Nokia 106 (2018) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Nov 2018 08:40:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया ने लॉन्च केला स्वस्त फीचर फोन नोकिया 106 (2018) https://www.91mobiles.com/marathi/nokia-106-2018-feature-phone-launched-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-106-2018-feature-phone-launched-specifications-in-marathi/#respond Thu, 15 Nov 2018 08:40:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2864 कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि 15 तासांचा टॉक टाइम देऊ शकतो.

The post नोकिया ने लॉन्च केला स्वस्त फीचर फोन नोकिया 106 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँड ने अनेक वर्षांपासून आपल्या यूजर्सचा विश्वास कायम ठेवला आहे. फीचर फोन असो वा विंडोज फोन किंवा मग एंडरॉयड फोन, नोकियाचे प्रोडक्ट्स मोबाईल यूजर्सना नेहमीच आवडतात. एंडरॉयड च्या युगात फीचर फोनचा फील देत नोकिया ने आपला नवीन फीचर फोन नोकिया 106 (2018) लॉन्च केला आहे. हा फोन 5 वर्षांपूर्वी आलेल्या नोकिया 106 चा नवीन वर्जन आहे ज्यात शानदार लुक व डिजाईन सोबत आर्कषक फीचर्स आहेत.

नोकिया 106 (2018) पॉलिकार्बोनेट बॉडी वर बनला आहे. फोनची डिजाईन पाहता हा फोन डिस्प्ले च्या बाजूला थोडा रुंद होतो तर की पॅड च्या बाजूने फोनची जाडी कमी करण्यात आली आहे. फोनच्या साईड पॅनल वर कोणतेही बटण नाही. नवीन नोकिया 106 चे डायमेंशन 111.15 x 49.5 x 14.4 मिलीमीटर चे आहे तसेच या फोन मध्ये 160 x 120 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 1.8-इंचाचा क्यूक्यूवीजीए टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन डार्क ग्रे कलर मध्ये सादर झाला आहे.

नोकियाचा हा नवीन फीचर फोन 4एमबी रॅमला सपोर्ट करतो. तर फोन मध्ये इंटरनल स्टोरेज पण 4एमबी आहे. प्रोसेसिंग साठी नोकिया 106 (2018) मध्ये मीडियाटेक चा एमटी6261डी चिपसेट देण्यात आला आहे. नवीन नोकिया फीचर फोन मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने फोन मधील एफएम रेडियो चा आनंद घेता येईल. तसेच फोन मध्ये एलईडी फ्लॅशलाइट पण देण्यात आली आहे.

नोकिया 6 (2018) मध्ये 2000 कॉन्टेक्ट आणि 500 एसएमएस स्टोर करत येतील. तसेच मनोरंजनासाठी या फोन मध्ये नोकियाच्या प्रसिद्ध ‘स्नेक’ गेम सोबत नाइट्रो रेसिंग, डेंजर डॅश आणि टेट्रिस सारखे ट्राय एंड बाय गेम्स प्री-इंस्टॉल्ड आहेत. पावर बॅकअप साठी फोन मध्ये माइक्रो-यूएसबी पोर्ट सह 800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि 15 तासांचा टॉक टाइम देऊ शकतो. नोकिया 106 (2018) 1,590 रूबल मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 1,700 रुपये होतात.

The post नोकिया ने लॉन्च केला स्वस्त फीचर फोन नोकिया 106 (2018) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-106-2018-feature-phone-launched-specifications-in-marathi/feed/ 0