MTNL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 07:17:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 151 रुपयांत रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; MTNL देतेय 30 दिवसांचा भन्नाट प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/30-day-validity-daily-2gb-data-unlimited-calling-151-rs-mtnl-prepaid-plan-benefit/ https://www.91mobiles.com/marathi/30-day-validity-daily-2gb-data-unlimited-calling-151-rs-mtnl-prepaid-plan-benefit/#respond Tue, 05 Jul 2022 07:35:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11120 एकीकडे Reliance Jio, Airtel आणि Vi महागडे प्लॅन्स सादर करत आहेत, तर दुसरीकडे सरकारी कंपनीनं 151 रुपयांचा असा प्लॅन आणला आहे जो स्वस्त तर आहेच परंतु यात रोज 2GB data आणि 30 days validity मिळत आहे.

The post 151 रुपयांत रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; MTNL देतेय 30 दिवसांचा भन्नाट प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी दरवाढ केली आहे. तेव्हपासून भारतीय मोबाईल युजर्सच्या खिशाचा ताण वाढला आहे. किंमतीबाबत संवेदनशील असलेले ग्राहक किफायतशीर रिचार्ज प्लॅन्स शोधत आहेत. असे Mobile Recharge Plans जे कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्स देतील. ग्राहकांना जास्त वॅलिडिटी आणि भरपूर इंटरनेट डेटासह कॉलिंग देखील हवी आहे. एकीकडे Reliance Jio, Airtel आणि Vi महागडे प्लॅन्स सादर करत आहेत, तर दुसरीकडे सरकारी कंपनीनं 151 रुपयांचा असा प्लॅन आणला आहे जो स्वस्त तर आहेच परंतु यात रोज 2GB data आणि 30 days validity मिळत आहे.

MTNL 151 Plan

151 रुपयांचा हा प्लॅन एमटीएनएल म्हणजे महानगर टेलीकॉम निगम लिमिटेडनं आणला आहे. या प्लॅनमध्ये भारतीय ग्राहकांना हवे असलेले सर्व बेनिफिट्स देण्या आले आहेत. प्लॅनची किंमतच खूप कमी आहे आणि एवढी कमी किंमत असूनही एक महिन्याची वॅलिडिटी देखील मिळत आहे. फक्त इतकेच नव्हे या रिचार्ज प्लॅनमध्ये डेली इंटरनेट डेटा देखील दिला जात आहे, तसेच संपूर्ण देशात अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळते. पुढे आम्ही MTNL च्या या 151 रुपयांच्या प्लॅनची माहिती दिली आहे.

30 days validity

सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. सध्या इतकी वैधता असलेले प्लॅन्स बाजारात खूप कमी उपलब्ध आहेत. रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआय या तिन्ही कंपन्यांनी TRAI च्या आदेशानंतर निवडक मंथली वॅलिडिटी प्लॅन सादर केले आहेत परंतु 28 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅन्सची संख्या जास्त आहे. एमटीएनएलचा हा 151 रुपयांचा प्लॅन 30 दिवसाच्या वॅलिडिटीसह येतो.

Daily 2GB data

30 दिवसांची वॅलिडिटी तर आहेच परंतु या प्लॅनची दुसरी मोठी खासियत म्हणजे यात मिळणारा इंटरनेट डेटा आहे. MTNL 151 Plan मध्ये कंपनी युजर्सना रोज 2 जीबी डेटा देत आहे. प्रतिदिन 2GB Data/Day च्या हिशोबाने एमटीएनएल ग्राहकांना महिनाभरात एकूण 60 जीबी डेटा वापरता येईल. विशेष म्हणजे Jio, Airtel आणि Vi पैकी कोणतीही कंपनी सध्या फक्त 151 रुपयांमध्ये महिनाभरासाठी 60 जीबी डेटा देत नाही.

Unlimited Calls

सध्या डेटाची मागणी वाढली असली तरी कॉलिंगचं महत्व कमी झालं नाही. त्याची काळजी देखील या प्लॅनमध्ये घेण्यात आली आहे. 30 दिवसांची वॅलिडिटी आणि रोज 2 जीबी डेटा सोबतच 151 रुपयांच्या या MTNL प्लॅनमध्ये युजर्सना फुल कॉलिंग बेनिफिट देखील मिळतात. या प्लॅन अंतगर्त ग्राहकांना महिनाभरासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Local+STD) मिळते. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करू शकता. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 100 SMS देखील मिळतील.

The post 151 रुपयांत रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; MTNL देतेय 30 दिवसांचा भन्नाट प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/30-day-validity-daily-2gb-data-unlimited-calling-151-rs-mtnl-prepaid-plan-benefit/feed/ 0