Nokia 5310 Xpress Music - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 Jun 2020 10:40:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13 वर्षानंतर पुन्हा आला Nokia 5310, 22 दिवस पुरेल फोनची बॅटरी, नवीन अवतारात आला आहे हा फोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-5310-xpress-music-launched-in-india-with-22-day-battery-backup-dual-speakers-specs-features-price-sale-offers/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5310-xpress-music-launched-in-india-with-22-day-battery-backup-dual-speakers-specs-features-price-sale-offers/#respond Tue, 16 Jun 2020 10:40:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7407 HMD Global ने आज अधिकृतपणे भारतात आपला नवीन फोन Nokia 5310 लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने फक्त 3,399 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post 13 वर्षानंतर पुन्हा आला Nokia 5310, 22 दिवस पुरेल फोनची बॅटरी, नवीन अवतारात आला आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने जेव्हा घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपला 13 वर्षांपूर्वीचा सुपरहिट फोन Nokia 5310 पुन्हा नवीन रूपात व नवीन ढंगात घेऊन येणार आहे. तेव्हापासून इंडियन यूजर्स या फोनच्या लॉन्चची वाट बघत आहेत. आपल्या फॅन्सची उत्सुकता समजून नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या HMD Global ने आज अधिकृतपणे भारतात आपला नवीन फोन Nokia 5310 लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने फक्त 3,399 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

Nokia 5310

नोकिया 5310 च्या माध्यमातून कंपनीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने पॉलिकार्बोनेट डिजाईन वर सादर केला आहे. फोनचा डिस्प्ले सर्फेस कर्व्ड आहे तसेच कीपॅड मॅट फिनिश सह येतो. या फोन मध्ये डेडिकेटेड म्यूजिक बटण देण्यात आले आहेत जे उजव्या पॅनल वर आहेत. इथून गाणी प्ले/पॉज, रिवाइंड, फारर्वड व वॉल्यूम अप/डाउन करता येतील.

Nokia 5310 फोन 2.4 इंचाच्या क्यूवीजीए डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या खाली न्यूमरिक कीपॅड आहे. या फोनचे डायमेंशन 123.7mm x 52.4mm x 13.1mm आहे तसेच फोनचे वजन 88.2ग्राम आहे. फोन मधील डुअल फ्रंट स्पीकर याची खासियत आहे. नोकिया 5310 नोकिया सीरीज 30प्लस ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो एमटी6260ए प्रोसेसर वर चालतो. या फोन मध्ये 8 एमबी रॅम देण्यात आला आहे.

नोकिया 5310 मोबाइल 16एमपी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia 5310 मध्ये एमपी3 प्लेयर सोबत 3जी2, 3जीपी आणि एएमआर फाइल्स पण प्ले करू शकतो. हा फोन एफएम रेडियोला सपोर्ट करतो जो हेडफोन सोबतच वायरलेस पद्धतीने वापरता येतो.

Nokia 5310 मध्ये ब्लूटूथ 3.0 सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि माइक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो GSM 900/1800 नेटवर्क बॅंड वर कनेक्टिविटी देतो. कंपनीने या फोन मध्ये 1200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 20.7 तास टॉकटाईम आणि 22 दिवस स्टॅन्ड बाय राहू शकते. खास बाब अशी आहे कि या फोनची बॅटरीचे कवर काढून फोन मधू काढता येते.

विक्री व उपलब्धता

Nokia 5310 कंपनीने फक्त 3,399 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन White/Red आणि Black/Red कलर मध्ये विकत घेता येईल. नोकिया 5310 देशात आज पासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल जो येत्या 23 जून पासून नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 13 वर्षानंतर पुन्हा आला Nokia 5310, 22 दिवस पुरेल फोनची बॅटरी, नवीन अवतारात आला आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5310-xpress-music-launched-in-india-with-22-day-battery-backup-dual-speakers-specs-features-price-sale-offers/feed/ 0