Non Chinese Mobile - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Nov 2020 13:46:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,999 रुपयांच्या Micromax In 1b ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल, देशीने दाखवला दम https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-top-features-indian-brand-phone/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-top-features-indian-brand-phone/#respond Fri, 06 Nov 2020 13:43:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8853 Micromax In 1b मध्ये 6.52-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे कंपनीने HD+ एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचा स्क्रीन आसपेक्ट रेशिया 20:9 आहे आणि हि वॉटरड्रॉप नॉच सह येते.

The post 6,999 रुपयांच्या Micromax In 1b ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल, देशीने दाखवला दम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
याआधी जेव्हा भारतीय मोबाईल फोनचा उल्लेख केला जायचा तेव्हा लोक असेच म्हणायचे कि चीनी कंपन्यांपुढे इंडियन ब्रँड टिकणार नाहीत. त्याचे कारण पण तसेच होते, भारतीय कंपन्या मागे पडत होत्या आणि बाजारातून गायब होत होत्या. परंतु यावेळी ज्याप्रकारे माइक्रोमॅक्सने पुनरागमन केले आहे बोलले जात आहे कि देशी कंपनीने जबरदस्त ताकद दाखवली आहे आणि चायनीज कंपन्यांना टक्कर देण्याचे दम पण आहे. अलीकडेच कंपनीने भारतीय बाजारात Micromax In 1b आणि Note 1 आणले आहेत. तसेच पाहता दोन्ही शानदार आहेत पण आज आम्ही इथे 6,999 रुपयांच्या माइक्रोमॅक्स इन 1बी बद्दल बोलणार आहोत आणि जाणून घेऊया का आहे हा फोन खास.

मोठी स्क्रीन

Micromax In 1b मध्ये 6.52-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे कंपनीने HD+ एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचा स्क्रीन आसपेक्ट रेशिया 20:9 आहे आणि हि वॉटरड्रॉप नॉच सह येते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1600 pixels आहे आणि पिक्सल डेंसिटी 269 ppi. कंपनीने स्क्रीन प्रोटेक्शन बाबत कोणतीही माहिती दिली नाही. असे असूनही या प्राइस रेंजच्या हिशोबाने हे खूप चांगले म्हणता येईल.

हे देखील वाचा : Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई

कॅमेरा

कंपनीने हा डुअल रियर कॅमेऱ्यासह सादर केला आहे आणि याचा मेन कॅमेरा 13 MP चा आहे. चांगली बाब अशी आहे कि कंपनीने f/1.8 अपर्चरचा वापर केला आहे. कमी रेंजचा फोन असूनही हा चांगला म्हणता येईल आणि लो लाइट मध्ये पण तुम्हाला हा चांगले फोटो क्लिक करण्याचा भरोसा देतो. फोनचा दुसरा सेंसर 2 MP चा आहे आणि कंपनीने डेफ्थ कॅमेऱ्याचा वापर केला आहे. कॅमेरा मध्ये 3x डिजिटल झूमला सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच सेल्फीच्या बाबतीत पण हा कमी नाही आणि फोन मध्ये तुम्हाला 8 MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

प्रोसेसर

Micromax In 1b कंपनीने तैवानी कंपनी MediaTek च्या Helio G35 चिपसेट वर सादर केला आहे. फोन मध्ये 2.3 GHz चा Octa core प्रोसेसर दिला आहे जो 64 bit Cortex A53 आर्किटेक्चर वर चालतो. ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 जीपीयू देण्यात आला आहे. मीडसेग्मेंट मध्ये हा प्रोसेसर चांगल्या गेमिंग परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो.

हे देखील वाचा : Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन

रॅम

माइक्रोमॅक्स इन 1बी ची मोठी खासियत रॅम आणि इंटरनल मेमरी आहे. एक मॉडेल तुम्हाला चांगला वाटणार नाही पण दुसरा मॉडेल प्राइसच्या हिशोबाने जबरदस्त म्हणता येईल. हा फोन 2 GB मेमरी सह येतो. यात 32जीबी स्टोरेज मिळेल. खास बाब अशी आहे कि याचा दुसरा वेरियंट 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह येतो. तुम्हाला हे जाणून थोडी हैराणी होईल कि दोन्ही मॉडेल मध्ये फक्त एक 1,000 रुपयांचा फरक आहे. यात तीन जीबीचा ऑप्शन नाही.

बॅटरी

चांगल्या स्पेसिफिकेशन सह कंपनीने बॅटरी वर पण लक्ष दिले आहे आणि यात तुम्हाला 5,000 mAh ची मोठी बॅटरी मिळेल. कंपनीने 10 वॉट चार्जिंग सपोर्ट सह हा सादर केला आहे.

प्राइस

भारतीय बाजारात Micromax In 1b च्या 2जीबी रॅम मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे. तर 4जीबी रॅम असलेला मॉडेल फक्त 7,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

The post 6,999 रुपयांच्या Micromax In 1b ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल, देशीने दाखवला दम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-top-features-indian-brand-phone/feed/ 0