OnePlus 6T McLaren Editon - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Dec 2018 08:58:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि सुपर फास्ट चार्जिंग सह लॉन्च झाला वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-launched-in-india-with-10gb-ram-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-launched-in-india-with-10gb-ram-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 13 Dec 2018 08:58:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3156 13 डिसेंबरला हा फोन दिल्ली क्नॉट प्लेस मधील कंपनीच्या एक्सक्लूसिव स्टोर वर सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच 15 डिसेंबर पासून अमेझॉन इंडिया, कंपनीच्या आॅफिशियल साइट आणि वनप्लस एक्सपीरियंस सेंसर वर सेल साठी येईल.

The post 10जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि सुपर फास्ट चार्जिंग सह लॉन्च झाला वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोव्हेंबर मध्ये वनप्लस ने आपल्या 6 सीरीजचा नवीन फोन 6टी बाजारात सादर केला होता. दामदार स्पेसिफिकेशन असलेला हा फोन अजूनही खूप चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने याच्या नवीन वर्जन वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशनची घोषणा केली होती आणि आता हा फोन भारतात उपलब्ध झाला आहे. नावावरूनच समजते की हा फोन कंपनी ने आॅटोमोबाइल कंपनी मॅक्लारेन सोबत मिळून आणला आहे. मॅक्लारेन खास करून आपल्या रेसिंग कारसाठी ओळखली जाते आणि कंपनी पण हा फोन स्पीड सोबत जोडून सादर करत आहे. वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन मध्ये 10जीबी रॅम देण्यात आला आहे. भारतात 10जीबी रॅम सह लॉन्च होणार हा पहिला फोन आहे. सोबतच फोन मध्ये वार्प चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीनुसार हा जुन्या डॅश चार्जिंग पेक्षा जास्त फास्ट आहे.

वनप्लस 6टी मॅकलारेन एडिशन ची प्राइस
भारतीय बाजारात वनप्लस 6टी ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे पण 6टी मॅक्लारेन एडिशन साठी तुम्हाला 50,999 रुपये द्यावे लागतील. हा वनप्लसचा आतापर्यंतचा सर्वात महाग डिवाइस आहे. 13 डिसेंबरला हा फोन दिल्ली क्नॉट प्लेस मधील कंपनीच्या एक्सक्लूसिव स्टोर वर सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच 15 डिसेंबर पासून अमेझॉन इंडिया, कंपनीच्या आॅफिशियल साइट आणि वनप्लस एक्सपीरियंस सेंसर वर सेल साठी येईल.

लॉन्च सोबत कंपनी ने काही आॅफर्स दिल्या आहेत. वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन ची किंमत 50,999 रुपये आहे पण कंपनी एक्सिस बँक इएमआई ट्रांजेक्शन वर 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. तसेच एक्सिस बॅंकेच्या डेबीट आणि क्रेडिट कार्डच्या खरेदीवर तुम्हाला 1,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. जर कंपनीचा फोन एक्सचेंज केल्यास तर तुम्हाला 3,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल तसेच दुसरा डिवाइस एक्सचेंज केला तर 2,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल.

वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन चे स्पेसिफिकेशन
वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन मध्ये मुख्य फरक कलर आणि रॅमचा आहे. फोन गडद मेटॅलिक रंगांत सादर केला गेला आहे जो आकर्षक वाटतो. यात 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. कंपनी ने एमोलेड स्क्रीनचा वापर केला आहे आणि वरच्या बाजूला वॉटर ड्रॉप नॉच दिसेल. सोबत हि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे. वनप्लस 6टी प्रमाणे हा पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 10जीबी रॅम आहे तसेच यात 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट नाही.

वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे. हा जवळपास स्टॉक यूआई सारखा आहे जो तुम्हाला प्योर एंडरॉयड चा अनुभव देतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. दोन्ही सेंसर एफ/1.7 अपर्चर सह येतात. कॅमेऱ्यासोबत इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच सेल्फी साठी 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

वनप्लस 6टी मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये तुम्ही 4जी वोएलटीई वापरू शकता. सोबत वाईफाई, ब्लूटूथ मिळेलच तसेच एनएफसी पण देण्यात आली आहे. डेटा ट्रांस्फर साठी यूएसबी टाइप—सी आहे. यात 3.5 आॅडियो जॅक नाही. पावर बॅकअप साठी 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 10जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि सुपर फास्ट चार्जिंग सह लॉन्च झाला वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-launched-in-india-with-10gb-ram-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 13:46:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3029 वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन ची किंमत किती असेल आणि हा कधी पासून सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 12 डिसेंबरची वाट बघावी लागेल.

The post 10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर शब्द ऐकताच वनप्लसचे नाव लक्षात येते. या टेक कंपनी ने नेमकेच स्मार्टफोन्स आणून भारतासह इंटरनेशनल टेक मंचावर आपली ओळख बनवली आहे. वनप्लस 6टी कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे जो भरपूर शानदार डिजाईन व दमदार प्रोसेसर आहे. भारतात वनप्लस 6टी 6जीबी रॅम/128जीबी मेमरी, 8जीबी रॅम/128जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम/256जीबी मेमरीच्या तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर आता आपला हाच स्मार्टफोन अजून पावरफुल करत कंपनी वनप्लस 6टी ला 10जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करणार आहे.

वनप्लस येत्या 12 डिसेंबरला मुंबई मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंट मध्ये कपंनी वनप्लस 6टी चा नवीन वेरिएंट सादर करेल. वनप्लस 6टी चा हा नवीन वेरिएंट 10जीबी च्या पावरफुल रॅम सह येईल. तसेच या नवीन वेरिएंट मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. वनप्लस आपला हा नवीन स्मार्टफोन वेरिएंट स्पोर्ट्स कार कंपनी मॅकलॅरेन सोबत मिळून बनवत आहे आणि हा नवीन मॉडेल वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन नावाने लॉन्च होईल.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन बद्दल कंपनी ने जास्त माहिती दिली नाही पण आशा आहे कि हा फोन डिजाईन व लुक सोबतच अन्य स्पेसिफिकशेन्सच्या बाबतीती पण वनप्लस 6टी सारखा असेल. वनप्लस 6टी ची बॉडी मेटल फ्रेम वर बनली आहे पण मागील पॅनल वर काच देण्यात आली आहे. वनप्लस 6टी कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो छोटयाश्या ‘ओ’ शेप वाल्या एयरड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 6.41-इंचाचा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. हा फोन फुल एचडी+ (1080 x 2280 पिक्सल) रेजल्यूशन सह येतो. सोबतच हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 कोटेड आहे.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन पण फोनच्या रेग्यूलर वर्जन प्रमाणे एंडरॉयड 9 पाई आधारित कंपनीच्याच आॅक्सिजन ओएस वर सादर केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी वनप्लस 6टी मध्ये आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी हा ऐड्रेनो 630 जीपीयू ला सपोर्ट करतो. वनप्लस 6टी च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 20-मेगापिक्सलचा सेकेंडीरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वनप्लस 6टी डुअल सिम फोन आहे ज्याच्या दोन्ही सिम वर 4जी वोएलटीई वापरता येते. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच कंपनी ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे. तसेच पावर बॅकअप साठी वनप्लस 6टी मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह फास्ट चर्जिंग सपोर्ट वाली 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वनप्लस 6टी मॅकलॅरेन एडिशन ची किंमत किती असेल आणि हा कधी पासून सेल साठी उपलब्ध होईल या माहितीसाठी 12 डिसेंबरची वाट बघावी लागेल. वनप्लस 6टी च्या सध्याच्या वेरिएंट्स ची किंमत पाहता फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनच्या 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

The post 10जीबी रॅम सह येत आहे वनप्लस 6टी चा नवीन अवतार, 12 डिसेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-mclaren-edition-to-launch-in-india-on-12-december-with-10-gb-ram-in-marathi/feed/ 0