Mobile News Marathi.Realme - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Apr 2023 10:35:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/ https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/#respond Mon, 10 Apr 2023 10:35:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20161 highlights] Realme Narzo N55 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल. फोनमध्ये कंफर्टेबल ग्रिपसाठी सी डिजाइन मिळेल. कंपनीचा दावा आहे की डिवाइस सेगमेंटमधील सर्वात पातळ मोबाइल असेल. [/highlights] Realme आपल्या Narzo सीरीजमध्ये भारतात एक नवीन फोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनी 12 एप्रिलला नारजो एन55 स्मार्टफोन सादर करेल. ऑफिशियल लाँच पूर्वीच याची डिजाइन कंपनीनं अधिकृतपणे […]

The post 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
highlights]

  • Realme Narzo N55 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल.
  • फोनमध्ये कंफर्टेबल ग्रिपसाठी सी डिजाइन मिळेल.
  • कंपनीचा दावा आहे की डिवाइस सेगमेंटमधील सर्वात पातळ मोबाइल असेल.

[/highlights]

Realme आपल्या Narzo सीरीजमध्ये भारतात एक नवीन फोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनी 12 एप्रिलला नारजो एन55 स्मार्टफोन सादर करेल. ऑफिशियल लाँच पूर्वीच याची डिजाइन कंपनीनं अधिकृतपणे टीज केली आहे. इतकेच नव्हे तर हे देखील स्पष्ट झालं आहे की हँडसेट ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर सेलसाठी सादर केला जाईल. जर तुम्ही देखील या फोनची वाट पाहत असाल तर या आर्टिकलमध्ये लीक्स आणि कंपनीनं दिलेली माहिती एकत्र मांडण्यात आली आहे.

Realme Narzo N55 ची संभाव्य किंमत

अद्याप तरी Realme Narzo N55 च्या किंमतीची कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही. परंतु आशा आहे की जर हा फोन मीडियाटेक हीलियो जी88 एसओसीसह बाजारात आला तर याची किंमत 12,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

Realme Narzo N55 ची डिजाइन

  • डायनॅमिक आइलँड सारखी मिनी कॅप्सूल.
  • फ्रंटला पंच होल कॅमेरा

सर्वप्रथम डिजाइन पाहता Realme Narzo N55 च्या फ्रंटला पंच होल डिजाइन असेलेली स्क्रीन मिळेल. तसेच, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. इतकेच नव्हे तर डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पिकर ग्रिल दिली जाईल. रियर लुक पाहता, यात दोन कॅमेरा रिंग असतील आणि खालच्या बाजूला कंपनीची ब्रँडिंग मिळेल.

इतकेच नव्हे तर Realme Narzo N55 अ‍ॅप्पलच्या डायनॅमिक आइलँड सारख्या मिनी कॅप्सूलसह येईल. ज्यात नोेटफिकरेशन्स, बॅटरी स्टेटस आणि बरीच माहिती मिळेल. हे फिचर गेल्या महिन्यात लाँच झालेल्या कंपनीच्या डिवाइसमध्ये देखील देण्यात आलं आहे.

33W सुपरवूक चार्जिंग

  • 5,000mAh बॅटरी
  • 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज ./li>

आता कंपनीनं स्पेसिफिकेशन्स द्दल जास्त काही खुलासा केला नाही परंतु कंपनीनं सांगितलं आहे की फोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळेल. तसेच डिवाइसची बॅटरी 0-50 टक्के फक्त 29 मिनिटांत चार्ज होईल. सध्या बॅटरी कपॅसिटीची माहिती मिळाली नाही. लीक्सनुसार, यात 5,000mAh ची बॅटरी असू शकते.

रॅम आणि स्टोरेज

    मीडियाटेक हीलियो जी88
  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज

फोन 4GB/ 6GB RAM आणि 64GB/ 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात येऊ शकतो. तसेच यात मायक्रोएसडी कार्डनं स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन मिळेल. आशा आहे की स्टोरेज 512जीबी किंवा 1टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. लीक्सनुसार यात मीडियाटेक हीलियो जी88 एसओसी दिला जाईल.

ड्युअल रियर कॅमेरा से होगा लैस

  • ओमनीव्हिजन ओवी 64बी सेन्सर
  • नाइटफोटोग्राफी.

फोनमध्ये मागे मॅट्रिक्स ड्युअल कॅमेरा आहे. अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की फोनमध्ये ओमनीव्हिजन ओवी 64बी सेन्सर असेल. कंपनीचा दावा आहे की यात फ्लॅगशिप लेव्हल नाइट फोटोग्राफी दिली जाईल. सेकंडरी सेन्सरबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 12 एप्रिलला येत आहे Realme Narzo N55; लाँचपूर्वीच जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-everything-before-realme-narzo-n55-launch-in-india-on-april-12/feed/ 0