OnePlus 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Oct 2020 13:17:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/#respond Fri, 16 Oct 2020 13:17:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8548 OnePlus 8 5G तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. हँडसेटच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 41,999 रुपये होती. आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकला जाईल.

The post OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हाईएंड फ्लॅगशिप फोन सह मिडरेंज स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी OnePlus ने बुधवारी आपला नवीन OnePlus 8T 5G सादर केला आहे. हा फोन 65W फास्ट चार्जिंग आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारख्या फीचर्स सह सादर केला गेला आहे. तसेच हा फोन लॉन्च केल्यानंतर वनप्लसने भारतात OnePlus 8 5G ची किंमत कमी केली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून मिळलेल्या माहितीनुसार हँडसेटची किंमत 5,000 रुपयांपर्यंत कायमची कमी करण्यात आली आहे.

नवीन किंमत

OnePlus 8 5G तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. हँडसेटच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आधी 41,999 रुपये होती. आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकला जाईल. 8GB + 128GB वर्जनची किंमत 44,999 रुपये आणि 12GB रॅम व 256GB ऑप्शनची किंमत 49,999 रुपये होती. पण प्राईस कट नंतर दोन्ही वेरिएंट क्रमश: 41,999 रुपये व 44,999 रुपयांमध्ये विकले जातील.

हा फोन ऑनलाइन सोबतच ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर 16 ऑक्टोबर पासून नवीन किंमतीत विकला जाईल. आता कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर फोन जुन्या किंमतीत लिस्ट झाला आहे. दुसरीकडे अमेझॉन इंडिया वर पण फोनची जुनी किंमत दिसत आहे.

OnePlus 8 चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8 मध्ये 6.55-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेट अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच यात पावर बॅकअपसाठी 4300 एमएएचची बॅटरी आहे. वनप्लस 8 च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात दिलेल्या सेंसर बद्दल बोलायचे तर कंपनीने OnePlus 8 मध्ये Sony IMX586 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर दिला आहे, ज्याचा अपर्चर f/1.75 आहे. फोन मध्ये f/2.4 अपर्चर सह 16-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अपर्चर f/2.2 सह 2-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला वनप्लसने Sony IMX471 चा f/2.25 अपर्चर सह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

The post OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-got-price-after-oneplus-8t-launch-in-india-know-new-price-and-specifications/feed/ 0
OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/#respond Tue, 22 Sep 2020 16:40:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8267 OnePlus 8T एक 5G फोन असेल आणि हा 5जी कनेक्टिविटी फीचर सह भारतीय बाजारात येईल.

The post OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियो मध्ये विस्तार करत नवीन स्मार्टफोन OnePlus 8T टेक मंचावर सादर करणार आहे. या दिवशी वनप्लस 8टी चा ग्लोबल लॉन्च होईल आणि 14 ऑक्टोबरलाचा हा मोबाईल भारतीय बाजारात पण येईल. कंपनीने OnePlus 8T च्या लॉन्च बद्दल सांगितल्यानंतर आता या फोनशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात लॉन्चच्या आधीच फोनच्या किंमतीचा खुलासा केला गेला आहे.

OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.

OnePlus 8T एक 5G फोन असेल आणि हा 5जी कनेक्टिविटी फीचर सह भारतीय बाजारात येईल. या फोनचा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल.

OnePlus 8T

वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

The post OnePlus 8T ची किंमत झाली लीक, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, बघा याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8t-price-leaked-before-14-october-launch/feed/ 0
वनप्लसने दिला झटका, OnePlus 8 आणि 8 Pro ची विक्री रद्द, आता होणार नाही भारतात विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-sale-postponed-by-the-company-in-india-know-price-full-specs/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-sale-postponed-by-the-company-in-india-know-price-full-specs/#respond Thu, 28 May 2020 12:34:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7127 OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro कधी ओपन सेलसाठी उपलब्ध होतील याची माहिती कंपनीने दिली नाही. पण यादरम्यान उद्या दुपारी 12 वाजता OnePlus 8 5G चे काही यूनिट कंपनी द्वारे स्पेशल सेल अंतर्गत विकले जातील.

The post वनप्लसने दिला झटका, OnePlus 8 आणि 8 Pro ची विक्री रद्द, आता होणार नाही भारतात विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने एप्रिल मध्ये टेक मंचावर आपली ‘वनप्लस 8 सीरीज’ सादर करत OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. भारतातील लॉन्चच्या नंतर हे फोन्स देशात प्री-ऑर्डरसाठी पण उपलब्ध झाले होते आणि यांची पहिली विक्री 11 मे ला होणार होती. पण कोरोना वायरस आणि लॉकडाउनमुळे कंपनीने फोनच्या विक्रीची तारीख बदलून 29 मे करण्यात आली होती. तर आता पुन्हा वनप्लसने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो ची विक्री पुन्हा अनिश्चित काळासाठी रद्द करत आहे.

