Motorola P30 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Sep 2018 12:09:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 12:09:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1995 मोटोरोला पी30 प्ले कंपनी ने 1899 युआन मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार 19990 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने नुकतीच आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘पी सीरीज’ सादर केली होती. वेगवेगळ्या तारखांना कंपनी ने या सीरीज मध्ये मोटोरोला पी30 आणि मोटोरोला पी30 नोट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता बातमी अशी आली आहे की कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस मोटोरोला पी30 प्ले पण आणला आहे. मोटोरोला पी30 प्ले कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला आहे तिथून फोनच्या स्पेसिफिकेशन्स सह याची किंमत पण समजली आहे.

मोटोरोला पी30 प्ले कंपनीच्या चीनी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून फोनच्या लुक ​व डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती पण मिळाली आहे. लुक च्या बाबतीत हा फोन या सीरीज च्या आधीच्या मॉडेल्स प्रमाणे आहे. हा फोन एल्युमीनियम फ्रेम वर बनवण्यात आला आहे ज्याचा फ्रंट पॅनल 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला आहे. फोन मध्ये 5.8-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. डिस्प्ले 2.5डी गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

मोटोरोला पी30 प्ले एंडरॉयड ओरियो आधारित लेनोवो च्या झेनयूआई 4.0 सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे ज्या सोबत हा फोन 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. पी30 प्ले मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी साठी मोटो पी30 प्ले च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पी30 प्ले च्या बॅक पॅनल वर मोटोरोला चा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर चे काम करतो. तसेच बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोला पी30 प्ले कंपनी ने 1899 युआन मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार 19990 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतात कधी येईल हे सध्यातरी सांगता येत नाही.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/feed/ 0