OnePlus 7Oneplus 7T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Aug 2019 13:31:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/#respond Thu, 29 Aug 2019 13:31:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5170 लीक नुसार OnePlus 7T क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल.

The post OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध टेक ब्रँड OnePlus बद्दल सतत बातम्या येत आहेत कि कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन मॉडेल्स वर काम करत आहे आणि हे OnePlus 7T तसेच OnePlus 7T Pro नावाने लॉन्च केले जातील. कंपनीने अजूनतरी OnePlus 7T सीरीज वर शिकामोर्तब केला नाही पण एका नवीन लीक मध्ये OnePlus 7T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत. स्पेसिफिकेशन्स सोबत असे पण सांगण्यात आले आहे कि OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro येत्या 26 सेप्टेंबरला भारतात लॉन्च केले जातील.

OnePlus 7T सीरीज संबंधित हि माहिती इंडियन टिपस्टर इशान अग्रवाल ने दिली आहे. ट्वीट मधून त्याने सांगितले आहे कि OnePlus कपंनी येत्या 26 सेप्टेंबरला भारतात आपले दोन नवीन फोन OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro लॉन्च करेल. फोनची लॉन्च डेट सोबतच या ट्वीट मध्ये OnePlus 7T च्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला आहे. या लीक मध्ये OnePlus 7T च्या रॅम व स्टोरेज सह फोनच्या कॅमेरा सेग्मेंट व प्रोसेसरची माहिती पण देण्यात आली आहे, जी अशी आहे:

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या लीक नुसार OnePlus 7T कंपनी 6.55 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च करेल जो 2के रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. OnePlus 7T च्या डिस्प्ले बद्दल सांगण्यात आले आहे कि हा 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला जाईल ज्याच्या वरच्या भागात छोटीशी नॉच दिली जाईल. लीक मध्ये OnePlus 7T फ्रोस्टेड सिल्वर आणि हेज ब्लू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

OnePlus 7T बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी हा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च करेल. OnePlus 7T 8जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करेल. यात फोनचा एक वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येईल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाईल. लीक नुसार OnePlus 7T क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. सोबतच स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 12-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी OnePlus 7T मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,800एमएएच ची बॅटरी असू शकते.

OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro बद्दल अजूनतरी कंपनीने माहिती दिली नाही. OnePlus ने कोणतीही अधिकृत घोषणा करेपर्यंत या स्मार्टफोंसच्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/feed/ 0