वनप्लस 8 सीरीजचा ओपन सेल रद्द करत कंपनीने सांगितले आहे कि सध्यातरी कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची विक्री करणार नाही. लॉकडॉउनमुळे स्मार्टफोन्सच्या निर्मतीवर परिणाम झाला आहे आणि आता कंपनी नवीन योजनेनुसार आपली योजना आखेल. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro कधी ओपन सेलसाठी उपलब्ध होतील याची माहिती कंपनीने दिली नाही. पण यादरम्यान उद्या दुपारी 12 वाजता OnePlus 8 5G चे काही यूनिट कंपनी द्वारे स्पेशल सेल अंतर्गत विकले जातील.

अशी आहे किंमत

वनप्लस 8 सीरीज मध्ये OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro दोन्ही फोन्स कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. फोनच्या छोट्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्या सोबतच हा फोन 128 जीबीच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच वनप्लस 8 आणि 8 प्रो चा दूसरा वेरिएंट 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्या सोबतच 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OnePlus 8 Pro LPDDR5 रॅम आणि UFS 3.0 स्टोरेज टेक्नॉलॉजी आहे.

किंमत पाहता OnePlus 8 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट 54,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 59,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. OnePlus 8 बद्दल बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 41,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

वनप्लस 8 प्रो वीडियो

The post वनप्लसने दिला झटका, OnePlus 8 आणि 8 Pro ची विक्री रद्द, आता होणार नाही भारतात विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-sale-postponed-by-the-company-in-india-know-price-full-specs/feed/ 0
Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/ https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/#respond Fri, 01 May 2020 12:55:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7367 आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Corona महामारीमुळे देशात सध्या लॉकडाउन चालू आहे. या लॉकडाउनमुळे सर्वात जास्त स्मार्टफोन मार्केट मध्ये मंदी आली आहे. दुसरा लॉकडाउन 3 मे ला समाप्त होणार आहे. पण 3 मे ला पूर्णपणे लॉकडाउन संपेल कि नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. काही रिपोर्ट्सनुसार मोबाईल शॉप आणि ई-कॉर्मस साइट्सच्या माध्यमातून फोन्सची विक्री सुरु होईल.

काही दिवसांपूर्वी काउंटरपॉइंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर नील शाह यांनी सांगितले होते कि मार्केट जेव्हा पुन्हा सुरु होईल तेव्हा जवळपास सर्व मोठ्या कंपन्या नुकसान भरून काढण्यासाठी आकर्षक किंमतीत आणि नवीन स्ट्रॅटेजीची मदत घेऊ शकतात.

लॉकडाउनमुळे सर्व शाओमी, रियलमी, वीवो आणि सॅमसंग सारखे सर्व स्मार्टफोन ब्रॅंड्सनी आपले नवीन लॉन्च तर रद्द केले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे 3 मे नंतर सरकार स्मार्टफोन्सची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइनच्या माध्यमातून चालू करू शकते. यासाठी या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला त्या फोन्स बद्दल सांगणार आहोत जे मे मध्ये लॉन्च केले जातील आणि विक्रीस येतील.

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro

सर्वात आधी बोलूया वनप्लस 8 सीरीज बद्दल, जी अलीकडेच कंपनीने ग्लोबली लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये सादर केलेल्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची वाट अनेक ग्राहक बघत आहेत. तसेच कंपनीने अमेझॉनच्या माध्यमातून डिवाइसची प्री-बुकिंग घेण्यास सुरवात केली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि लॉकडाउन मध्ये सूट मिळताच डिवाइसची विक्री केली जाईल. OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro ची बेस किंमत क्रमश: 41,999 रुपये व 54,999 रुपये आहे.

Realme Narzo 10 आणि Narzo 10A

एकदा नव्हे तर दोनदा Realme Narzo सीरीजचा लॉन्च टाळण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे Realme हि सीरीज लॉन्च करू शकत नाही, पण लॉकडाउन उघडताच Realme Narzo 10 आणि Realme Narzo 10A भारतात येतील. तसेच लॉन्च नंतर डिवाइस विक्रीसाठी सादर केले जाऊ शकतात. कारण कंपनी यावर्षी अजून अनेक स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे.

