Nokia 8110 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Oct 2018 12:20:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 12:20:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2621 नोकिया 8110 4जी आल्यामुळे रिलायंसच्या जियोफोन आणि जियोफोन 2 ला थेट टक्कर मिळणार आहे.

The post जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने याच महिन्यात भारतीय मोबाईल बाजारात आपला 4जी फीचर फोन नोकिया 8110 लॉन्च केला आहे. हा शानदार फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. नोकिया 8110 4जी 22 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या नोकिया 8110 मॅट्रिक्सचे नवे स्वरूप आहे. नवीन नोकिया 8110 भारतात लॉन्च झालेला कंपनीचा पहिला 4जी फीचर फोन आहे. पण अशीही बातमी येत आहे कि नोकिया लवकरच यांची संख्या वाढवणार आहे आणि येत्या काही दिवसांत अजून 4जी फीचर फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे,

नोकिया चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल चे इंडिया वाइस प्रेजीडेंट अजय मेहता यांनी नोकियाच्या योजनेचा खुलासा केला आहे. हि माहिती अजय मेहता यांनी डीएनए इंडिया सोबत झालेल्या मुलाखतीती दिली. डीएनएच्या रिपोर्ट नुसार नोकिया ब्रांड नोकिया 8110 4जी भारतात लॉन्च केल्यानंतर अजून पण 4जी फीचर फोन देशात आणू इच्छित आहे. नोकियाचे हे नवीन 4जी फीचर फोन लवकरच बाजारात येतील.

विशेष म्हणजे रिलायंस जियो ने लॉन्च केलेले जियोफोन आणि जियोफोन 2 भारतातील फीचर फोन बाजारात नंबर वन आहेत. हे असे फीचर फोन आहेत जे 4जी कनेक्टिविटी सह येतात आणि देशाच्या फीचरफोन बाजारावर राज्य करतात. नोकिया 8110 4जी आल्यामुळे रिलायंसच्या जियोफोन आणि जियोफोन 2 ला थेट टक्कर मिळणार आहे. इंडियन मार्केट मध्ये जियो ने आपला दबदबा आधीच बनवला असल्यामुळे नोकिया 8110 साठी हि स्पर्धा सोप्पी नसेल.

जियोशी स्पर्धा करण्यासाठी आणि इंडियन फीचर फोन बाजारात आपले नाव कमावण्यासाठी नोकिया येत्या काळात नवीन 4जी फीचर फोन घेऊन येऊ इच्छित आहे. किंमतीच्या बाबतीत जियोफोन आणि जियोफोन 2 नोकिया 8110 4जी पेक्षा स्वस्त आहेत तसेच या 4जी फीचर फोनला नेटवर्क कनेक्टिविटी साठी एखाद्या टेलीकॉम आॅपरेटरची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे भारतीय फीचर फोन बाजारात नोकियाला अडचणी येऊ शकतात.

नोकिया 8110 4जी फीचर फोन पाहता हा फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध होणार आहे. हा फोन आॅनलाईन प्लेटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल. नोकिया 8110 4जी ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन जियो इंटीग्रेशन सह येतो ज्यामुळे फोन मध्ये जियोचा नंबर वापरल्यास ग्राहकांना 544जीबी 4जी डेटा मोफत मिळेल.

The post जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/feed/ 0
नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 11:55:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2480 गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे.

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने कालच इंडियन मार्केट मध्ये आपले दोन शानदार स्मार्टफोन नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही नोकिया फॅनसाठी मोठे सरप्राईजआहेत कारण चर्चा तर नोकिया 7.1 प्लस ची होती परंतु कंपनी ने आपले इतर दोन फोन बाजारात आणले. जरी नोकिया ने अजून नोकिया 7.1 प्लस च्या लॉन्च बद्दल काही सांगितले नसले तरी आता एक नवीन लीक आला आहे नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे,ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर फोन नोकिया एक्स7 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपण नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स6 तसेच नोकिया एक्स5 नावाने लॉन्च केले गेले होते. गीकबेंच च्या या लिस्टिंग वरून समजले आहे कि नोकिया एक्स7 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर वर चालेल.

