Nokia 2.4Nokia 3.4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Nov 2020 13:33:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 26 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होतील Nokia चे स्वस्त स्मार्टफोन, Nokia 3.4 आणि Nokia 2.4 ची होऊ शकते एंट्री https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-nokia-2-4-india-launch-on-26-november-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-nokia-2-4-india-launch-on-26-november-specs-price-sale-offer/#respond Tue, 17 Nov 2020 13:33:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8959 बोलले जात आहे कि येत्या 26 नोव्हेंबरला Nokia 3.4 आणि Nokia 2.4 भारतात ऑफिशियली लॉन्च होतील.

The post 26 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होतील Nokia चे स्वस्त स्मार्टफोन, Nokia 3.4 आणि Nokia 2.4 ची होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने सप्टेंबर मध्ये इंटरनेशनल मार्केट मध्ये आपले दोन कमी किंमत असलेले स्वस्त स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 सादर केले होते. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 11 अपडेट आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह मार्केट मध्ये आले होते जे आंतरराष्ट्रीय लॉन्च नंतर नोकियाच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले होते. अनेक दिवस वेबसाइट वर राहिल्यानंतर आता वाटते आहे लवकरच हे फोन्स बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. बातमी मिळाली आहे कि कंपनी येत्या 26 नोव्हेंबरला नोकिया 3.4 आणि नोकिया 2.4 स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे वर लॉन्च करेल.

नोकिया मोबाईल इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून आपल्या नवीन लॉन्चची माहिती दिली आहे. कंपनीने 14 सेकंदांचा वीडिया टीजर शेयर केला आहे ज्यात ‘काउंट डाउन बिगेन’ करत नवीन फोन लॉन्चची घोषणा केली आहे. या ट्वीट मध्ये लॉन्च होण्यास 10 दिवस उरल्याचे सांगण्यात आले आहे जे 26 नोव्हेंबरच्या तारखेकडे ईशारा करतात. या ट्वीट मध्ये फोनचे नाव लिहिण्यात आले आहेत, पण बोलले जात आहे कि येत्या 26 नोव्हेंबरला Nokia 3.4 आणि Nokia 2.4 भारतात ऑफिशियली लॉन्च होतील.

Nokia 3.4

नोकिया 3.4 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. अँड्रॉइड 10 आधारित हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्यांची सुरवातीची किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या आसपास आहे.

फोटोग्राफी सेग्मेंटसाठी बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.4 मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : दमदार फीचर्स सह पुन्हा आले Nokia 6300 4G आणि Nokia 8000 4G, करतील का मार्केट मध्ये धमाल

Nokia 2.4

नोकिया 2.4 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या आसपास आहे.

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 3.5एमएम जॅक, एनएफसी व 4जी वोएलटीई सोबतच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन पण Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

The post 26 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होतील Nokia चे स्वस्त स्मार्टफोन, Nokia 3.4 आणि Nokia 2.4 ची होऊ शकते एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-nokia-2-4-india-launch-on-26-november-specs-price-sale-offer/feed/ 0