Vivo V19

वीवो वी19 पण पुढल्या महिन्यात मे मध्ये लॉन्च होण्यासाठी तयार दिसत आहे. हा फोन आधीच दुसऱ्या देशात लॉन्च झाला आहे. तसेच यावर्षी मार्च मध्ये भारतात लॉन्च केला जाणार होता. पण कोरोनामुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे वीवोला पण आपला लॉन्च रद्द करावा लागला. वीवो वी19 स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट सह येतो. तसेच फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप आहे मागे क्वाड-कॅमेरा सेटअप आहे.

Xiaomi Mi 10

108-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेला शाओमी मी 10 पण पुढल्या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. या डिवाइसच्या लॉन्चची वाट भारतात गेल्यावर्षी पासून बघितली जात आहे. Xiaomi ने भारतात Mi 10 लॉन्च करण्यासाठी आधी 31 मार्च तारीख ठरवण्यात आली होती, पण हा लॉन्च केला गेला नाही. आता पुढल्या महिन्यात म्हणजे मे मध्ये हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy S20 Ultra

लॉकडाउनच्या आधी सॅमसंगने गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये दोन मॉडेल गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20 प्लस विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. पण या सीरज मध्ये हाई-एंड गॅलेक्सी एस20 अल्ट्राची विक्री होऊ शकली नाही. आता आशा आहे कि हा डिवाइस पुढल्या महिन्यात विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

Motorola Razr

सर्वात खास डिजाइन सह गेल्या वर्षी आलेला मोटोरोला रेजर 2019 यावर्षी भारतात लॉन्च झाला आहे. पण विक्रीसाठी येऊ शकला नाही. दुसरा लॉकडाउन सम्पल्यावर डिवाइस विक्रीसाठी सादर केला जाऊ शकतो.

नोट: कोणत्याही कंपनीने पुढल्या महिन्यात डिवाइसच्या लॉन्च आणि विक्री बद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पण आम्हाला आशा आहे कि 3 मे नंतर सरकार मोबाईल फोन्सच्या विक्रीला ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगी देऊ शकते.

The post Vivo V19, Mi 10 आणि Realme Narzo 10 समवेत भारतात हे 8 स्मार्टफोन होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/these-8-smartphones-will-be-launched-in-india-including-vivo-v19-mi-10-and-realme-narzo-10/feed/ 0
OnePlus Z लॉन्च करण्यासाठी तयार आहे फ्लॅगशिप कीलर वनप्लस, यात असतील ताकदवान स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-z-to-launch-in-july-know-the-specs-price-sale-offer-oneplus-8-pro/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-z-to-launch-in-july-know-the-specs-price-sale-offer-oneplus-8-pro/#respond Tue, 28 Apr 2020 12:19:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7416 OnePlus Z याआधी OnePlus 8 सीरीज सोबत लॉन्च केला जाणार होता, पण काही कारणास्तव कंपनीला हि योजना बदलावी लागली.

The post OnePlus Z लॉन्च करण्यासाठी तयार आहे फ्लॅगशिप कीलर वनप्लस, यात असतील ताकदवान स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने अलीकडेच टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘वनप्लस 8 सीरीज’ सादर केली आहे. कंपनीने सीरीज मध्ये दोन नवीन फोन जोडले आहेत जे OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro नावाने बाजारात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल फ्लॅगशिप डिवाईस आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. देशात चालू असलेल्या लॉकडाउननंतर हे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होतील. पण फोनच्या विक्रीच्या आधीच वनप्लसचा अजून एक नवीन फोन OnePlus Z समोर आला आहे जो या तिमाहीचे शेवटपर्यंत टेक मंचावर येईल.

OnePlus Z ची माहिती सध्या एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. प्रसिद्ध टिपस्टरने आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून वनप्लस झेड चा टीजर शेयर केला आहे. या टीजर मध्ये मोठ्या अक्षरात ‘Z’ लिहिण्यात आला आहे. या इंग्रजी शब्दांव्यतिरिक्त टीजर मध्ये ‘जुलै 2020’ पण लिहिण्यात आले आहे. ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि वनप्लस आपल्या पोर्टफोलियो मध्ये OnePlus Z नावाने स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हा फोन जुलै मध्ये टेक मंचावर येईल.

