Motorola Moto E7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Oct 2020 14:32:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/#respond Fri, 16 Oct 2020 14:32:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8554 Moto E7 स्मार्टफोन एका कॅनेडियन रिटेलर साइट वर लिस्ट झाला होता. हि लिस्टिंग एक चूक असल्याचे बोलले जात आहे पण या चुकीमुळे लॉन्चच्या आधीच मोटोरोला मोटो ई7 चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

The post Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपल्या ‘मोटो ई’ सीरीज अंतगर्त Moto E7 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. 5,000एमएएच आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा मोबाईल फोन फक्त 9,499 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. आता असे वाटत आहे कि मोटोरोला या सीरीज मध्ये अजून नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Moto E7 नावाने येईल. मोटोरोलाने आतापर्यंत या डिवाईसच्या लॉन्चची माहिती दिली नाही पण मोटो ई7 ऑफिशियल होण्याआधी एका शॉपिंग साइट वर फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट झाला आहे.

Moto E7 स्मार्टफोन एका कॅनेडियन रिटेलर साइट वर लिस्ट झाला होता. हि लिस्टिंग एक चूक असल्याचे बोलले जात आहे पण या चुकीमुळे लॉन्चच्या आधीच मोटोरोला मोटो ई7 चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. फोनच्या फोटो व फीचर्स सोबतच या साइट वर फोनच्या किंमतीचा पण खुलासा करण्यात आला होता. हि लिस्टिंग समोर आल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि मोटोरोला कंपनी आता मोटो ई7 स्मार्टफोन बाजारात लवकरच घेऊन येईल.

Moto E7

मोटोरोला मोटो ई7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल ज्यात चारही बेजल्स असतील. या फोनचे डायमेंशन159.8 x 76.6 x 8.7mm आणि वजन 181.2ग्राम असेल.

Moto E7 स्मार्टफोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. लिस्टिंगनुसार या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल तसेच 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी मोटो ई7 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लिस्टिंग मध्ये समोर आले आहे.

Motorola Moto E7 या लिस्टिंग मध्ये 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. मोटो ई7 4जी एलटीई सह येईल ज्यात 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये 3,550एमएएचची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोटो ई7 लिस्टिंग मध्ये अँड्रॉइड 10 ओएस सह दिसला आहे. इथे फोन मधील चिपसेटची माहिती तर समोर आली नाही पण लीक्स मध्ये बोलले जात आहे कि मोटोरोला आपला हा स्वस्त स्मार्टफोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर लॉन्च करेल. Moto E7 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल या माहितीसाठी थोडी वाट बघावी लागेल.

The post Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/feed/ 0