 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

ओेपो आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO K11 नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं फोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार ह्या ओप्पो मोबाइलचे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आशा आहे की ओप्पो के11 लवकरच टेक मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीक माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ AMOLED 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 782G
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 100W fast charging

  • स्क्रीन : ओप्पो के11 स्मार्टफोनबाबत बातमी आली आहे की ह्यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार OPPO K11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 2.7गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO K11 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • फास्ट चार्जिंग : लीकनुसार ओप्पो आपला हा नवीन फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल जी फोन काही मिनिटांत फुल चार्ज करू शकते.
  • बॅटरी : OPPO K11 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.

The post 100वॉट चार्जिंग असलेला OPPO K11 लवकरच येऊ शकतो बाजारात; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100w-fast-charging-phone-oppo-k11-specifications-leaked/feed/ 0