Nokia 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 May 2018 12:59:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लवकरच येईल नोकिया 5 (2018), कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2018-might-come-soon-hmd-global-juho-hints-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2018-might-come-soon-hmd-global-juho-hints-in-marathi/#respond Tue, 08 May 2018 12:59:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=352 जुहो च्या या उत्तराने टेक जगामधे चर्चा सुरू झाली आहे की कंपनी नोकिया 5 (2018) स्मार्टफोन वर काम करत आहे.

The post लवकरच येईल नोकिया 5 (2018), कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ची मालक असलेल्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या मंचावरून आपले नवीन स्मार्टफोन सादर केले होते. या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी ने मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या नोकिया 6 च्या अपडेट वर्जनला पण न्यू नोकिया 6 नावाने सादर केले होते. नाम न्यू नोकिया 6 नंतर कंपनी च्या लो बजेट स्मार्टफोन नोकिया 5 ची वाट बघितली जात होती कि कंपनी या फोन चे पण अपग्रेड वर्जन सादर करेल की नाही. त्यातच आज एचएमडी ग्लोबल च्या चीफ प्रॉडक्ट आॅफिसर कडून एक विधान आले आहे ज्यामुळे येणार्‍या दिवसांमध्ये नोकिया 5 (2018) बाजारात येईल ही शक्यता नाकारता येत नाही.

सोशल मीडिया वर एका यूजर ने एचएमडी ग्लोबल चे चीफ प्रॉडक्ट आॅफिसर जुहो सारविक्स ना हा प्रश्न विचारला की कंपनी नोकिया 5 (2018) बद्दल काही प्लान करत आहे का. या ट्वीट चे उत्तर देत जुहो ने लिहले, स्टे ट्यून्ड ?. जुहो च्या या उत्तराने टेक जगामधे चर्चा सुरू झाली आहे की कंपनी नोकिया 5 (2018) स्मार्टफोन वर काम करत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी जुहो ने नोकिया 7 प्लस च्या दोन्ही सिम वर 4जी एलटीई सपोर्ट येणार असल्याची माहिती पण दिली होती.

नोकिया 5 बद्दल बोलायचे तर हा फोन मेटल बॉडी फ्रेम वर बनला आहे. यात 1280×720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.2-इंचाचा पोलराइज्ड एचडी डिसप्ले देण्यात आला आहे जो 2.5डी गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.1 नुगट आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज र्कोटेक्स ए53 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर चालतो. भारतात नोकिया 5 2जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. दोन्ही वेरिएंट 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतात जी स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी नोकिया 5 च्या बॅक पॅनल वर डुअल-टोन फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल ची वाइड एंगल फ्रंट लेंस आहे. 4जी वोएलटीई सपोर्ट सह फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये एनएफसी तसेच यूएसबी ओटीजी आहे. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 5 च्या 2जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 12,499 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 13,499 रुपये आहे.

The post लवकरच येईल नोकिया 5 (2018), कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-2018-might-come-soon-hmd-global-juho-hints-in-marathi/feed/ 0