नोकिया एक्स7 बद्दल ​गीकबेंच लिस्टिंग मध्ये संग्म्यात आले आहे कि एचएमडी ग्लोबल हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गीकबेंच वर नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस ला सिंगल-कोर मध्ये 1827 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5937 स्कोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एचएमडी ग्लोबल येत्या 16 ऑक्टोबरला मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि त्याच दिवशी नोकिया एक्स7 तिथे लॉन्च होईल.

गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे. लीक्स नुसार नोकिया एक्स7 मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6जीबी रॅम सह 4जीबी रॅम सह पण लॉन्च केला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

काल भारतात लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 प्लस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोकिया 8110 4जी बनाना फोन चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला नोकिया 8110 4जी बनाना फोन, सोबत आहे 544जीबी 4जी डेटा मोफत https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-banana-phone-launched-in-india-with-544-gb-jio-free-data-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-banana-phone-launched-in-india-with-544-gb-jio-free-data-offer-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 10:17:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2448 कंपनी ने हा काई ओएस वर सादर केला आहे जो सध्या जियोफोन मध्ये पण उपलब्ध आहे.

The post लॉन्च झाला नोकिया 8110 4जी बनाना फोन, सोबत आहे 544जीबी 4जी डेटा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस मध्ये नोकिया ने 8110 बनाना फोन सादर केला आहे. हा फोन 22 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या कंपनीच्या यशस्वी फोन पैकी एक नोकिया 8110 मॅट्रिक्स चा अपग्रेड वर्जन होता. लॉन्चच्या वेळी कंपनीने माहिती दिली होती कि काही महिन्यात हा फोन ​भारता सह जगभरात अनेक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच ऑगस्ट मध्ये 91मोबाइल्सने एक एक्सक्लूसीव माहिती दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑकटोबरच्या सुरवातीला हा फोन भारतात लॉन्च होईल आणि आज कंपनीने हा जगासमोर आणला आहे. नोकिया 8110 4जी बनाना फोन भारतात लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे आणि हा फोन 24 ऑकटोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

तुम्हाला तर माहितीच आहे कि हा एक फीचर फोन आहे जो काई ओएस वर चालतो. पर फोनची बॉडी पॉलीकार्बोनेट पासून बनलेली आहे जी मागच्या बाजूला कर्व्ड आहे. यामुळेच एक बनाना फोन नाव देण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये आल्फान्यूमेरिक कीपॅड देण्यात आला आहे जो स्लाइडर कवरच्या खाली लपलेला आहे. स्लाइडर बाजूला करताच फोनची स्क्रीन एक्टिव होते. जुन्या नोकिया 8110 मॅट्रिक्स मध्ये मोनोक्रोम स्क्रीन होती. पण यावेळी रंगीत स्क्रीन आणि ऍप्स पण फोन वर वापरता येतील. हा फोन पिवळ्या रंगात उपलब्ध आहे.

कपंनीचे म्हणेन आहे कि 8110 4जी मध्ये तुम्हाला गूगल ऍप्स मिळतील. या फोन वर सोशल ऍप जसे कि— फेसबुक आणि ट्विटर इत्यादी वापरता येतील. 4जी आधारित या फोन मध्ये ऍप स्टोर वरून ऍप्स डाउनलोड करू शकता आणि नोकियाचा प्रसिद्ध स्नेक गेम पण यात आहे.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया 8110 4जी मध्ये 2.4—इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 205 वर चालतो आणि यात 1.1गीगाहट्र्ज चा डुअल कोर प्रोसेसर मिळेल. कंपनी ने हा काई ओएस वर सादर केला आहे जो सध्या जियोफोन मध्ये पण उपलब्ध आहे.

फोनला 512एमबी रॅमची ताकद देण्यात आली आहे तसेच स्टोरेज साठी 4जीबी इंटरनल मेमरी आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी 2एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच वीजीए रेजल्यूशन वाला फ्रंट कॅमेरा पण यात मिळेल. फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आणि तुम्ही 4जी सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ वापरू शकता.तसेच चर्जिंग आणि डेटा ट्रांसफर साठी यूएसबी 2.0 आहे. पावर बॅकअप साठी 1,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन दोन दिवसांचा पावर बॅकअप देऊ शकतो.

नोकिया 8110 4जी जियो इंटीग्रेशन सह येतो, यात तुम्हाला 544जीबी 4जी डेटा मोफत मिळेल. त्याचबरोबर गूगल मॅप्स, एफएम रेडियो आणि मीडिया प्लेयर पण मिळतील.

