Nord CE 2 Lite 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 08 Aug 2022 11:31:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-2-lite-5g-deals-and-offers-in-amazon-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-2-lite-5g-deals-and-offers-in-amazon-sale/#respond Mon, 08 Aug 2022 11:31:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12071 OnePlus Nord CE 2 Lite 5G फोनवर डिस्काउंटसह बँक ऑफर आणि एक्सचेंज डील देखील मिळत आहे.

The post फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus नं एप्रिलमध्ये आपला एक शानदार 5G डिवाइस भारतात लाँच केला होता. हा फोन OnePlus Nord CE 2 Lite 5G नावानं ग्राहकांच्या भेटीला आला होता. हा फोन OnePlus X नंतर भारतात सर्वात कमी किंमतीत लाँच होणारा फोन होता. जो भारतीय ग्राहकांना खूप आवडला आहे. गेल्या 4 महिन्यात सुमारे 18,000 युजर्सनी या स्मार्टफोनला Amazon वर चांगली रेटिंग दिली आहे. कमी किंमतीत हातोहात विकला जाणारा हा फोन आता मोठ्या डिस्काउंटसह Amazon वर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता हा डिवाइस तुम्ही आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकत घेता येईल. फोनवर थेट डिस्काउंटसह बँक ऑफर देखील मिळत आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G वर ऑफर्स आणि डील

अ‍ॅमेझॉन ऑफर अंतर्गत OnePlus Nord CE 2 Lite 5G वर 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही हा फोन 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही किंमत फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यावर एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना 750 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे फक्त 18,249 रुपयांमध्ये हा भन्नाट फोन तुमचा होईल. एसबीआय क्रेडिट कार्ड धारक ईएमआय ट्रँजॅक्शनवर 1,250 रुपयांची सूट देखील मिळवू शकतात. हा फोन एक्सचेंज ऑफरसह देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून OnePlus Nord CE 2 Lite 5G वर अतिरिक्त सूट मिळवू शकता. हे देखील वाचा: OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59-इंच IPS LCD फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता या फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS पाहता हा फोन अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्स आधारित ऑक्सीजनओएस 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: 16GB RAM सह बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दणकट OnePlus 10T 5G, सर्वांची होणार सुट्टी!

Nord CE 2 Lite 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात f/1.7 अपर्चर असलेला 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स आणि 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-2-lite-5g-deals-and-offers-in-amazon-sale/feed/ 0