Motorola Moto Razr - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Jun 2020 13:01:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/ https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/#respond Fri, 01 May 2020 12:55:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7367 आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Corona महामारीमुळे देशात सध्या लॉकडाउन चालू आहे. या लॉकडाउनमुळे सर्वात जास्त स्मार्टफोन मार्केट मध्ये मंदी आली आहे. दुसरा लॉकडाउन 3 मे ला समाप्त होणार आहे. पण 3 मे ला पूर्णपणे लॉकडाउन संपेल कि नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. काही रिपोर्ट्सनुसार मोबाईल शॉप आणि ई-कॉर्मस साइट्सच्या माध्यमातून फोन्सची विक्री सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी काउंटरपॉइंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी सांगितले होते कि मार्केट जेव्हा पुन्हा सुरु होईल तेव्हा जवळपास सर्व मोठ्या कंपन्या नुकसान भरून काढण्यासाठी आकर्षक किंमतीत आणि नवीन स्ट्रॅटेजीची मदत घेऊ शकतात.

लॉकडाउनमुळे सर्व शाओमी, रियलमी, वीवो आणि सॅमसंग सारखे सर्व स्मार्टफोन ब्रॅंड्सनी आपले नवीन लॉन्च तर रद्द केले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे 3 मे नंतर सरकार स्मार्टफोन्सची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइनच्या माध्यमातून चालू करू शकते. यासाठी या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला त्या फोन्स बद्दल सांगणार आहोत जे मे मध्ये लॉन्च केले जातील आणि विक्रीस येतील.

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro

सर्वात आधी बोलूया वनप्लस 8 सीरीज बद्दल, जी अलीकडेच कंपनीने ग्लोबली लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये सादर केलेल्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची वाट अनेक ग्राहक बघत आहेत. तसेच कंपनीने अमेझॉनच्या माध्यमातून डिवाइसची प्री-बुकिंग घेण्यास सुरवात केली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि लॉकडाउन मध्ये सूट मिळताच डिवाइसची विक्री केली जाईल. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची बेस किंमत क्रमश: 41,999 रुपये व 54,999 रुपये आहे.

Realme Narzo 10 आणि Narzo 10A

एकदा नव्हे तर दोनदा Realme Narzo सीरीजचा लॉन्च टाळण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे Realme हि सीरीज लॉन्च करू शकत नाही, पण लॉकडाउन उघडताच Realme Narzo 10 आणि Realme Narzo 10A भारतात येतील. तसेच लॉन्च नंतर डिवाइस विक्रीसाठी सादर केले जाऊ शकतात. कारण कंपनी यावर्षी अजून अनेक स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे.

Vivo V19

वीवो वी19 पण पुढल्या महिन्यात मे मध्ये लॉन्च होण्यासाठी तयार दिसत आहे. हा फोन आधीच दुसऱ्या देशात लॉन्च झाला आहे. तसेच यावर्षी मार्च मध्ये भारतात लॉन्च केला जाणार होता. पण कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे वीवोला पण आपला लॉन्च रद्द करावा लागला. वीवो वी19 स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट सह येतो. तसेच फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप आहे मागे क्वाड-कॅमेरा सेटअप आहे.

Xiaomi Mi 10

108-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेला शाओमी मी 10 पण पुढल्या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. या डिवाइसच्या लॉन्चची वाट भारतात गेल्यावर्षी पासून बघितली जात आहे. Xiaomi ने भारतात Mi 10 लॉन्च करण्यासाठी आधी 31 मार्च तारीख ठरवण्यात आली होती, पण हा लॉन्च केला गेला नाही. आता पुढल्या महिन्यात म्हणजे मे मध्ये हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy S20 Ultra

लॉकडाउनच्या आधी सॅमसंगने गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये दोन मॉडेल गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20 प्लस विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. पण या सीरज मध्ये हाई-एंड गॅलेक्सी एस20 अल्ट्राची विक्री होऊ शकली नाही. आता आशा आहे कि हा डिवाइस पुढल्या महिन्यात विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

