Moto E6i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Feb 2021 13:20:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग https://www.91mobiles.com/marathi/moto-e6i-launched-feature-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e6i-launched-feature-specifications-price-sale/#respond Thu, 11 Feb 2021 13:20:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10005 मोटो ई6आय अँड्रॉइड 10 ओएसवर लाॅन्च केला गेला आहे जो अँड्रॉइडच्या ‘गो’ एडिशनवर चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे फोन कमी रॅम व स्टोरेज मध्ये पण स्मूद आणि लॅग-फ्री चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह यूनिएसओसी टाइगर एससी9863ए चिपसेट आहे.

The post Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज इंटरनॅशनल मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Moto E6i लाॅन्च केला आहे. ‘ई’ सीरीज मध्ये जोडलेल्या हा मोबाईल फोन कंपनीने ब्राजील मध्ये सादर केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह इतर बाजारांमध्ये येऊ शकतो. मोटो ई6आय एक लो बजेट फोन आहे जो 2 जीबी रॅमसह मार्केट मध्ये आला आहे. शानदार लुकसह अँड्रॉइड ‘गो’ फोनची खासियत आहे जी या बजेट मध्ये या फोनला योग्य बनवते.

Moto E6i

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मोटो ई6आय 19.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1560 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी ‘यू’ शेप नाॅच देण्यात आली आहे. हा फोन Titanium Grey आणि Pink कलर मध्ये लाॅन्च झाला आहे.

मोटो ई6आय अँड्रॉइड 10 ओएसवर लाॅन्च केला गेला आहे जो अँड्रॉइडच्या ‘गो’ एडिशनवर चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे फोन कमी रॅम व स्टोरेज मध्ये पण स्मूद आणि लॅग-फ्री चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह यूनिएसओसी टाइगर एससी9863ए चिपसेट आहे. ब्राजील मध्ये Moto E6i 2 जीबी रॅमवर लाॅन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरीसह येत आहे कमी किंमत असलेला Moto E7 Power

फोटोग्राफीसाठी मोटो ई6आय डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलवर आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto E6i एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड ‘मोटो’ लोगो देण्यात आला आहे तसेच हा फोन फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटो ई6आय मध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करते. Moto E6i ची किंमत BRL 1,099 म्हणजे 14,900 रुपयांच्या आसपास आहे.

The post Motorola ने लाॅन्च केला लो बजेट Moto E6i, अँड्रॉइड गो सह कमी रॅम मध्ये पण मिळेल स्मूद प्रोसेसिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e6i-launched-feature-specifications-price-sale/feed/ 0