Moto C2 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jun 2018 05:48:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एंडरॉयड गो वर्जन सह लॉन्च होऊ शकतो मोटो सी2, किंमत पण असेल खुप कमी https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-c2-listed-on-fcc-with-specifications-might-be-android-one-go-edition-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-c2-listed-on-fcc-with-specifications-might-be-android-one-go-edition-smartphone-in-marathi/#respond Mon, 18 Jun 2018 12:04:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=946 एंडरॉयड गो असल्यामुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post एंडरॉयड गो वर्जन सह लॉन्च होऊ शकतो मोटो सी2, किंमत पण असेल खुप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी आपल्या ‘सी सीरीज’ च्या नव्या स्मार्टफोंस वर काम करत आहे. माहिती मिळाली होती की कंपनी मोटो सी2 आणि मोटो सी2 प्लस नावच्या स्मार्टफोंस वर काम करत आहे आणि लवकरच हे टेक बाजारात येतील. तसेच आता मोटोरोला चा मोटो सी2 स्मार्टफोन अमेरिकन वेबसाइट फेडरल कम्यूनिकेशन कमीशन वर दिसला आहे. मोटो सी2 च्या या लिस्टिंग मध्ये फोन च्या काही स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

मोटो सी2 एफसीसी वर लिस्ट करण्यात आला आहे. या फक्त फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत तर ही शक्यता पण दाट झाली आहे की मोटोरोला लवकरच हा स्मार्टफोन लॉन्च करेल. एफसीसी वर हा फोन एक्सटी1920 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंग वरून समजले आहे की मोटोरोला च्या या स्मार्टफोन मध्ये 1जीबी पर्यंत रॅम मिळू शकतो. तसेच फोन 16जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो.

मोटो सी2 बद्दल बोलले जात आहे की हा फोन एंडरॉयड वन (गो एडिशन) सह सादर केला जाऊ शकतो. एंडरॉयड गो असल्यामुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाऊ शकतो. लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे की मोटो सी2 मध्ये 2,100एमएएच ची बॅटरी देण्यात येईल तसेच फोनचे डायमेंशन 147.88 x 71.22एमएम असू शकते. तसेच मोटो सी2 मध्ये ब्लूटूथ व वाईफाई सोबत कॅट. 10 एटीई पण असेल.

मोटो सी2 बद्दल आधी आलेल्या लीक्स नुसार हा फोन 16:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये फ्रंट फ्लॅश पण असेल तसेच फोनच्या होम बटन वरच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. मोटो सी2 स्वस्त स्मार्टफोन असेल जो आगामी दिवसांमध्ये अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला जाईल. अशा आहे की कंपनी मोटो सी2 सोबत मोटो सी2 प्लस स्मार्टफोन पण लॉन्च करेल.

The post एंडरॉयड गो वर्जन सह लॉन्च होऊ शकतो मोटो सी2, किंमत पण असेल खुप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-c2-listed-on-fcc-with-specifications-might-be-android-one-go-edition-smartphone-in-marathi/feed/ 0