Nokia 110 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 04:42:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia नं लाँच केले दोन नवीन फीचर फोन, खास UPI फीचरही मिळणार https://www.91mobiles.com/marathi/nokia-110-4g-nokia-110-2g-feature-phones-launched/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-110-4g-nokia-110-2g-feature-phones-launched/#respond Wed, 05 Jul 2023 04:42:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21892 Nokia नं आपल्या फीचर फोनची रेंज वाढवत Nokia 110 4G आणि Nokia 110 2G लाँच केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही डिवाइसमध्ये युजर्स यूपीआय पेमेंटची सुविधा वापरता येईल. तसेच फोनची किंमत देखील 2,500 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया किंमत स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेची माहिती. Nokia फीचर फोन्सची किंमत आणि उपलब्धता कंपनीनं Nokia 110 4G […]

The post Nokia नं लाँच केले दोन नवीन फीचर फोन, खास UPI फीचरही मिळणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia 110 4G आणि Nokia 110 2G लाँच झाले आहेत.
  • Nokia 110 2G मॉडेल फक्त 1,699 रुपयांचा आहे.
  • 4G फोनमध्ये 1450 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia नं आपल्या फीचर फोनची रेंज वाढवत Nokia 110 4G आणि Nokia 110 2G लाँच केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही डिवाइसमध्ये युजर्स यूपीआय पेमेंटची सुविधा वापरता येईल. तसेच फोनची किंमत देखील 2,500 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया किंमत स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेची माहिती.

Nokia फीचर फोन्सची किंमत आणि उपलब्धता

  • कंपनीनं Nokia 110 4G (2023) ची किंमत 2,499 रुपये ठेवली आहे.
  • Nokia 110 2G (2023) ची किंमत फक्त 1,699 रुपये आहे.

कलर ऑप्शन पाहता 110 4G मिडनाइट ब्लू आणि आर्कटिक पर्पल सारख्या दोन कलरमध्ये आला आहे. तर 110 2G चारकोल आणि क्लॉउडी ब्लू मध्ये लाँच झाला आहे. तसेच दोन्ही फोनची विक्री कंपनी वेबसाइटसह ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवर केली जाईल.

Nokia फीचर फोन्सचे स्पेसिफिकेशन्स

  • नोकियाच्या नवीन फीचर फोन Nokia 110 4G आणि Nokia 110 2G मध्ये स्लिक डिजाइन देण्यात आली आहे. बिल्ड क्वॉलिटी देखील दमदार ठेवण्यात आली आहे.
  • हे फोन बिल्ट इन रियर कॅमेऱ्यासह येतात. तसेच एसडी कार्ड स्लॉट, म्यूजिक प्लेयर, ऑटो कॉल रेकॉर्डर आणि मोठा स्टोरेजला सपोर्ट देखील आहे.
  • Nokia 110 4G डिवाइसमध्ये 4G कनेक्टिव्हिटीमुळे एचडी व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळत आहे.
  • डिवाइसमध्ये युजर्सना MP3 प्लेयर आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा सपोर्ट पण देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं 32जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
  • बॅटरी पाहता Nokia 110 4G फोनमध्ये 1450 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी दीर्घकाळ बॅकअप देते.
  • संगीत प्रेमींसाठी एफएम रेडियोची सुविधा देखील आहे, जो वायरलेस टेक्नॉलॉजीवर चालतो.
  • तसेच डिवाइसमध्ये सुरक्षित स्कॅन अँड पे यूपीआयची सुविधा देखील आहे.
  • Nokia 110 2G व्हेरिएंट मध्ये 1000 एमएचची बॅटरी आहे. ह्यात देखील दमदार बॅकअप मिळतो. इतर सर्व फीचर एक सारखे आहेत.

The post Nokia नं लाँच केले दोन नवीन फीचर फोन, खास UPI फीचरही मिळणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-110-4g-nokia-110-2g-feature-phones-launched/feed/ 0