विशेष म्हणजे OnePlus Z याआधी OnePlus 8 सीरीज सोबत लॉन्च केला जाणार होता, पण काही कारणास्तव कंपनीला हि योजना बदलावी लागली. OnePlus Z बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो स्क्रीनच्या वर मध्यभागी असेल. स्क्रीन 6.4 इंचाची असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येऊ शकते. फोन मध्ये मीडियाटेक डायमंसिटी 1000 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीक नुसार वनप्लस झेड 48 मेगापिक्सलच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आणि फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल.

OnePlus 8 सीरीज

OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro दोन्ही फोन्स कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. फोनच्या छोट्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच वनप्लस 8 आणि 8 प्रो चा दुसरा वेरिएंट 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्या सोबत 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OnePlus 8 Pro LPDDR5 रॅम आणि UFS 3.0 स्टोरेज टेक्नॉलॉजी सह येतो.

किंमत पाहता OnePlus 8 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट 54,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 59,999 रुपयांमध्ये बाजारात आहे. OnePlus 8 पाहता फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 41,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 44,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

The post OnePlus Z लॉन्च करण्यासाठी तयार आहे फ्लॅगशिप कीलर वनप्लस, यात असतील ताकदवान स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-z-to-launch-in-july-know-the-specs-price-sale-offer-oneplus-8-pro/feed/ 0
OnePlus 8 सीरीज उद्या होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या आपल्या मोबाईल वर हा मोठा ईवेंट लाईव बघण्याचा मार्ग https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-launching-in-india-how-to-watch-live-event-on-phone-know-price-sale-specs-offers/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-launching-in-india-how-to-watch-live-event-on-phone-know-price-sale-specs-offers/#respond Mon, 13 Apr 2020 12:28:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7063 OnePlus 8 सीरीजच्या लॉन्चच्या आधीच याच्या किंमतीसंबंधित लीक समोर आला आहे ज्यात फोन्सच्या वेरिएंट्स आणि किंमतची माहिती देण्यात आली होती.

The post OnePlus 8 सीरीज उद्या होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या आपल्या मोबाईल वर हा मोठा ईवेंट लाईव बघण्याचा मार्ग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus असा ब्रँड बनला आहे ज्याचा एखादा फोन लॉन्च होतोत तेव्हा यूजर्स वाटत बघत असतात कि आता पुढील वनप्लस फोन कधी लॉन्च होईल. अशीच वाट OnePlus 8 सीरीजने पण बघायला लावली आहे. पण आता हि प्रतीक्षा संपणार आहे. फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध असेलेली OnePlus कंपनी उद्या म्हणजे 14 एप्रिलला आपली नेक्स्ट जेनरेशन टेक मंचावर सादर करणार आहे. OnePlus 8 सीरीज सादर करत सीरीज अंतर्गत OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus 8Z स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. जर तुम्ही पण वनप्लसचे फॅन असाल तर पुढे आम्ही घर बसल्या आपल्या फोन वर हा मोठा लॉन्च ईवेंट बघण्याचा मार्ग सांगितला आहे.

OnePlus उद्या आपली वनप्लस 8 सीरीज सादर करणार आहे. हि फ्लॅगशिप सीरीज जगात पहिल्यांदा भारतात लॉन्च होत आहे. कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडॉउन पाहता वनप्लस या लॉन्चसाठी कोणत्याही ईवेंटचे आयोजन करत नाही त्याऐवजी ऑनलाइन लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हि सीरीज टेक मंचावर सादर करेल. हा लॉन्च ईवेंट उद्या म्हणजे 14 एप्रिल रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. वनप्लसचा लाईव ईवेंट आपल्या अधिकृत वेबसाइट सोबतच यू-ट्यूब चॅनेल आणि इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर बघता येईल.

एवढी असेल किंमत

OnePlus 8 सीरीजच्या लॉन्चच्या आधीच याच्या किंमतीसंबंधित लीक समोर आला आहे ज्यात फोन्सच्या वेरिएंट्स आणि किंमतची माहिती देण्यात आली होती. हि किंमत रुपयांमध्ये नसून यूरो मध्ये आहे पण यावरून प्राइस रेंजचा अंदाज लावला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले जातील. दोन्ही मॉडेल्सच्या बेस वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो चा मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात येईल. रिपोर्टनुसार वेरिएंट्स आणि किंमतीची माहिती त्यांना यूरोपियन रिटेलरच्या माध्यमातून मिळाली आहे.

दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत पाहता रिपोर्ट नुसार OnePlus 8 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 719/729 यूरो असेल. हि किंमत इंडियन करंसीनुसार 60,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 819/829 यूरो म्हणजे जवळपास 68,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. OnePlus 8 Pro च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत इथे 919/929 यूरो म्हणजे जवळपास 77,000 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1009/1019 यूरो अर्थात् 84,000 रुपयांच्या आसपास सांगण्यात आली आहे.

