Moto E6 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jun 2019 15:04:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/#respond Wed, 05 Jun 2019 15:04:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4501 हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर विकला जाईल.

The post Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola येत्या 20 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे. यादिवशी कोणता फोन लॉन्च केला जाईल हे कंपनीने सांगितले नाही पण बोलले जात आहे कि 20 जूनला Motorola भारतात आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च करेल. या शानदार स्मार्टफोनच्या लॉन्चच्या आधीच आज मोटोरोलाच्या अजून एका नवीन डिवाईस Moto E6 Plus ची माहिती समोर आली आहे. मोटो ई सीरीजचा हा स्मार्टफोन पण लवकरच इंडियन मार्केट मध्ये येणार आहे.

Motorola ने अजूनतरी Moto E6 Plus बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण गूगल वर Moto E6 Plus कीवर्ड सर्च केल्यावर एक ऍड समोर येत आहे. हि एक गूगल ऍड आहे ज्यात Amazon India ची लिंक देण्यात आली आहे. या लिंक मध्ये Moto E6 Plus स्मार्टफोनचे नाव लिहून येत आहे ज्यावर क्लिक केल्यावर वेबपेज अमेझॉन वर रिडायरेक्ट होत आहे. गूगलच्या या ऍड मुळे स्पष्ट झाले आहे कि Moto E6 Plus लवकरच भारतात दस्तक येईल तसेच अशी पण माहिती मिळाली आहे कि हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर विकला जाईल.

गीकबेंच लिस्टिंग
गूगल ऍड व्यतिरिक्त Moto E6 Plus चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 5 मे ची आहे. या बेंचमार्किंग साइट वर मोटोरोला ई सीरीजचा आगामी स्मार्टफोन Motorola Moto E(6) Plus नावाने लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच ने पण Moto E6 Plus वर शिक्कामोर्तब केली आहे. या साइट वर फोन संबंधित महत्वाची माहिती पण समोर आली आहे.

Moto E6 Plus गीकबेंच वर एंडरॉयड रेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे. गीकबेंच वरून समजले आहे कि मोटो ई सीरीजच्या या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. तसेच प्रोसेसिंग साठी Moto E6 Plus मध्ये 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हेलीयो पी22 चिपसेट असल्याचे गीकबेंच वर समोर आले आहे.

बेंचमार्किंग साइट वर Moto E6 Plus 2जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. अशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त रॅम किंवा स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. बेंचमार्क स्कोर पाहता Moto E6 Plus ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 829 प्वाइंट्स देण्यात आले आहेत. तसेच गीकबेंच वर या फोनला मल्टी-कोर मध्ये 3687 प्वाइंट्स मिळाले आहेत. स्पेसिफिकेशन्स समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि Moto E6 Plus मोटोरोला लो बजेट डिवाईस असेल.

Moto E6 Plus इंडिया लॉन्च
Moto E6 Plus ची गीकबेंच लिस्टिंग अचानकपणे समोर येणे आणि गूगलच्या चुकीमुळे फोनची अमेझॉन लिस्टिंग पाहता अंदाज लावला जात अशा आहे कि मोटोरोला इंडिया ने सध्या हा फोन लपवून ठेवला आहे. येत्या 20 जूनला मोटोरोलाच्या ईवेंट मध्ये कंपनी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस Motorola One Vision सोबतच हा लो बजेट स्मार्टफोन Moto E6 Plus पण सादर करू शकते.

The post Moto E6 Plus पण होईल भारतात लॉन्च, 20 जूनला Motorola One Vision सोबत होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e6-plus-amazon-india-geekbench-might-launch-on-20-june/feed/ 0