Nokia X7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 Oct 2018 13:02:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 13:02:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2518 नोकिया 7.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स7 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च केला जाईल.

The post नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया बद्दल खूप दिवसांपासून लीक्स येत होते कि कंपनी आपला नवींन नॉच​ डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस वर काम करत आहे आणि हा लवकरच बाजारात येईल. त्यानुसार आज कंपनी ने हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. नोकियाचे मलिकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 प्लस आज अंर्तराष्ट्रीय बाजारात सदर केला आहे. नोकिया 7.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स7 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च केला जाईल.

नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या टीएफटी स्क्रीन सह बाजारात आणण्यात आला आहे. हा एंडरॉयड ओरियो सह सादर झाला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने नोकिया एक्स7 तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर इतर दोघांमध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगली फोटोग्राफी कर शकतो. तसेच नोकिया एक्स7 च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया एक्स7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देत आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया एक्स7 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स7 ची किंमत पाहता फोनचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 1699 युआन, 6जीबी/64जीबी वेरिएंट 1999 युआन आणि 6जीबी/128जीबी वेरिएंट 2499 युआन मध्ये लॉन्च झाला आहे.

नोकिया एक्स7 च्या उपरोक्त सर्व वेरिएंट्स च्या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 18,000 रुपये, 21,000 रुपये व 26,500 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस डार्क ब्लू, रेड, सिल्वर व ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च कार्यात आला आहे. अशा आहे कि एचएमडी ग्लोबल लवकरच हा फोन भारतात लॉन्च करेल.

The post नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 11:55:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2480 गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे.

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने कालच इंडियन मार्केट मध्ये आपले दोन शानदार स्मार्टफोन नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही नोकिया फॅनसाठी मोठे सरप्राईजआहेत कारण चर्चा तर नोकिया 7.1 प्लस ची होती परंतु कंपनी ने आपले इतर दोन फोन बाजारात आणले. जरी नोकिया ने अजून नोकिया 7.1 प्लस च्या लॉन्च बद्दल काही सांगितले नसले तरी आता एक नवीन लीक आला आहे नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे,ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर फोन नोकिया एक्स7 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपण नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स6 तसेच नोकिया एक्स5 नावाने लॉन्च केले गेले होते. गीकबेंच च्या या लिस्टिंग वरून समजले आहे कि नोकिया एक्स7 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर वर चालेल.

नोकिया एक्स7 बद्दल ​गीकबेंच लिस्टिंग मध्ये संग्म्यात आले आहे कि एचएमडी ग्लोबल हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गीकबेंच वर नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस ला सिंगल-कोर मध्ये 1827 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5937 स्कोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एचएमडी ग्लोबल येत्या 16 ऑक्टोबरला मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि त्याच दिवशी नोकिया एक्स7 तिथे लॉन्च होईल.

गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे. लीक्स नुसार नोकिया एक्स7 मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6जीबी रॅम सह 4जीबी रॅम सह पण लॉन्च केला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

काल भारतात लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 प्लस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोकिया 8110 4जी बनाना फोन चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0