Moto Razr - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 16 Mar 2020 12:09:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/#respond Mon, 16 Mar 2020 12:09:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6793 Moto Razr कंपनीने 1,24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज आपला लेटेस्ट फोल्डेबल हँडसेट Moto Razr भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने याआधी मोटो रेजर फोल्डेबल फोन अमेरिकन बाजारात सादर केला आहे. कंपनीने हा डिवाइस पावरफुल कॅमेरा, प्रोसेसर आणि दमदार रॅम सह सादर केला आहे. या फोनची डिजाइन पाहता भारतात गॅलेक्सी झेड फ्लिपला टक्कर निश्चितच मिळेल.

शानदार डिजाइन

हा फर्स्ट जेनरेशन मोटो रेजर पेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळा आहे. कंपनीने हा शानदार फोल्डेबल डिस्प्ले डिजाइन सह लॉन्च केला आहे. हा फोन वर्टिकली फोल्ड होतो. कंपनीने फर्स्ट जेनरेशन मोटो रेजर लक्षात ठेऊन हि डिजाइन दिली आहे. या डिजाइनला कंपनीने clamshell असे नाव दिले आहे. डिवाइस मध्ये मेन डिस्प्ले व्यतिरिक्त एक आउटर डिस्प्ले पण असेल ज्यावर नोटिफिकेशन फोन न उघडता दिसतील. तसेच उघडल्यावर फोन मध्ये नॉच स्क्रीन दिसले. फोनचा फिंगरप्रिंट सेंसर आउटर पॅनल वर देण्यात आला आहे.

डिस्प्ले आहे कमाल

या फोल्डेबल फोन मध्ये यूजर्सना 6.2 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल, ज्याचे रेजॉल्यूशन 876×2142 पिक्सल आहे. घडी केल्यावर या फोनच्या स्क्रीनचा आकार 2.7 इंच होतो. यूजर्स या डिस्प्लेच्या मदतीने सेल्फी क्लिक करू शकतील आणि त्यांनी यात मेसेज नोटिफिकेशन सह म्यूजिक कंट्रोल करण्याची सुविधा मिळेल.

दमदार कॅमेरा

फोटोग्रफीसाठी फोन मध्ये 2 कॅमेरे देण्यात आले आहेत. यात नाइट विजन मोड सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. नाइट विजन मोडच्या मदतीने यूजर्स रात्रीपण चांगले फोटो क्लिक काऊ शकतील. तसेच फोनच्या कॅमेऱ्यात एआई (आर्टिफिशियल इंटेंलिजेंस) टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. दुसरीकडे या फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोन एंडरॉयड 9 पाई आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो तसेच हा फक्त ई-सिम कार्डला सपॉर्ट करतो. फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर हा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट सह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 2150 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. Moto Razr मध्ये तुम्हाला 3.5-mm हेडफोन जॅक मिळणार नाही. यात ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट ऑडियोसाठी आहे.

किंमत

Moto Razr कंपनीने 1,24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. जियोने 4999 रुपयांचा रिचार्ज केल्यास डबल डेटा आणि डबल वैधतेचा लाभ मिळेल. तसेच सिटी बॅंक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर मोटोकेयर ऍक्सीडेन्ट डॅमेज प्रोटेक्शन प्लान मध्ये डिस्काउंट दिला जाईल. फोनची विक्री 2 एप्रिलला होईल आणि डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

The post अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/feed/ 0
सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/ https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/#respond Thu, 14 Nov 2019 12:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5775 मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि ट्विटर वर अपडेट केले होते कि हा स्मार्टफोन भारतात पण येईल.

The post सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवोच्या मालकीच्या कंपनी मोटोरोलाने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Moto Razr लॉन्च केला आहे. लॉन्चच्या आधी स्मार्टफोन संबंधित लीक्स गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. आता हा फोन ग्लोबली लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनीने याच्या भारत लॉन्चची माहिती पण दिली होती.

किंमत

Moto Razr कंपनीने प्रीमियम सेगमेंट मध्ये सादर केला आहे. हा फोन कंपनीने $1,500 (जवळपास 108,000 रुपये) मध्ये यूएस मध्ये लॉन्च केला आहे. भारतातील याच्या किंमतीची माहिती मिळाली नाही. पण ग्लोबल लॉन्चच्या आधी मोटोरोला इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि ट्विटर वर अपडेट केले होते कि हा स्मार्टफोन भारतात पण येईल. मोटोरोला इंडियाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडल्स वर या स्मार्टफोनचा एक फोटो शेयर करण्यात आला होता, ज्यात अनफोल्डेड डिवाइसचा साइड व्यू आहे.

डिजाइनच्या बाबतीती हा बऱ्याचअंशी Moto Razr V3i सारखा असेल. यात जाडी चिन आणि एक हिंज मिळेल. डिजाइन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या फोटो मध्ये डिवाइसचे वॉल्यूम बटण आणि पावर बटण याच्या वरच्या भागावर आहेत. फोन मध्ये एक फोल्डिंग डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

नवीन Moto Razr बंद केल्यावर 2.7-इंचाचा gOLED डिस्प्ले मिळेल, ज्यात 600×800 पिक्सल रेजोल्यूशन आणि 4:3 आस्पेक्ट रेश्यो आहे. तसेच फोन उघडल्यावर 6.2-इंचाचा फोल्डेबल pOLED डिस्प्ले मिळेल, ज्यात 2142×876 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 21:9 आहे.

मोटोरोला रेजर 2019 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये 2150 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

फोटोग्राफी साठी फोनच्या बाहेर 16-मेगापिक्सल प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे जो सेल्फी आणि वीडियो कॉलिंगच्या कमी येतो. Moto Razr मध्ये तुम्हाला 3.5-mm हेडफोन जॅक मिळणार नाही. यात ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट ऑडियो साठी आहे.

The post सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आला फोल्डेबल Moto Razr, लवकरच येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-razr-2019-will-come-to-india/feed/ 0