OnePlus 8 Pro

वनप्लसच्या सीईओनी कंपनीच्या कम्यूनिटी फोरम वर OnePlus 8 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. पीट यांनी सांगितले आहे कि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोन्स क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह बाजारात येतील. सीईओच्या मते गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus स्मार्टफोनच्या तुलनेत नवीन स्मार्टफोन 25 टक्के जास्त फास्ट असतील. त्याचबरोबर वनप्लस 8 सीरीज मध्ये LPDDR5 RAM आणि UFS 3.0 storage मिळेल. वनप्लस 7 सीरीज मध्ये LPDDR4 रॅम देण्यात आला आहे.

लीक्सनुसार वनप्लस 8 प्रो मध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल जो 5G सपोर्ट सह येतो. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइस मध्ये 8GB आणि 12GB रॅम आणि 128/256GB ची UFS 3.0 स्टोरेज असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4510mAh ची बॅटरी 30W Warp चार्जिंग आणि 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सह मिळेल. त्याचबरोबर फोन मध्ये 48MP+48MP+8Mp+5MP चा क्वाड कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात रिर्वस वायरलेस चार्जिंग 3W सपोर्ट असेल.

The post OnePlus 8 सीरीज उद्या होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या आपल्या मोबाईल वर हा मोठा ईवेंट लाईव बघण्याचा मार्ग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-launching-in-india-how-to-watch-live-event-on-phone-know-price-sale-specs-offers/feed/ 0
12 जीबी रॅम सह वेबसाइट वर दिसला OnePlus 8 Pro, 14 एप्रिलला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-in2025-8-pro-geekbench-12gb-ram-specs-price-leaked-launch-date-14-april-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-in2025-8-pro-geekbench-12gb-ram-specs-price-leaked-launch-date-14-april-in-india/#respond Mon, 06 Apr 2020 12:19:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7000 OnePlus 8 सीरीजचा एक स्मार्टफोन चीनी बेंचमर्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. हि लिस्टिंग काही दिवसांपूर्वीची आहे पण आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये येत आहे.

The post 12 जीबी रॅम सह वेबसाइट वर दिसला OnePlus 8 Pro, 14 एप्रिलला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दीर्घ प्रतीक्षेनंतर OnePlus येत्या 14 एप्रिलला भारतात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत ‘OnePlus 8 सीरीज’ टेक मंचावर सादर करेल. वनप्लस 8 सीरीज जगात सर्वात आधी भारतातच सादर केली जात आहे, त्यानंतर चीन व इतर बाजारांत लॉन्च होईल. कंपनीने अजूनतरी सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत, पण अशी चर्चा आहे कि या सीरीज मध्ये OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus 8Z चा समावेश असेल. आता लॉन्चच्या आधीच वनप्लस 8 सीरीजचा एक स्मार्टफोन गीकबेंच वर दिसला आहे जिथे या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

OnePlus 8 सीरीजचा एक स्मार्टफोन चीनी बेंचमर्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. हि लिस्टिंग काही दिवसांपूर्वीची आहे पण आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये येत आहे. गीकबेंच वर हा फोन OnePlus IN2025 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे आणि बोलले जात आहे कि हा डिवाईस वनप्लस 8 सीरीजचा सर्वात पावरफुल फोन OnePlus 8 Pro असेल. गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर फोनची इतर माहिती पण समोर आली आहे त्या नुसार OnePlus 8 Pro स्मार्टफोन 12 जीबी रॅम सह बाजारात येईल. लिस्टिंग मध्ये फोनच्या प्रोसेसरचे कोडनेम ‘kona’ लिहिण्यात आले आहे. हे क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 चे कोडनेम आहे. यावरून स्पष्ट होते कि वनप्लस 8 प्रो या फ्लॅगशिप चिपसेट वर लॉन्च केला जाईल. बेंचमार्किंग स्कोर मध्ये OnePlus IN2025 ला सिंगल-कोर मध्ये 906 आणि मल्टी-कोर मध्ये 3398 स्कोर देण्यात आला आहे.

