Nokia TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 26 Nov 2019 13:19:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/#respond Tue, 26 Nov 2019 13:19:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5878 या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलचा साउंड सिस्टम असेल.

The post Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात बातमी आली होती कि दिग्गज ब्रँड Nokia पण भारतीय टेलीविजन बाजारात आपले हात अजमावू पाहत आहे. चर्चा अशी होती कि देशात वाढत्या टीव्हीच्या व्यापारामुळे Nokia ब्रँडचा स्मार्ट टेलीविजन पण भारतात लॉन्च केला जाईल. गेल्या काही काळात Xiaomi सोबत OnePlus आणि Motorola ने भारतात स्मार्टटीव्ही लॉन्च केल्यामुळे मोबाईल ब्रँड्सची हिस्सेदारी टेलीविजन बाजारात पण वाढली आहे. त्यात आता Nokia पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहे. मागे Nokia Smart TV बीआईएस वर लिस्ट करण्यात आला होता, तर आज एका मीडिया रिपोर्ट मध्ये Nokia च्या आगामी स्मार्ट टीव्हीचा खरा फोटो पण समोर आला आहे.

Nokia Smart TV चे हे फोटोज डिजीट वेबसाइटने शेयर केले आहेत. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा टेलीविजन डिसेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात लॉन्च केला जाईल आणि हि टीव्ही शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. फोटो मध्ये स्मार्ट टीव्हीचा फुलव्यू दाखवण्यात आलेला नाही पण यात टेलीविजन डिस्प्लेचे वरचे बेजल आणि बॅक पॅनल वरील स्पीकर सिस्टम दिसत आहे.

फोटो वरून समजले आहे कि Nokia Smart TV बारीक बेजल्स सह लॉन्च केली जाईल आणि टीव्ही चा डिस्प्ले आणि बॉडी मध्ये खूप कमी जागा असेल. फोटो मध्ये टीव्ही चा वरचा भाग दाखवण्यात आला आहे, जो बघून असे म्हणता येईल कि या टेलीविजनचे साईड बेजल्स पण खूप बारीक असतील. तसेच Nokia Smart TV च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला स्पीकर दाखवण्यात आला आहे आणि या स्पीकर वर Sound By JBL लिहिण्यात आले आहे. फोटो मध्ये Nokia Smart TV ग्रे शेड कलर मध्ये दाखवण्यात आली आहे.

साउंड असेल खास

पहिल्यांदाच JBL ने टेलीविजन प्रोडक्ट सोबत भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स दिले जातील जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतील. रिपोर्टनुसार Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास असतील आणि या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशन मिळेल. नोकियाचा हा टेलीविजन 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करेल.

Nokia Smart TV

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनी द्वारा लॉन्च केली जाणारी टीव्ही 55-इंचाची असेल. बोलले जात आहे कि हि टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल सह येईल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

The post Nokia Smart TV पुढल्या महिन्यात होईल भारतात लॉन्च, पहिला लुक आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-sound-by-jbl-to-launch-in-india-flipkart-specifications/feed/ 0