Motorola Capri - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 17 Dec 2020 15:24:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला नवीन Motorola फोन, 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-capri-5000mah-battery-leak-fcc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-capri-5000mah-battery-leak-fcc/#respond Thu, 17 Dec 2020 15:24:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9348 Motorola Capri अमेरिकी सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी आणि सर्टिफिकेशन्स वेबसाइट TUV Rheinland वर स्पाॅट केला गेला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला नवीन Motorola फोन, 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यांचे कोडनेम Motorola Capri आणि Motorola Capri Plus आहे. लीक मध्ये या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. आता यातील एक स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या नवीन माहितीचा खुलासा झाला आहे. नवीन लिस्टिंग नंतर आशा आहे कि मोटोरोला आपल्या नवीन मोबाईल फोन्स आता लवकरच टेक मंचावर सादर करेल.

Motorola Capri अमेरिकी सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी आणि सर्टिफिकेशन्स वेबसाइट TUV Rheinland वर स्पाॅट केला गेला आहे. एफसीसी वर हा फोन Motorola XT2127-1 आणि Motorola XT2127-2 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. तर दुसऱ्या सर्टिफिकेशन मध्ये बॅटरी कपॅसिटी 4,850एमएएच रेटेड दाखवण्यात आली आहे जो इशारा करतो कि मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. तसेच Motorola Capri मध्ये 10वाॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचे पण लिस्टिंग मध्ये समोर आले आहे.

हि माहिती झाली आहे लीक

अलीकडेच एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि मोटोरोला कॅप्री आणि कॅप्री प्लस (या कॅप्रीप) नावाच्या दोन बजेट फोन वर काम करत आहे. आशा आहे कि डुअल-सिम मोटोरोला कॅप्री मध्ये 60Hz रिफ्रेश रेट सह एचडी + (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले असेल. तसेच हा स्नॅपड्रॅगॉन 460 SoC आणि 4GB रॅम व 64GB स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. XT2127 मॉडेल बद्दल Motorola Capri असल्याच अंदाज लावला जात आहे.

हे देखील वाचा : Realme C20 होईल कंपनीचा आगामी लो बजेट स्मार्टफोन, वेबसाइट वर झाला लिस्ट

फोन मध्ये 48-मेगापिक्सेल “s5kgm1st” प्राइमरी सेंसर, एक 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर (ov02b1b), 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेंसर (gc02m1) आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर (s5k4h7) दिला जाऊ शकतो. फोन मध्ये एनएफसीला सपोर्ट असल्याची शक्यता आहे. सोबतच फोनच्या फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

मोटोरोला कॅप्री प्लस मध्ये HD + रिजोल्यूशन सह 90Hz डिस्प्ले असल्याची शक्यता आहे. हा मॉडेल 4GB + 64GB आणि 6GB + 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशन सह येऊ शकतो. फोटो आणि व्हिडीओसाठी यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी (OV64B) सेंसर, ओम्नीविजन (ov02b1b) असलेली 2-मेगापिक्सल लेंस, सॅमसंग (s5k3l6) चा एक 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच, फ्रंटला 13-मेगापिक्सल (s5k4h7) सेल्फी शूटर असू शकतो.

The post 5,000एमएएच बॅटरी सह समोर आला नवीन Motorola फोन, 48एमपी क्वाॅड कॅमेऱ्यासह लवकरच होऊ शकतो लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-capri-5000mah-battery-leak-fcc/feed/ 0