OnePlus 8 Pro

वनप्लसच्या सीईओनी कंपनीच्या कम्यूनिटी फोरम वर OnePlus 8 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. पीट यांनी सांगितले आहे कि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोन्स क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह बाजारात येतील. सीईओच्या मते गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus स्मार्टफोनच्या तुलनेत नवीन स्मार्टफोन 25 टक्के जास्त फास्ट असतील. त्याचबरोबर वनप्लस 8 सीरीज मध्ये LPDDR5 RAM आणि UFS 3.0 storage मिळेल. वनप्लस 7 सीरीज मध्ये LPDDR4 रॅम देण्यात आला आहे.

लीक्सनुसार वनप्लस 8 प्रो मध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल जो 5G सपोर्ट सह येतो. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइस मध्ये 8GB आणि 12GB रॅम आणि 128/256GB ची UFS 3.0 स्टोरेज असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4510mAh ची बॅटरी 30W Warp चार्जिंग आणि 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सह मिळेल. त्याचबरोबर फोन मध्ये 48MP+48MP+8Mp+5MP चा क्वाड कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात रिर्वस वायरलेस चार्जिंग 3W सपोर्ट असेल.

अश्याप्रकारे बघा लॉन्च इवेंट लाइव

वनप्लस 8 सीरीजसाठी कोणताही ईवेंट आयोजित केला जाणार नाही पण कंपनी हि सीरीज ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून बाजारात आणेल. इवेंट ऑनलाइन आयोजित करण्याचा निर्णय जगभरातील कोरोना वायरस संक्रमणामुळे घेण्यात आला आहे. तुम्ही या ग्लोबल लॉन्च इवेंटची लाइव स्ट्रीमिंग घर बसल्या 14 एप्रिलला बघू शकता. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता या इवेंटची सुरवात होईल. तुम्ही हा कंपनीच्या YouTube चॅनेल वर बघू शकता. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर पण इवेंट लाइव दाखवला जाईल.

The post 12 जीबी रॅम सह वेबसाइट वर दिसला OnePlus 8 Pro, 14 एप्रिलला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-in2025-8-pro-geekbench-12gb-ram-specs-price-leaked-launch-date-14-april-in-india/feed/ 0
धमाकेदार फीचर्स सह OnePlus 8 सीरीज 14 एप्रिलला होईल लॉन्च, अश्याप्रकारे बघा इवेंट लाइव https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-smartphones-launch-on-14-april-online-event-know-specification-sale-live-stream-link/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-smartphones-launch-on-14-april-online-event-know-specification-sale-live-stream-link/#respond Tue, 31 Mar 2020 13:56:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6956 लॉन्च डेटची घोषणा करत वनप्लसचे फाउंडर आणि सीईओ पीट लाउ म्हणाले कि OnePlus 8 सीरीजच्या माध्यमातून आम्ही आता पर्यंतची आपली सर्वात पावरफुल आणि सुंदर स्मार्टफोन सीरीज आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

The post धमाकेदार फीचर्स सह OnePlus 8 सीरीज 14 एप्रिलला होईल लॉन्च, अश्याप्रकारे बघा इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने आपल्या बहुप्रतीक्षित सीरीज OnePlus 8 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनीने एक प्रेस नोट प्रसिद्ध करून घोषणा केली आहे कि ती 14 एप्रिल 2020 ला एक ऑनलाइन लॉन्च इवेंटच्या माध्यमातून आपली लेटेस्ट OnePlus 8 सीरीज सादर करेल. आता पर्यंत या सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या फोन्स बद्दल अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. कंपनी कन्फर्म केले आहे कि या सीरीज मध्ये येणारे फोन फास्ट परफॉर्मेंस सह 5G ने सुसज्ज असतील. तसेच डिवाइस 120गीगाहर्ट्ज डिस्प्ले सपोर्ट सह येतील.

अश्याप्रकारे बघा लॉन्च इवेंट लाइव

OnePlus ने ऑनलाइन इवेंट आयोजित करण्याचा निर्णय जगभरातील कोरोना वायरस संक्रमणामुळे घेतला आहे. तुम्ही या ग्लोबल लॉन्च इवेंटची लाइव स्ट्रीमिंग घर बसल्या 14 एप्रिलला बघू शकता. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा इवेंट सुरु होईल. तुम्ही हा कंपनीच्या YouTube चॅनेल वर बघू शकता. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर पण इवेंट लाइव केला जाईल.

लॉन्च डेटची घोषणा करत वनप्लसचे फाउंडर आणि सीईओ पीट लाउ म्हणाले कि OnePlus 8 सीरीजच्या माध्यमातून आम्ही आता पर्यंतची आपली सर्वात पावरफुल आणि सुंदर स्मार्टफोन सीरीज आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सीरीज मध्ये येणाऱ्या फोन्सच्या नावाची माहिती या घोषणेत करण्यात आलेली नाही.

