Narzo 10 A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 29 Jun 2020 10:01:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने महाग केले तीन स्मार्टफोन, जाणून घ्या कोणाची किंमत वाढली https://www.91mobiles.com/marathi/realme-6-realme-c2-and-realme-5s-prices-increased-in-india-upto-rs-1000/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6-realme-c2-and-realme-5s-prices-increased-in-india-upto-rs-1000/#respond Mon, 29 Jun 2020 10:01:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7567 कंपनीने तीन मॉडेल रियलमी 5एस, रियलमी सी2 आणि रियलमी 6 स्मार्टफोन्सच्या किंमतीत (ऑफलाइन मार्केट) वाढ केली आहे.

The post Realme ने महाग केले तीन स्मार्टफोन, जाणून घ्या कोणाची किंमत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने भारतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कमी किंमतीत प्रोडक्ट्स लॉन्च करून आपली पकड मजबूत केली आहे. पण अलीकडेच जीएसटी चे दर वाढ्लूंमुळे स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवाव्या लागल्या. त्यानंतर पण कंपनी आपल्या अनेक फोन्सच्या किंमती वाढवत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Realme Narzo 10A आणि Realme C3 च्य किंमती वाढवल्या होत्या. कंपनीने तीन मॉडेल रियलमी 5एस, रियलमी सी2 आणि रियलमी 6 स्मार्टफोन्सच्या किंमतीत (ऑफलाइन मार्केट) वाढ केली आहे.

नवीन किंमत

नवीन किंमत पाहता Realme 5s, स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट किंमत 10,999 रुपयांवरून 11,999 रुपये करण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विकला जाईल. दुसरीकडे Realme 6 स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांच्या ऐवजी 14,999 रुपयांना मिळेल. तसेच इतर दोन वेरिएंट 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजच्या किंमती क्रमशः 16,999 रुपये आणि 17,999 रुपये करण्यात आल्या आहेत. या दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती आधी 15,999 रुपये आणि 16,999 रुपये होत्या.

तसेच कंपनीच्या बजेट कॅटेगरी मध्ये येणाऱ्या Realme C2 बद्दल बोलायचे तर स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे जो 6,999 रुपयांमध्ये विकला जात होते. फोनचे 2 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,999 रुपये आणि 7499 रुपयांवरून क्रमशः 7499 रुपये आणि 7,999 रुपयांना मिळत आहेत.

Realme Narzo 10A आणि C3 च्या किंमती वाढल्या

Realme Narzo 10A बद्दल बोलायचे तर या फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट आधी 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता पण आता या वेरिएंटसाठी 8,999 द्यावे लागतील. तसेच Realme C3 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट आधी 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण आता या वेरिएंटची किंमत वाढून 8,999 रुपये झाली आहे. तसेच Realme C3 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट आधी 8,999 रुपयांना मिळत होता जो आता 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

रियलमी 6 वीडियो

The post Realme ने महाग केले तीन स्मार्टफोन, जाणून घ्या कोणाची किंमत वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6-realme-c2-and-realme-5s-prices-increased-in-india-upto-rs-1000/feed/ 0
5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/#respond Fri, 20 Mar 2020 13:47:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6851 रियलमी इंडियाने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि येत्या 26 मार्चला Realme Narzo सीरीज भारतात लॉन्च केली जाईल.

The post 5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमी 26 मार्चला भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या नवीन सीरीजचा टीजर विडियो ट्विटर वर गुरुवारी पोस्ट केला होता. Realme च्या या नवीन सीरीजचे नाव Narzo असेल, जिच्यात Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन लॉन्च केले जातील. या सीरीजच्या जोरावर रियलमी भारतात पोकोला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल. तसेच कंपनीने आपल्या वेबसाइट वर या सीरीज मधील फोन्सच्या काही फीचर्सचा खुलासा केला आहे.

रियलमी इंडियाने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि येत्या 26 मार्चला Realme Narzo सीरीज भारतात लॉन्च केली जाईल. कंपनी आपल्या ऑफिशियल साइट वर ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून दुपारी 12:30 वाजता Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन सादर करेल.

Narzo सीरीजच्या आधी कंपनीने आपल्या Pro, X, U आणि C सीरीज सादर केलाय आहेत. कंपनीच्या वेबसाइट वर Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोनची झलक दिसली आहे, ज्यात एक ट्रिपल रियर कॅमेरा आणि एक क्वाड कॅमेऱ्यासह दिसत आहे.

कंपनीच्या वेबसाइट नुसार Narzo 10 मध्ये क्वाड कॅमेरा सपोर्ट असेल. तर Narzo 10A मध्ये कंपनी ट्रिपल कॅमेरा देऊ शकते. या दोन्ही फोन्स मध्ये 5000 mAh ची बॅटरी क्विक चार्ज सपोर्ट सह येईल. तसेच कंपनी या फोन्स मध्ये असा प्रोसेसर घेऊन येणार जो भारतात पहिल्यांदा येईल आणि एक गेमिंग प्रोसेसर असेल. वेबसाइट वर प्रोसेसरच्या नावाचा खुलासा झालेला नाही.

डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनी Narzo 10 आणि Narzo 10 A यूनिक आणि बोल्ड डिजाईन सह सादर करेल. दोन्ही फोन्सच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटण आणि डावीकडे पावर ऑन-ऑफ बटण दिला जाईल. हे दोन्ही फोन्स नॉच डिस्प्ले सह सादर केले जातील. कंपनीने नॉच डिस्प्ले सह कोणत्याही फोनच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे कदाचित नारजो 10 पंच होल आणि नारजो 10ए वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. फोन्सच्या डिस्प्ले बद्दल कंपनीने माहिती दिली आहे कि यात 6.5-इंचाचा मोठा डिस्प्ले असेल, ज्याचा स्क्रीन-टू बॉडी रेश्यो 89.8 टक्के असेल.

The post 5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/feed/ 0