Motorola One Fusion - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 May 2020 11:17:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola One Fusion आणि Fusion+ होणार आहेत लॉन्च, फोन मध्ये असेल 5000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-fusion-plus-spotted-online-with-5000mah-battery-64mp-quad-camera-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-fusion-plus-spotted-online-with-5000mah-battery-64mp-quad-camera-launch-soon/#respond Mon, 25 May 2020 11:09:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7137 बातमी समोर येत आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात मोटो वन सीरीजचा नवीन फोन लॉन्च करेल ज्याचे नाव असेल Motorola One Fusion+

The post Motorola One Fusion आणि Fusion+ होणार आहेत लॉन्च, फोन मध्ये असेल 5000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने अलीकडेच भारतात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत पावरफुल स्मार्टफोन Motorola Edge+ लॉन्च केला होता. 5G कनेक्टिविटी असलेला हा फोन 74,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो उद्यापासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या हाईएंड डिवाईस नंतर आता मोटोरोला आपल्या ‘वन सीरीज’ च्या पण विस्ताराची योजना बनवत आहे. बातमी समोर येत आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात मोटो वन सीरीजचा नवीन फोन लॉन्च करेल ज्याचे नाव असेल Motorola One Fusion+

मोटोरोला वन फ्यूजन प्लस ची माहिती यू-ट्यूब च्या डिवाईस रिपोर्ट लिस्टिंग मध्ये मिळाली आहे जी एक्सडी डेवलेपर्सना सापडली आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच असे लिहिण्यात आले कि Motorola One Fusion+ पुढल्या महिन्यात म्हणजे जून मध्ये टेक मंचावर लॉन्च केला जाईल. फोनची लॉन्च डेट काय असेल याचा खुलासा अजूनतरी झाला आहे. रिपोर्टनुसार कंपनी मोटोरोला वन फ्यूजन+ सोबत वन फ्यूजन नावाचा दुसरा मॉडल पण बाजारात आणेल.

Motorola One Fusion+

वन फ्यूजन+ पाहता लिस्टिंग आणि रिपोर्टनुसार हा फोन 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.54 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 मिळेल ज्या सोबतच हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट वर चालेल. मोटोरोला वन फ्यूजन+ Cloud आणि Sugarfrost कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

रिपोर्टनुसार Motorola One Fusion+ दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल आणि यात 4 जीबी रॅम व 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. सांगण्यात आले आहे कि या फोनचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. वन फ्यूजन प्लस 4जी एलटीई ला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Motorola One Fusion

मोटोरोला वन फ्यूजन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या माहितीनुसार हा डिवाईस 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये एंडरॉयड 10 ओएस मिळेल त्याचबरोबर डिवाईस क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल.

रिपोर्टनुसार Motorola One Fusion क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर या फोन मध्ये 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर सह 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर मिळतील. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये पण 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचे रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.

The post Motorola One Fusion आणि Fusion+ होणार आहेत लॉन्च, फोन मध्ये असेल 5000एमएएच बॅटरी आणि 64एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-fusion-plus-spotted-online-with-5000mah-battery-64mp-quad-camera-launch-soon/feed/ 0