पीट यांनी सांगितले कि या सीरीज मध्ये येणाऱ्या फोन्स मध्ये सुपरफास्ट 5G कॅपेबिलिटीज, हाई रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि वनप्लसची सिग्नेचर पावरफुल परफॉर्मेंस दिली जाईल. इतकेच नव्हे तर त्यांनी सांगितले आहे कि OnePlus 8 सीरीज आमच्या सर्व यूजर्सना ट्रूली ‘बर्डनलेस’ अनुभव देईल.

आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी OnePlus 8 सीरीज मध्ये तीन फोन्स सादर करू शकते. कंपनी या सीरीज मध्ये OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus Z (OnePlus 8 Lite) सादर करेल. तसेच काही दिवसांपूर्वी OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते.

OnePlus 8 चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ फ्लूड एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. OnePlus 8 Pro चा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल असे सांगण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro दोन्ही फोन 5जी ला सपोर्ट करतील.

OnePlus 8 बाबत बोलले जात आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलची प्राइमरी लेंस, 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. सेल्फीसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. OnePlus 8 Pro मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4300एमएएच ची बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.

OnePlus 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8 प्रो बाबत बोलायचे तर या फोन मध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल जो 5G सपोर्ट सह येतो. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइसच्या प्रो वर्जन मध्ये 8GB आणि 12GB रॅम आणि 128/256GB ची UFS 3.0 स्टोरेज असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4510mAh ची बॅटरी 30W Warp चार्जिंग आणि 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सह मिळेल. फोन मध्ये 48MP+48MP+8Mp+5MP चा क्वाड कॅमेरा सेटअप असेल. तसेच रिर्वस वायरलेस चार्जिंग 3W सपोर्ट सह मिळेल. टिपस्टरचा दावा आहे कि फोन Blue, Black आणि Green कलर ऑप्शन आणि IP68 वॉटरप्रूफिंग सपोर्ट सह येईल.

The post धमाकेदार फीचर्स सह OnePlus 8 सीरीज 14 एप्रिलला होईल लॉन्च, अश्याप्रकारे बघा इवेंट लाइव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-series-smartphones-launch-on-14-april-online-event-know-specification-sale-live-stream-link/feed/ 0
OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/#respond Thu, 26 Mar 2020 12:22:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6903 आता OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

The post OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlus पुढल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज OnePlus 8 लॉन्च करणार आहे. या सीरीज मध्ये OnePlus 8, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 Pro लॉन्च केले जाऊ शकतो. या फोन्स बाबत आता पर्यंत अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. आता OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

इंडियन टिपस्टर ईशान अग्रवालने एक्सक्लूसिवली ट्विट करून या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स प्रसिद्ध केले आहेत. तसेच एक दिवस आधीच OnePlus फोरम वर कम्यूनिटी मॅनेजरने लिहिले होते कि नवीन फ्लॅगशिप येत आहे. हा ऑफिशियल लॉन्चच्या आधी काही लोकांना वापरायला दिला जाईल. या सीरीज मधील दोन फोन्सचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार OnePlus 8 Pro वेरिएंट मध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. डिवाइस मधील पॅनल क्वाड एचडी+ रिजोल्यूशन सह येईल. तसेच फोनच्या डिस्प्लेचा सर्वात आकर्षक फीचर यात दिला जाणारा 120Hz रिफ्रेश रेट असेल. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट दिला जाईल जो 5G सपोर्ट सह येतो. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइसच्या प्रो वर्जन मध्ये 8GB आणि 12GB रॅम आणि 128/256GB UFS 3.0 स्टोरेज असेल.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 48 मेगापिक्सल लेंस बेस्ड क्वाड-कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात 48MP+8MP+5MP लेंस असतील. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4510mAh ची बॅटरी 30W Warp चार्जिंग आणि 30W फास्ट वायरलेस चार्जिंग सह मिळेल. तसेच रिर्वस वायरलेस चार्जिंग 3W सपोर्ट सह येईल. टिपस्टरचा दावा आहे कि फोन Blue, Black आणि Green कलर ऑप्शन आणि IP68 वॉटरप्रूफिंग सपोर्ट सह येईल.