The post लॉन्च झाला नोकिया 8110 4जी बनाना फोन, सोबत आहे 544जीबी 4जी डेटा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-banana-phone-launched-in-india-with-544-gb-jio-free-data-offer-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : नोकिया 8110 4जी फीचर फोन येत्या महिन्यात भारतता होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-feature-phone-launching-to-india-september-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-feature-phone-launching-to-india-september-features-specifications-in-marathi/#respond Wed, 22 Aug 2018 10:36:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1798 जुहो यांनी नोकिया 8110 4जी कोणतीही फिक्स लॉन्च डेट सांगितली नाही पण एवढे मात्र नक्की सांगितले आहे की हा फोन सप्टेंबर महिन्यात लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल.

The post एक्सक्लूसिव : नोकिया 8110 4जी फीचर फोन येत्या महिन्यात भारतता होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने कालच भारतीय टेक बाजारात आपले दोन नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस देशात लॉन्च केले आहेत. या दोन शानदार स्मार्टफोन्सच्या लॉन्च सोबतच बातमी आली आहे की नोकिया वर मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल आता लवकरच इंडियन मार्केट मध्ये नोकिया 8110 4जी फीचर फोन लॉन्च करणार आहे. ही माहिती इतर कोणी दिली नसून खुद्द कंपनी ने चीफ प्रोडक्ट आॅ​फिसर जुहो सरविकास ने 91मोबाईल्सच्या टीम ला दिली आहे.

नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस च्या लॉन्च ईवेंट मध्ये उपस्थित एचएमडी ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट आॅफिसर जुहो सरविकास यांना 91मोबाईल्स ने नोकिया 8110 4जी फीचर फोन बद्दल विचारल्यावर जुहो ने होकर देत कंपनी हा फोन इंडिया मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जुहो यांनी नोकिया 8110 4जी कोणतीही फिक्स लॉन्च डेट सांगितली नाही पण एवढे मात्र नक्की सांगितले आहे की हा फोन सप्टेंबर महिन्यात लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल.

नोकिया 8110 4जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये आल्फान्यूमेरिक कीपॅड देण्यात आला जो स्लाइडर कवर खाली लपलेला आहे. पॉलीकार्बोनेट ने बनलेली याची बॉडी दिसायला खुप आकर्षक आहे आणि मागचा पॅनल खुप कर्व्ड आहे. फोन मध्ये 2.4 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यामुळे अॅप्स वापर आणि वीडियोज बघता येतील. हा फोन पिवळ्या आणि लाल सहित अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

हा फोन स्मार्ट फीचर ओएस आधारित आहे जो 1.1गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 205 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 512एमबी रॅम देण्यात आला आहे तसेच यात मेमरी कार्ड सपोर्ट सोबत 4जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन 2 मेगापिक्सल च्या कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. तसेच डाटा व कनेक्टिविटी साठी यात 4जी सोबत वाईफाई, ब्लूटूथ आणि यूएसबी 2.0 पोर्ट आहे.

नोकिया 8110 4जी फीचर फोन मध्ये गूगल अॅप्स सोबतच फेसबुक, आणि ट्विटर इत्यादी पण वापरता येतील. 4जी आधारित या फोन मध्ये अॅप स्टोर वरून अॅप्स डाउनलोड करता येतील आणि नोकिया चा बहुचर्चित स्नेक गेम पण यात आहे. तसेच 3.5एमएम आॅडियो जॅक सोबत हा फोन एफएम रेडियो ला पण सपोर्ट करतो. नोकिया 8110 4जी मध्ये पावर बॅकअप साठी 1,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 8110 4जी फीचर फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 79 यूरो आहे जी भारतीय करन्सी नुसार जवळपास 6,000 रुपये आहे. फोन लॉन्च च्या निश्चित तारीख आणि याचे स्पेसिफिकेशन्स लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचवले जातील. कदाचित नोकिया हा फोन अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल करेल.

The post एक्सक्लूसिव : नोकिया 8110 4जी फीचर फोन येत्या महिन्यात भारतता होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8110-4g-feature-phone-launching-to-india-september-features-specifications-in-marathi/feed/ 0