OnePlus 7 ProOneplus 7T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Sep 2019 12:40:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/#respond Fri, 27 Sep 2019 12:40:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5434 या फोनचा सेल अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाइट वर 28 सप्टेंबरला केला जाईल.

The post OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आजचा दिवस इंडियन टेक मार्केट साठी खूप खास होता. फ्लॅगशिप कीलर नावाने प्रसिद्ध टेक ब्रँड OnePlus ने आज भारतात एक साथ दोन बहुप्रतीक्षित डिवाईस लॉन्च केले आहेत. कंपनीने OnePlus 7T आणि OnePlus TV देशात आणले आहेत जे इंडियन मंचावरून पहिल्यांदा जगासमोर आले आहेत. OnePlus TV द्वारे वनप्लस कंपनीने स्मार्टफोनच्या दुनियेनंतर स्मार्ट टेलीविजन विश्वात पण आपली सुरवात केली आहे, तर OnePlus 7T स्मार्टफोन सह कंपनीने आपल्या OnePlus 7 सीरीजचा विस्तार केला आहे. चला एक नजर टाकू OnePlus 7T च्या लुक, स्पेसिफिकेशन्स आणि या दमदार फोनच्या किंमतीवर.

OnePlus 7T डिजाईन

वनप्लस ने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 7T मध्ये नवीन डिजाईन वापरली आहे. आतापर्यंत OnePlus स्मार्टफोन्स मध्ये वर्टिकल शेप रियर कॅमेरा दिला जात होता पण OnePlus 7T मध्ये कंपनीने राउंड शेपचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध आहे जो बॉडीपासून थोडा वर आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आहेत जे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहेत. कॅमेरा सेंसरच्या खाली राउंड शेप मधेच फ्लॅश लाईट आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली OnePlus चा लोगो आहे आणि रियर पॅनल वर खाली OnePlus ची ब्रँडिंग देण्यात आली आहे.

OnePlus 7T फुलव्यू बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यावर छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या चारही कडा बेजल लेस आहेत डिस्प्ले एज वर कर्व देण्यात आला आहे. फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर पावर बटण व शार्टकट ‘रिंगर’ की देण्यात आली आहे. OnePlus 7T च्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आहे तसेच लोवर पॅनल वरच डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे.

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. OnePlus 7T कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी OnePlus 7T 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

OnePlus 7T एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट वर चालतो. OnePlus 7T 8 जीबी रॅम आहे जो भारतात 128 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे OnePlus 7T ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येणार नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.6 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी साठी OnePlus 7T मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर देण्यात आला आहे.

OnePlus 7T डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा डिवाईस 30वॉट वॉर्प फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी असलेली 3700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने OnePlus 7t च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या फोनचा सेल अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाइट वर 28 सप्टेंबरला केला जाईल.

The post OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/feed/ 0