Nokia G10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Apr 2021 11:53:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/#respond Thu, 01 Apr 2021 11:53:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10461 8 एप्रिलला Nokia X10, Nokia X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात.

The post 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी एप्रिलमध्ये एक ग्लोबल ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून ब्रँडचे नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. तर आज नोकिया इंडियाने पण या लॉन्चचा इन्वायट शेयर केला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 8 एप्रिलला नोकिया ज्या मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल त्याच्या मंचावरून नवीन नोकिया फोन भारतीय बाजारात पण घोषित केले जातील. नोकियाने या दिवशी लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण अशी चर्चा आहे कि 8 एप्रिलला Nokia X10, Nokia X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. (HMD Global Nokia India Event on 8th April x20 x10 g10 might launch)

HMD Global ने लॉन्च ईवेंटची माहिती देत सांगितले आहे कि हा कार्यक्रम येत्या 8 एप्रिलला आयोजित केला जाईल जो भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा लॉन्च ईवेंट युरोपात आयोजित केला जाईल पण कंपनी भारतात पण याचे थेट प्रक्षेपण करेल. नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण या लॉन्च ईवेंटचा लाईव टेलीकॉस्ट होईल जो भारतीय युजर पण बघू शकतील.

लीक झाले स्पेसिफिकेशन्स

मागे समोर आलेल्या लीक्स आणि वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्सनुसार Nokia G10 6.38 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. लीकनुसार हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च होईल आणि आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटवर चालेल. लीकमध्ये नोकिया जी10 चा 3 जीबी रॅम वेरिएंट समोर आला होता पण आशा आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंटसह मार्केटमध्ये सादर करेल.

तसेच लीक्समध्ये खुलासा झाला आहे कि फोनच्या मागे क्वॉड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 48MP चा प्राइमरी कॅमेरा सेंसर असेल. तसेच फोनमध्ये 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सल डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळू शकते. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

किंमत आली समोर

लीक्समध्ये आगामी नोकिया स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच यांची किंमत पण शेयर केली गेली आहे. या लीक्सनुसार Nokia G10 ग्लोबल मार्केटमध्ये 139 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. हि किंमत भारतीय करंसीनुसार 12,000 रुपयांच्या आसपास असेल. तसेच Nokia X10 5G ची किंमत 300 यूरो आणि Nokia X20 5G ची किंमत 350 यूरोच्या आसपास असू शकते. हि किंमत भारतीय चालनानुसार 25,900 रुपये आणि 30,000 रुपयांच्या आसपास आहे. असे असले तर ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 8 एप्रिलची वाट बघितली जात आहे.

The post 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-nokia-india-event-on-8th-april-x20-x10-g10-might-launch/feed/ 0
येत आहे Nokia 8.3 5G चा एडवांस वर्जन, या नावाने होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-g10-could-be-the-upgraded-version-of-nokia-8-3-5g-phone-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g10-could-be-the-upgraded-version-of-nokia-8-3-5g-phone-launch-soon/#respond Mon, 15 Mar 2021 08:44:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10326 वेबसाइट रिपोर्टनुसार एचएमडी ग्लोबल आपला हा नवा स्मार्टफोन Nokia G10 नावासह बाजारात आणू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम 700 सीरीजचा नवा चिपसेट देण्यात येईल ज्याचे नाव स्नॅपड्रॅगन 775 किंवा स्नॅपड्रॅगन 775जी चिपसेट असू शकते.

The post येत आहे Nokia 8.3 5G चा एडवांस वर्जन, या नावाने होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्यावर्षी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आपले नाव नोंदवत Nokia 8.3 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेटसह लॉन्च झाला होता जो शानदार डिजाईनसह येतो. तसेच आता बातमी येत आहे की कंपनी या मोबाईलचा अपग्रेडेड वर्जन पण आणण्याची तयारी करत आहे. ताज्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी नोकिया 8.3 5जी चा सक्सेसर वेगळ्या नावाने बाजारात घेऊन येईल आणि हा Nokia G10 नावाने लॉन्च होऊ शकतो.

Nokia 8.3 5G अपग्रेडेड वर्जनची बातमी नोकियापावरयूजर वेबसाइटने दिली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार एचएमडी ग्लोबल आपला हा नवा स्मार्टफोन Nokia G10 नावासह बाजारात आणू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉम 700 सीरीजचा नवा चिपसेट देण्यात येईल ज्याचे नाव स्नॅपड्रॅगन 775 किंवा स्नॅपड्रॅगन 775जी चिपसेट असू शकते. हा चिपसेट नोकिया 8.3 5जी मधील स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेटचा पुढील वर्जन असेल. या आगामी फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सची वाट बघितली जात आहे.

Nokia 8.3 5G

Nokia 8.3 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.81 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ पंच होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकियाने या स्क्रीनला प्योर डिस्प्लेचे नाव दिले आहे. कंपनीने नोकिया 8.3 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो एंडरॉयड वन आधारित आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे जो NSA/SA डुअल मोड 5जी सपोर्ट करतो.

नोकिया 8.3 5जी ग्लोबल मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 400जीबी पर्यंत वाढवता येते. एंडरॉयड वन असल्यामुळे Nokia 8.3 ला पुढील दोन वर्षांपर्यंत एंडरॉयडचे सर्व लेटेस्ट अपडेट मिळतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 8.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. नोकिया 8.3 मध्ये ZEISS लेंस टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 8.3 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड बटण देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी ओटीजी टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ग्लोबल मंचावर Nokia 8.3 5G Polar Night कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post येत आहे Nokia 8.3 5G चा एडवांस वर्जन, या नावाने होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g10-could-be-the-upgraded-version-of-nokia-8-3-5g-phone-launch-soon/feed/ 0