Narendra Modi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 25 Mar 2020 14:45:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/#respond Wed, 25 Mar 2020 14:45:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6900 COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मध्ये सुरु झालेल्या CoronaVirus ने सध्या संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. कोरोना वायरसचा परिणाम सूर्य इंडस्ट्रीज सोबतच स्मार्टफोन इंडस्ट्री वर दिसत आहे. COVID-19 संक्रमणामुळे फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन शिपमेंट्स मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

38 टक्के घसरण झाली

समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी फेब्रुवारी मध्ये स्मार्टफोन मार्केटच्या परफॉर्मेंसच्या तुलनेत यावर्षी स्मार्टफोन्सची विक्री खूप कमी झाली आहे आणि याचे कारण कोरोना वायरस असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार ग्लोबल शिपमेंट फेब्रुवारी मध्ये 6.1 कोटी यूनिट्स होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्री मध्ये 38 टक्क्यांची कमतरता दिसली आहे.

फेब्रुवारी 2019 बद्दल बोलायचे तर 9.9 कोटी स्मार्टफोन्स विकले गेले होते. स्मार्टफोन मार्केट मधील या स्थितीला COVID-19 जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या वायरसमुळे स्मार्टफोन कंपन्या पण नवीन डिवाइस लॉन्च इवेंट्स करण्याऐवजी ऑनलाइन लॉन्च करत आहेत.

स्मार्टफोन्सची सेल डेट पुढे ढकलण्यात आली

याव्यतिरिक्त कंपन्यांनी आपल्या फोन्सची सेल डेटस पुढे ढकलल्या आहेत. यात शाओमी आणि रियलमी सारख्या कंपन्यांचा पण समावेश आहे. तसेच वीवोने भारतात लॉन्च होणाऱ्या वीवो वी19 चा लॉन्च रद्द केला आहे. हा लॉन्च 26 मार्चला भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर होणार होता.

2019 होता चांगला

जानेवारी मध्ये चीन मध्ये स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्यात आली होती. याचा परिणाम मोठ्या कंपन्यांच्या सप्लाई चेन वर झाला होता. ग्लोबल मार्केट मध्ये ऍप्पल आणि शाओमी सारख्या कंपन्या 2019 च्या शेवटपर्यंत चांगल्या परफॉर्म करत होत्या, 2020 च्या सुरवातीला त्याच्या विक्री वर पण परिणाम होऊ लागला आहे.

भारतात बंद झाले मान्यफॅक्चरिंग प्लांट

भारतात पण अनेक कंपन्यांनी आपले मान्यफॅक्चरिंग प्लांट बंद केले आहेत. साउथ कोरियन टेक कंपनी सॅमसंगने आपल्या नोयडा मधील सर्वात मोठा प्लांट काही दिवस शट डाउन केला आहे.

भारत झाला लॉकडाउन

सॅमसंग व्यतिरिक्त भारतात ओप्पो, वीवो आणि एलजी चे पण प्लांट आहेत, जे कंपन्यांनी काही दिवसांसाठी बंद केले आहेत. दुसरीकडे सरकारने आज म्हणजे 25 मार्च पासून 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन संपूर्ण देशात लागू झाला आहे.

The post CoronaVirus मुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीला धक्का, Samsung, Vivo, Xiaomi आणि इतर कंपन्यांची विक्री घटली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-effect-smartphone-company-sales-down-oppo-vivo-samsung-smartphone/feed/ 0
भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्पेस शक्ती देश, लॉन्च केला अवकाशात मारा करणारा मिसाईल https://www.91mobiles.com/marathi/anti-satellite-weapon-a-sat-mission-shakti-pm-modi/ https://www.91mobiles.com/marathi/anti-satellite-weapon-a-sat-mission-shakti-pm-modi/#respond Wed, 27 Mar 2019 10:48:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3945 2012 मध्ये डीआरडीओ चे तत्कालीन चीफ विजय कुमार सारस्वत यांनी सांगितले होते कि भारतात अवकाशातील सॅटेलाईन नेस्तनाबूत करण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे.

The post भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्पेस शक्ती देश, लॉन्च केला अवकाशात मारा करणारा मिसाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एखाद्या देशाची सुरक्षा देशाच्या सैन्यावर अवलंबून असते. बोलले जाते कि युद्ध बंदुकीने नव्हे तर सैनिकांच्या मानसिक मनोबलाने लढता येते. हे अगदी खरे आहे. पण सैनिकांचे आणि देशवासियांचे मनोबल वाढवायचे असेल तर, त्यांना त्यांचा संरक्षाणासाठी आपल्याकडे आवश्यक ती टेक्नॉलॉजी आणि शस्त्रास्त्रे आपल्या देशाकडे आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे हे देखील तेवढेच खरे आहे. भारताची सैन्य शाक्ति जगातील सर्वात मोठ्या सैन्यांमध्ये गणली जाते. आपला देश पाणी, भूमी आणि वायु तिन्ही बाजुंनी तैनात आहे. आज देशाची मान जगासमोर अजून उंच करत भारताने अवकाशात पण शत्रूला मारण्याची यशस्वी चाचणी केली आहे. आता आपण जमिनीवरून अवकाशातील शत्रूला पण पाणी पाजू शकतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करून सांगितले कि भारत जगातील चौथा असा देश बनला आहे जो अवकाशातील उपग्रह नेस्तनाबूत करू शकतो. आपल्या भाषणात मोदींनी सांगितले कि भारत सरकार आणि डिफेंस रिसर्च एंड डेवलेपमेंट आर्गेनाइजेशन (DRDO) ने एंटी-सॅटेलाईट ए-सॅट (A-SAT) चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या मिशनचे नाव ‘मिशन शक्ती’ ठेवण्यात आले होते जो फक्त तीन मिनिटांत पूर्ण करण्यात आला.

मिशन शक्ती

* हे स्पेस मिशन डीआरडीओ ने पार पाडले आहे. भारताआधी फक्त अमेरिका, रशिया आणि चीनने असा कारनामा केला आहे.

* मिशन शक्ती मध्ये अवकाशात पृथ्वीच्या कक्षेत 300 किलोमीटर दूर लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटलाइट उडवून हे ​मिशन यशस्वी करण्यात आले आहे.

* मिशन शक्ती एक पूर्व निर्धारित होते आणि हैराणीची बाब म्हणजे हे कठीण मिशन फक्त तीन मिनिटांत पूर्ण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे साल 2012 मध्ये डीआरडीओ चे तत्कालीन चीफ विजय कुमार सारस्वत यांनी एका मीडिया इन्टरव्यू मध्ये सांगितले होते कि ‘भारतात अवकाशातील सॅटेलाईन नेस्तनाबूत करण्याची टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे, पण सध्या आम्ही याच्या चाचणीसाठी कोणतीही योजना तयार करत नाही.’ या इन्टरव्यू मध्ये सारस्वत यांनी अवकाशातील शास्त्रात्रांची तयारी असावी पण ते त्याच्या बाजूनी नाहीत. त्यावेळी डीआरडीओ प्रमुख म्हटले होते कि भारताची एंटी ​सॅटेलाईन ​सिस्टम थोडी ‘फाईन ट्यून’ करण्याची गरज आहे. आणि आज मोदींच्या नेतृत्वात भारताने ते पूर्ण केले आहे.

The post भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्पेस शक्ती देश, लॉन्च केला अवकाशात मारा करणारा मिसाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/anti-satellite-weapon-a-sat-mission-shakti-pm-modi/feed/ 0