OnePlus 8 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 8 बद्दल बोलायचे तर यात 6.55-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल, ज्यात 90Hz रिफ्रेश रेट असेल. तसेच OnePlus 8 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 5G चिपसेट दिला जाईल. डिवाइस मध्ये 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB यूएफसी 3.0 स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप होगा. OnePlus 8 मध्ये 48-मेगापिक्सल, 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल लेंसचा कॉम्बिनेशन असेल. पावर बॅकअपसाठी डिवाइस मध्ये 4300mAh बॅटरी असेल जी 30W Warp चार्ज सपोर्ट येईल. फोन मध्ये कोणताही वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार नाही. फोन तीन कलर ऑप्शन Blue, Black आणि Green मध्ये येईल.

The post OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro चे फुल स्पेसिफिकेशन झाले लीक, 5G सपोर्ट सह असतील हे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-and-oneplus-8-pro-full-specification-leak-online-phon-launch-with-snapdragon-865-5g-chipset-48mp-rear-main-camera/feed/ 0
OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/#respond Tue, 18 Feb 2020 13:12:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6624 OnePlus 8 एंडरॉयड 10 ओएस सह ऑक्सिजन ओएस 10 सह लिस्ट आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे.

The post OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेक कंपनी OnePlus यावर्षी आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत OnePlus 8 सीरीज सादर करेल. चर्चा अशी आहे कि या सीरीज अंतर्गत OnePlus 8, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 Pro येतील जे एप्रिल मध्ये टेक मंचावर येतील. कंपनीने अजूनतरी वनप्लस 8 सीरीज बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण एका परदेशी शॉपिंग साइट वर सीरीजचे तीनही स्मार्टफोन लॉन्चच्या आधी लिस्ट करण्यात आले आहेत. या वेबसाइटने या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच यांची किंमत दाखवली आहे.

OnePlus 8

सर्वात आधी वनप्लस 8 बद्दल बोलायचे तर शॉपिंग साइट वर हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या डावीकडे वर पंच होल आहे. OnePlus 8 एंडरॉयड 10 ओएस सह ऑक्सिजन ओएस 10 सह लिस्ट आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा 5जी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो 640जीपीयू आहे.

OnePlus 8 या शॉपिंग साइट वर तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लिस्ट केला गेला आहे ज्यात 12जीबी, 8जीबी आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 256जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी वनप्लस 8 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48एमपी + 16एमपी + 2एमपी सेंसरचा समावेश आहे तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32एमपी सॅमसंग जीडी1 सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये वॉर्प 30टी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus 8 Pro

वनप्लस 8 प्रो या सीरीजचा सर्वात मोठा फोन आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.5 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच होल डिस्प्ले सह येईल. हा फोन पण एंडरॉयड 10 ओएस आणि ऑक्सिजन 10 सह दाखवण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 5जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पण एड्रेनो 640जीपीयू सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

OnePlus 8 Pro को 12 जीबी आणि 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे ज्या सोबत 256 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह येतो ज्यात 64एमपी + 16एमपी + 13एमपी कॅमेरा सेंसरचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी वनप्लस 8 प्रो 32एमपी सॅमसंग जीडी1 + 3डी टीओएफ सेंसर सह येईल. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वी 5ए सुपर वॉर्प फास्ट चार्जिंग असलेली 4,500एमएएच ची बॅटरी दाखवण्यात आली आहे.

OnePlus 8 Lite

वनप्लस 8 लाइट बद्दल बोलायचे तर हा फोन 6.4 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. हा फोन पण ऑक्सिजन 10 आधारित एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये मीडियाटेकचा डाइमनसिटी 1000 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह येईल जो 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज सह लिस्टेड आहे.

फोटोग्राफीसाठी OnePlus 8 Lite मध्ये 48एमपी + 16एमपी + 12एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 16एमपी सोनी आईएमएक्स471 फ्रंट कॅमेरा असलचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअपसाठी OnePlus 8 Lite मध्ये वॉर्प 30टी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

अशी आहे किंमत

शॉपिंग साइट गिजटॉप वर हे तीनही स्मार्टफोन किंमतीसह लिस्ट केले गेले आहेत. वेबसाइट वर OnePlus 8 $549.00 (जवळपास 39,000 रुपये), OnePlus 8 Lite $499.00 (जवळपास 35,500 रुपये) आणि OnePlus 8 Pro $799.00 (जवळपास 57,000 रुपये) सह दाखवण्यात आला आहे. 91मोबाईल्स आता समोर आलेल्या या तीनही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींना दुजोरा देत नाही.

The post OnePlus 8 Pro, OnePlus 8 Lite आणि OnePlus 8 शॉपिंग साइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-pro-lite-listed-on-shopping-site-full-specifications-price-revealed-leaked/feed/ 0