Nazrin Hassan - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 21 Jun 2018 12:43:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 12:43:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1010 स्थानिक पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत की नाजरीन यांच्या कोणत्या स्मार्टफोन मध्ये आधी ब्लास्ट झाला होता आणि त्यांचा मृत्यू कसा झाला.

The post स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन आजकाल मोबाइल यूजर्स ची पहिली गरज बनला आहे. दिवसाच्या सुरवातीपासून रात्री झोपेपर्यंत आपण स्मार्टफोन आपल्या सोबत ठेवतो. पण मोबाइल चा हा वापर कधी कधी घातक ठरतो. स्मार्टफोंस च्या बॅटरी मध्ये ब्लास्ट होणे किंवा आग लागल्याच्या बातम्या येत असतात. अशा प्रकारच्या घटना लोकांमध्ये भीती तर निर्माण करतातच पण आता अशी दुर्घटना घडली आहे ज्यात स्मार्टफोन मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे यूजरला आपला जीव गमवावा लागला आहे.

ही भयानक घटना मलेशिया मधील आहे. जिथे नाजरीन हसन नावाच्या एका व्यक्तीचा जीव त्याच्या फोन मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे गेला आहे. मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे की नाजरीन मलेशियन वित्त मंत्रालया साठी काम करत होते आणि क्रॅडल फंड नावाच्या एका संस्थेचे सीईओ होते. बातमी नुसार नाजरीन आपला स्मार्टफोन चार्जिंग वर लाऊन झोपले होते आणि फोन ब्लास्ट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

रिपार्ट्स नुसार नाजरीन कडे ब्लॅकबेरी आणि हुआवई चे दोन स्मार्टफोन ​​होते. नाजरीन हे दोन्ही स्मार्टफोन चार्जिंग वर लाऊन झोपले होते की अचानक एका फोन मध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्ट नंतर च्या आगीने बेडरूम मधील गाद्यांनी पेट घेतला. आगीमुळे संपूर्ण घरात धूर झाला त्यात गुदमरल्यामुळे नाजरीन यांचा मृत्यू झाला. पण दोन्ही पैकी कोणत्या फोन मध्ये ब्लास्ट झाला हे अजून स्पष्ट झाले नाही.

तर दुसरीकडे नाजरीन यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू गुदमरून झाला नाही. कुटुंबानुसार फोन मध्ये ब्लास्ट झाला होता आणि काही वेळाने घरात आग लागली. फोन मध्ये धमाका होताच फोन चे काही तुकडे नाजरीन यांच्या डोक्यात घुसले आणि त्या जखमेमुळे घरात धूर होण्याआधीच त्यांचा जीव गेला होता.

स्थानिक पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत की नाजरीन यांच्या कोणत्या स्मार्टफोन मध्ये आधी ब्लास्ट झाला होता आणि त्यांचा मृत्यू कसा झाला. अशा प्रकारच्या दुर्घटने पासून वाचण्यासाठी 91मोबाईल्स च्या टीम चा सल्ला आहे की आपला स्मार्टफोन ओवरहिट होण्या पासून वाचावा तसेच चार्जिंग इत्यादि साठी कंपनी च्या आॅरिजनल एक्सेसरीज चा वापर करावा.

The post स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/feed/ 0