Offers - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Nov 2018 11:56:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/#respond Fri, 23 Nov 2018 11:56:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2966 कंपनी या फोन वर आॅफर देत आहे काही दिवसांसाठी हा फोन 2,000 रुपयांच्या डिस्कॉउंट सह उपलब्ध होईल.

The post 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 भारतात सादर केला होता. 3 रियर कॅमेरे असल्यामुळे या फोनची खूप चर्चा सुरु होती. तसेच कंपनी ने या फोनची किंमत पण खूप अग्रेसिव ठेवली होती. भारतीय बाजारात हा फोन 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी सह उपलब्ध आहे यांची किंमत क्रमश: 23,990 रुपये आणि 28,990 रुपये आहे. चांगली बाब अशी कि कंपनी या फोन वर आॅफर देत आहे काही दिवसांसाठी हा फोन 2,000 रुपयांच्या डिस्कॉउंट सह उपलब्ध होईल.

91मोबाइल्सला आॅफलाइन रिटेलर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे जी 23 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत वैध आहे. पण हि आॅफर फक्त मोठ्या ​​अर्थात 128जीबी वाल्या मॉडेल वर दिली जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी 128जीबी मॉडेल याकाळात 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगची आॅफर आॅफलाइन स्टोर वर उपलब्ध आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन पाहता फोन मध्ये 3 कॅमेरा सेंसर्स आहे. एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करतो, दुसरा 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तिसरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर आहे. ग्लास डिजाइन मध्ये उपलब्ध हा फोन कंपनीने 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच याचा फिंगरप्रिंट स्कॅनर साइड पॅनल मध्ये पावर बटण वर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी ए7 चा सेल्फी कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे. हा फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मेमरी वेरियंट सोबत रॅम पण वेगळा आहे. 64जीबी मेमरी सोबत 4जीबी रॅम तर 128जीबी स्टोरेज सह 6जीबी रॅम आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. गॅलेक्सी ए7 (2018) डुअल सिम 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

The post 3 कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए7 वर मिळत आहे 2,000 रुपयांची सूट, बघा कधीपर्यंत आहे आॅफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a7-offer-rs-2000-discount-in-marathi/feed/ 0