Motorola Razr

सर्वात खास डिजाइन सह गेल्या वर्षी आलेला मोटोरोला रेजर 2019 यावर्षी भारतात लॉन्च झाला आहे. पण विक्रीसाठी येऊ शकला नाही. दुसरा लॉकडाउन सम्पल्यावर डिवाइस विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

नोट: कोणत्याही कंपनीने पुढल्या महिन्यात डिवाइसच्या लॉन्च आणि विक्री बद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पण आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/feed/ 0
अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/#respond Mon, 16 Mar 2020 12:09:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6793 Moto Razr कंपनीने 1,24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज आपला लेटेस्ट फोल्डेबल हँडसेट Moto Razr भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने याआधी मोटो रेजर फोल्डेबल फोन अमेरिकन बाजारात सादर केला आहे. कंपनीने हा डिवाइस पावरफुल कॅमेरा, प्रोसेसर आणि दमदार रॅम सह सादर केला आहे. या फोनची डिजाइन पाहता भारतात गॅलेक्सी झेड फ्लिपला टक्कर निश्चितच मिळेल.

शानदार डिजाइन

हा फर्स्ट जेनरेशन मोटो रेजर पेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळा आहे. कंपनीने हा शानदार फोल्डेबल डिस्प्ले डिजाइन सह लॉन्च केला आहे. हा फोन वर्टिकली फोल्ड होतो. कंपनीने फर्स्ट जेनरेशन मोटो रेजर लक्षात ठेऊन हि डिजाइन दिली आहे. या डिजाइनला कंपनीने clamshell असे नाव दिले आहे. डिवाइस मध्ये मेन डिस्प्ले व्यतिरिक्त एक आउटर डिस्प्ले पण असेल ज्यावर नोटिफिकेशन फोन न उघडता दिसतील. तसेच उघडल्यावर फोन मध्ये नॉच स्क्रीन दिसले. फोनचा फिंगरप्रिंट सेंसर आउटर पॅनल वर देण्यात आला आहे.

डिस्प्ले आहे कमाल

या फोल्डेबल फोन मध्ये यूजर्सना 6.2 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल, ज्याचे रेजॉल्यूशन 876×2142 पिक्सल आहे. घडी केल्यावर या फोनच्या स्क्रीनचा आकार 2.7 इंच होतो. यूजर्स या डिस्प्लेच्या मदतीने सेल्फी क्लिक करू शकतील आणि त्यांनी यात मेसेज नोटिफिकेशन सह म्यूजिक कंट्रोल करण्याची सुविधा मिळेल.

दमदार कॅमेरा

फोटोग्रफीसाठी फोन मध्ये 2 कॅमेरे देण्यात आले आहेत. यात नाइट विजन मोड सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. नाइट विजन मोडच्या मदतीने यूजर्स रात्रीपण चांगले फोटो क्लिक काऊ शकतील. तसेच फोनच्या कॅमेऱ्यात एआई (आर्टिफिशियल इंटेंलिजेंस) टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. दुसरीकडे या फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोन एंडरॉयड 9 पाई आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो तसेच हा फक्त ई-सिम कार्डला सपॉर्ट करतो. फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे तर हा स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट सह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 2150 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. Moto Razr मध्ये तुम्हाला 3.5-mm हेडफोन जॅक मिळणार नाही. यात ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट ऑडियोसाठी आहे.

किंमत

Moto Razr कंपनीने 1,24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. जियोने 4999 रुपयांचा रिचार्ज केल्यास डबल डेटा आणि डबल वैधतेचा लाभ मिळेल. तसेच सिटी बॅंक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर मोटोकेयर ऍक्सीडेन्ट डॅमेज प्रोटेक्शन प्लान मध्ये डिस्काउंट दिला जाईल. फोनची विक्री 2 एप्रिलला होईल आणि डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

The post अनोखी डिजाइन असलेला Moto Razr भारतात झाला लॉन्च, Samsung Galaxy Z Flip ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-razr-launch-in-india-foldable-design-16mp-camera/feed/ 0