Nubia-A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Sep 2018 06:58:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/#respond Tue, 04 Sep 2018 06:58:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1932 सोबतच नुबिया ने नुबिया रेड मॅजिक स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे जो जवळपास 37,200 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

The post आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बर्‍याच काळापासून आपण नुसतेच ऐकत होतो की असा फोन येईल जो घड्याळाप्रमाणे हातात घालता येईल. हा फोन कॉल साठी उपयोगी ठरेल आणि घड्याळ व कॅल्क्युलेटर म्हणून वापरता येईल. आता असा हा डिवाईस सत्यात आला आहे. जगातील सर्वात मोठा टेक शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आईएफए च्या 2018 संस्करण मध्ये ही अनोखी टेक्नोलॉजी सादर करण्यात आली आहे. हा अजब स्मार्टफोन सादर केला आहे झेटीई च्या सब-ब्रांड नुबिया ने, आणि याचे नाव आहे नुबिया-ए म्हणजे नुबिया अल्फा.

नु​बिया-ए टेक्नोलॉजीचा एक खूपच अनोखा आणि अद्वितीय नमूना आहे. स्मार्टफोन जगासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. ​बर्लिन मध्ये आयोजित आईएफए 2018 च्या मंचावरून नुबिया ने आपला हा अनोखा डिवाईस सादर केला आहे. या डिवाईसला नुबिया-ए अथवा नुबिया अल्फा असे नाव देण्यात आले आहे. या डिवाईस मध्ये कर्व्ड ओएलईडी टच स्क्रीन देण्यात आली आहे जी मनगटावर बांधता येईल. हा स्मार्टफोन सोबतच फिटनेस बँड चे काम करू शकेल.

नुबिया-ए मध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामुळे चालता चालता पण वीडियो चॅट करता येईल. तसेच या फोन मध्ये माइक्रोफोन पण आहे. नुबिया अल्फा च्या बॅकला चार्जिंग पिन देण्यात आली आहे. कोणत्याही फिटनेस बँड प्रमाणे हा डिवाईस च्या बॅकला हार्ट रेट सेंसर पण देण्यात आला आहे. नुबिया-ए मेटल स्ट्रॅप वर बनवण्यात आला आहे जी ब्लॅक, ब्लू आणि गोल्डन कलर मध्ये आहे. पण कंपनी ने अजूनतरी या डिवाईसच्या स्पेसिफिकेशन्य आणि फीचर्स ची माहिती दिली नाही. येत्या काही महिन्यांत नुबिया-ए आॅफिशियली लॉन्च केला जाऊ शकतो.

सोबतच नुबिया ने नुबिया रेड मॅजिक स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे जो जवळपास 37,200 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड ओरियो सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर वर चालतो. फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅम वर सादर करण्यात आला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो.

नुबिया रेड मॅजिक मध्ये 24-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी सारख्या फीचर्स सह यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/feed/ 0